पाच व्यवसाय बंद झाले, डोक्यावर करोडोचं कर्ज झाले आणि गुरुचरित्र पारायणाला सुरवात केली आणि पुढे जे झाले ते बघा या ताईंना आलेला स्वामीं अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येकजण हे स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक वेगळे प्रकारचे उपाय करत असतो. स्वामींना प्रसन्न करण्याचा आपण कोणताही मार्ग सोडत नाही कारण आपल्याला माहित आहे की स्वामी आपल्याला प्रत्येक संकटांमधून बाहेर काढणार आहेत कोणत्याही संकटात आपल्याला स्वामी एकटे सोडणार नाहीत मित्रांनो आज पर्यंत आपण खूप अनुभव ऐकले देखील आहेत वाचले आहेत किंवा कुठे बघितले देखील आहे तर त्याचबरोबर आज आपण एका ताईंचा अनुभव बघणार आहोत तो अनुभव कसा आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

 

 

अनुभव हा या ताईंच्या शब्दात नाही जाणून घेऊया सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ स्वामी म्हणजे नेमके कोण हे मला माहिती नव्हती मात्र माझ्या नशिबाने मलाही स्वामी सेवा भेटली आणि माझ्या नशिबाचे फासे बदलायला सुरुवात झाली माझे पाच व्यवसाय होते सुरुवातीला सर्वच छान होतं मी माझे मिस्टर माझे सासरे खूप मेहनत करत होतो सुरुवातीला आमचा एकच व्यवसाय होता पण या एका व्यवसायाचे आम्ही पाच व्यवसाय बनवले होते दिवसभर आम्ही कष्ट करत होतो.

 

खरं तर सुरुवातीला आमचं एक छोटं कच्च्या मालाचं कपड्यांचे दुकान होतं. मात्र मागणी वाढत गेली खूप मोठ्या प्रमाणात बदल घडत गेला मग याच भागात आम्ही आमची पाच दुकानं थाटली कर्ज काढून आम्ही हा सर्व पसारा वाढवला होता सुरुवातीचे चार ते पाच वर्ष चांगले गेले मात्र त्यानंतर सर्वच काही बदलायला सुरुवात झाली मेहनत ही प्रचंड होती आम्ही दिवसभर कष्ट करत होतो मात्र आमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नव्हती.

 

त्यामुळे व्यवसाय तोट्यात चालला होता गेली दोन वर्ष पाचही दुकानांची हीच परिस्थिती होती घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे इतकेही पैसे आमच्या जवळ उरले नव्हते आमच्याकडे काहीच राहिले नाही माझ्या डोक्यात तर अनेक विचारायला लागले मला दररोज आत्महत्या करावी का असंच वाटू लागलं मात्र त्यावेळीस माझ्या पदरात एक पाच वर्षांचा माझा मुलगा होता आणि त्याच्याकडेच पाहून आम्ही दिवस काढत होतो.

 

सासऱ्यांना ही बीपी चा त्रास सुरू झाला आणि या सर्व परिस्थितीमध्ये माझा नवरा देखील हिम्मत हारून बसला होता अशा या परिस्थितीत मलाच सर्वांना धिर देणं हे जास्त महत्त्वाचं होतं या सर्व गोष्टींमध्ये मलाच आता ठामपणे उभं राहायचं होतं . थोड्या दिवसांनी आमच्या गल्लीतल्या बायका बाहेर ट्रीप ला जाणार होत्या आणि मी तिथे जाणार नव्हती मात्र सर्वांचाच खूप आग्रह होता की मी देखील त्यांच्यासोबत जावो आणि पैसे मंडळाचेच होते त्यामुळे मी सर्वांसोबत जायला निघाली.

 

खरं तर ही ट्रीप अक्कलकोट येथे चालली होती त्यावेळी स्वामी कोण हे देखील मला माहिती नव्हती तिथे गेल्यावर मी पहिल्यांदाच स्वामींना पाहिलं मी देखील स्वामींना नवस घेतला स्वामी हे दिवस बदलवा मी प्रत्येक महिन्याला तुमच्या भेटीला येईल अगदी असं मी सहजच म्हटलं त्यानंतर पुढचे देवदर्शन करून आम्ही घरी आलो आणि गुरुचरित्र व श्री स्वामी सारामृत हे ग्रंथ घेतले होते कारण मला वाचनाची अत्यंत आवड होती मात्र या ग्रंथांचे पारायण करतात हे देखील मला त्यावेळेस माहिती नव्हतं दिवस हे ग्रंथ असेच पडून होते .

 

पण एके दिवशी चक्क स्वामी स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि मला त्यांनी गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं एकच स्वप्न मला हे पाच वेळा पडलं मग मी आमच्याच बाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठात जाऊन तिथल्या भटजींना हे विचारलं आणि त्यावर गुरुजींनी मला हे पारायण करा असं सांगितलं आणि मी गुरुचरित्र पाराण्याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर गुरुवारच होता .

 

आणि तिथून माझ्या सेवेची सुरुवात झाली माझं एक पारायण पूर्ण झालं आणि चमत्कार घडायला सुरुवात झाली प्रमाणात आता चांगला नफा होऊ लागला मिस्टरांमध्ये बदल होऊ लागले पूर्णपणे निगेटिव्ह झालेल्या माझा नवरा फक्त माझ्या दुसऱ्या पारायणामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला की जसं जसं स्वामींना सांगायचे प्रत्येक गोष्ट ही तशीच घडायला लागली माझी प्रत्येक इच्छा ऐकू लागले आणि माझ्या मनासारखं सर्व काही होऊ लागलं.

 

शेवटचं पारायण होतं त्यावेळेस तर आमचा धंदा हा भरपूर वाढला मोठ्या प्रमाणात होत गेला त्यानंतर सातव्या पाराण्याच्या सुरुवातीलाच आम्ही सातवे दुकाने देखील सुरू केलं तिथून मी आणि माझे मिस्टर हे दोघेही प्रत्येक महिन्यातून अक्कलकोटला जातो स्वामींच्या मंदिरात दान करतो आज आम्ही दोघेही मनापासून सेवा करतो खरंच आमचं सर्व काही संपलं होतं मात्र स्वामी सेवा घडली आणि आमच्या नशिबाचे फासे पलटायला सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.