महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र कसे अर्पण करावे बेलपत्र तोडण्याचे नियम व बेलपत्र वाहण्याचे हे नियम तुम्हांला माहित असणे गरजेच आहे ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना म्हणजेच की हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यांमध्ये भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक वेगळे प्रकारचे उपाय व्रत देखील केले जातात या महिन्यांमध्ये आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा पण भगवान शंकरांकडे मागितली तर तिच्या पूर्ण होते असे देखील म्हटले जाते तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण बेलपत्र वाहत असतो पण ते बेलपत्र वाहण्याचे काही नियम देखील आहेत व ते बेलपत्र अर्पण कसे करावे हे देखील त्याचे नियम आहेत तर मित्रांनो याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो तुम्ही शिवलिंगा वरती एक जरी बेलपत्र वाहिलं तरी ते चांगलं आणि शुभच मानलं जातं हे बेलपत्र त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत असतं त्याचबरोबर जास्त दल असणार बेलपत्र जर तुम्ही शिवलिंगावर ती वाहिला तर तुमची जी काही मनोकामना आहे इच्छा आहे ती इच्छा लवकर पुर्ण देखील होणार आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बेलपत्र मिळतील तेवढ्या प्रमाणात शिवलिंगावर ती वाहिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल.

 

त्यातील त्रिदल बेलपत्र म्हणजे महादेवाचे त्रिनेत्र आहे हे त्रिनेत्र पापांचे नाश करणारे आहे बेलपत्राच्या तीन पानांमध्ये महादेवांचे तीन डोळे आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आहे व माता पार्वती व माता लक्ष्मी व माता सरस्वती या तीन देवीही आहेत आज आपण शिवलिंगावर ती बेलपत्र कसं व्हायचं त्याचबरोबर हे बेलपत्र किंवा बेलाची पाने कधी तोडू नयेत आणि शिवपिंडी वरती किती बेलपत्र व्हावी त्याची माहिती आज आपण जाणून घेऊया.

 

मित्रांनो बेलपत्र तोडताना आणि ती भगवान शंकरांना अर्पण करताना काही नियमांचं नक्कीच पालन करायला पाहिजे तर आपल्या संस्कृतीमध्ये धर्माचे पालन करताना त्या निसर्गाचे सुद्धा रक्षण करायला सांगितले आहे. मित्रांनो आपण ज्या वेळेस बेलपत्र तोडतो तेव्हा झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होईल असे काम आपल्याला करायचे नाही बेलपत्र तोडताना आपल्याला भरपूर काळजी घेऊन बेलपत्र तोडायचे बेलपत्र तोडण्यास संबंधित काही नियम देखील सांगितले आहेत ते तोडताना अत्यंत काळजीपूर्वक तोडणे खूप गरजेचे आहे.तसेच बेलाची पानं महादेवांना वाहताना आपण कोणत्या नियमांचे पालन करावं तर

 

बेलाची पाने चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या तसेच संक्राती आणि सोमवार या दिवशी चुकूनही आपण बेलपत्र तोडायची नाही या दिवसाच्या आदल्या दिवशी आपण बेलाची पानं तोडायची आहे.बेलाची पाने भगवान शिव शंकरांना अतिशय प्रिय आहेत मात्र या तिथीला ती अजिबात तोडू नयेत आदल्या दिवशी ती तोडली तर चालतात बेलाची पानं ही कधीही शिळी होत नाही ती आपण स्वच्छ धुऊन महादेवांना नक्कीच अर्पण करू शकतो.

 

तुम्ही जर मंदिरात पूजा करण्यासाठी गेला आणि तुम्हाला बेलपत्र मिळाली नाही तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली बेल पत्र सुद्धा पाण्याने स्वच्छ धुऊन ते पुन्हा महादेवांना अर्पण करू शकता म्हणजे त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करू शकता ही सर्व माहिती स्कंद पुराणात ही लिहिलेली आहे तर बेलपत्र जर आपण तोडत असेल तर बरेच जण अगदी फांद्या तोडून आणतात तर हे चुकीचे आहे .

 

बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही नुकसान होणार नाही आणि याची आपण पुरेपूर काळजी घ्यायची आहे पानं तोडताना केवळ पान तोडावीत त्याच्या फांद्या तोडू नये झाडाला कोणतेही नुकसान पोहोचू नये ही पानं तोडण्याच्या आधी आणि तोडल्यानंतर बेलाच्या झाडाला मनोमन प्रणाम करायचा आहे आपल्या मनामध्ये बेलाच्या झाडाचं आभार मानायचा आहे झाडाचे एक एक बेलपत्र तोडून तुम्हाला हवी तेवढी बेलपत्र घ्यायची आहेत आणि आपल्या घरी आणायचे आहेत.

 

तुम्ही बाजारातून आणत असाल तर ते आपल्या घरी आणल्यानंतर चांगल्या पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत चांगले बेल पत्र एकत्र करून खंडित बेल पत्र तुटलेली आहेत किंवा जे तुम्ही बाजूला काढायचे आहेत आणि बेल पत्राच्या दांड्या खाली एक गाठ असते ती गाठ तुम्ही बोटांनी तोडून टाकायची आहे आणि तोडताना चाकूचा वापर करायचा नाही.

 

हाताच्या बोटांच्या सहाय्याने आपल्यालाही गाठ तोडायची आहे ही गाठ सोडून टाकल्यानंतरच बेल पत्र आपल्याला महादेवांना व्हायचं आहे आता यानंतर आपण जी खराब बेलपत्र काढून ठेवले आहेत किंवा जे देट काढून ठेवलेले आहेत ते इतरत्र कुठेही न टाकता एखाद्या झाडाच्या बुडक्यात आपल्याला टाकायचे आहे त्यामुळे त्यांचे पवित्र राहील

 

 

आपण बेलपत्र देवाला घेऊन जाताना झाडाचे बेल पत्र तोडतो आणि हातातून तसेच घेऊन जातो तर तसं न करता प्लेटमध्ये आपल्या हे बेलपत्र आपल्याला घेऊन जायचे आहेत बेलपत्र शंभू शंकरांना वाहताना ती विषम संख्येत व्हायचे असतात म्हणजे विषम संकेत वाहताना तीन पाच 11 51 किंवा 108 या संकेत बेलपत्र आपल्याला व्हायचे आहे.

 

पाच बेलपत्र वाहू शकता कमीत कमी पाच बेलपत्र शिवलिंगावर आपण व्हावेत आणि एका बेलपत्रावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे बेलपत्रातील मधले जे मोठे पान आहे त्या पत्रावरती आपल्याला ओम लिहायचा आहे त्यानंतर खाली जे दोन पाने असतात त्यातील डाव्या पानावरती नमह लिहायचा आहे आणि उजव्या पानावरती शिवाय असेल बेलपत्राची जी चमकदार बाजू असते आणि वरची बाजू असते त्या चमकदार बाजू वरती आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचा आहे

 

आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आणि हे बेलपत्र अर्पण करताना शिवलिंगावर तेथे उलटे करून अर्पण करायचे आहे म्हणजे जे ओम नमः शिवाय लिहिलेला आहे ते शिव महादेवांच्या मस्तकावरती त्याचा स्पर्श व्हायला हवा महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता अशाच प्रकारे हे बेल पत्र आपण अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करताना आपल्या हातांची योग मुद्रा करायचे आहे.

 

तर अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र हे शिवपीडी वरती व्हायचं आहे आता श्रावण चालू होत आहे आणि श्रावणी सोमवारी तुम्हीही बेलपत्र शिवलिंगावर ती नक्कीच अर्पण करा जर तुम्हाला सोमवारी लक्षात आलं की आपण बेलपत्र आणलेली नाही तर त्या दिवशी म्हणजे सोमवारी चुकूनही बेलपत्र तुम्ही तोडायची नाही अशावेळी झाडाचे बेल पत्र न तोडता मंदिरामध्ये जायचं आहे इतर लोकांनी जी शिवलिंगावर वरती बेलपत्र वाहिलेली आहेत ते आपण घ्यायचे आहे.

 

ते स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत मग शिवलिंगा वरती आपण ती वाहू शकतो तर श्रावण महिन्यामध्ये तर बेलपत्र वाहन फार महत्त्वाचा आहे कारण श्रावण महिना हा महादेवांचा प्रिय महिना आहे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी ही बेल पत्र तुम्ही नक्कीच अर्पण करा .

Leave a Reply

Your email address will not be published.