फक्त एक सुपारी गुरुवारी इथे ठेवा ; तुमची इच्छा कोणतीही असो लगेच पूर्ण होईल, नशीबची मिळेल साथ ? श्री स्वामी समर्थ ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की सुपारी मध्ये श्री गणेशाचा वास असतो. जेव्हा ही सत्यनारायणाची पूजा असू द्या, लग्न असू द्या, किंवा अन्य कोणते होम हवन व कोणतीही पूजा असेल, तर गणपतीचे स्वरूप आणि सुपारी ठेवली जाते. आणि सुपारीची सुद्धा पूजन केले जाते.

पण हे सुद्धा खाण्याची सुपारी नसून पूजेची सुपारी असते. जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते. मित्रांनो, आज तुम्हाला सुपारीचा असा एक उपाय तोडगा सांगणार आहोत!! जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. तुम्हाला हा उपाय फक्त तुमच्या घरात सात दिवसापर्यंत करायचा आहे.

सात दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आत्ता तुम्हाला या पूजेसाठी एक नवीन कोरी सुपारी लागेल, म्हणजे ती बाजारातून पूजा साहित्याच्या दुकानातून आणावी लागेलं, वापरलेली घरात असलेली, पूजेची सुपारी वापरू नये. पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला ती मिळून जाईल. ती सुपारी आल्यानंतर तुम्हाला तीला दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे.

आणि त्यानंतर त्या सुपारीचा या उपायांमध्ये वापर करावा. हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. सुपारी तुम्ही केव्हाही आणली तरी चालेल. आणून घरात ठेऊन द्या. गुरुवारच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही करू शकता.

सुपारी गुरुवारच्या दिवशी दुधा अभिषेक करून घ्यावी. त्यानंतर ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून द्यावी, कोणत्याही बाजूला डाव्या हाताला उजव्या हाताला ती सुपारी ठेवावी. त्यानंतर सात दिवस सकाळ संध्याकाळ हळद कुंकू अक्षता टाकून सुपारीचे पूजन करावे. आणि अगरबत्ती, दिव्याने तिची आरती करावी.

सात दिवस ही प्रक्रिया तुम्ही अवश्य करावी. आणि सात दिवस झाल्यानंतर, आठव्या दिवशी ती सुपारी देव घरातून तुम्ही घ्यावी, आणि आपल्या तिजोरी मध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी!! तिजोरी कपाळ जिथे तुम्ही तुमचे दागदागिने, पैसा महत्वाचे कागदपत्र, ठेवत असाल. त्या ठिकाणी सुपारी कायमस्वरूपी साठी घेऊन द्यावी. गणपतीला कधीही स्पर्श करू नये, हात लावू नये.

तिला तिथून काढून बघू नये. नेहमी काढत राहू नये सुपारी एकदा ठेवली की तिथे राहू द्यावी. तुम्ही तिजोरी मध्ये ठेवू शकता दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात , ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी ही सुपारी ठेवू शकता. हा उपाय खूप चमत्कारी आहे तुमच्या इच्छा हा पूर्ण करू शकतो. नशीबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो. हा उपाय तुम्ही नक्की करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.