माझ्याकडे शेवटचे फक्त 300 रुपये होते, पूजा ताई निकम यांना आलेला स्वामींचा हा अनुभव वाचून तुम्ही पण थक्क व्हाल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतो . स्वामी आपल्याला कोणत्याही अडचणीमधून बाहेर काढतात हे आपल्याला माहीतच असतं त्यामुळे आपण स्वामींवर भक्ती व श्रद्धा ठेवून पूजा प्रार्थना करतो स्वामी नेहमी म्हणत असतात की कोणत्याही संकटांना कधीही घाबरायचे नाहीत त्याला धैर्याने सामोरे जायचे आहे तर मित्रांनो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताच मार्ग सोडत नाहीत प्रत्येक मार्ग आपण अवलंबत असतो कारण स्वामी आपल्यावर कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्या अडचणी मधून ते बाहेर काढण्यासाठी मार्ग हे दाखवतच असतात तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही काही अनुभव ऐकला तिला वाचला असशील किंवा कुठेतरी बघितला देखील असाच आज आपण एक अनुभव जाणून घेणार आहोत. पूजा निकम असं त्या ताईंचे नाव आहे चला तर मग आता अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये आपण वाचूया.

 

मी दादरला राहायला आहे दादर मठांमध्ये माझं येणं जाणं चालूच असतात मी काही स्वामींच्या सेवेमध्ये खूप वर्षापासून आहे असं काही नाही. परंतु स्वामींच्या मठामध्ये माझं कायमच चालू असतं. पण विशेष अशी सेवा मी आजपर्यंत कधीही केली नाही गेल्या दीड दोन वर्षापासून मात्र मी स्वामींच्या सेवेमध्ये आले आहे आणि स्वामींनी माझे आयुष्य देखील पूर्णपणे बदलल आहे तेच माझी आई वडील तेच माझे कुटुंब तेच माझे मित्र परिवार असं सगळे माझे आहेत ते स्वामीच आहेत .

 

माझं लग्न बारा वर्षांपूर्वी झालं होतं पण आमचा संसार फक्त तीन ते साडेतीन वर्षांचा होता काही कारणास्तव आमचा घटस्फोट झाला मी माहेरी आले तेव्हा माझ्याकडे दीड वर्षाचं बाळ होतं त्याला घेऊन मी माझ्या माहेरी राहायला आले माझ्या माहेरी माझा भाऊ माझ्या भावाची बायको त्यांची दोन मुलं आई एवढे जण आम्ही राहायला होते माझे वडील माझ्या लग्नाच्या अगोदरच वारलेले होते आता मी त्या ठिकाणी राहिला लागले लहान मोठे काम देखील मी शोधू लागले आणि ती कामेही मी करू लागले पण मुंबईची घर म्हटल्यानंतर अगदी छोटी छोटी घर असतात आणि त्या ठिकाणी सगळ्यांनाच ऍडजेस्ट करून राहणं प्रत्येकालाच अवघड असतं आणि या गोष्टी माझ्या लक्षात येत होत्या

 

शेवटी मुलीच एकदा लग्न झालं तरी कितीही म्हटलं तरी काही प्रमाणामध्ये आपल्यावर हक्क कमीच होतो असं मला जाणवू लागले आणि एक दिवस मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला माझ्या भावाने मला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव झाली की त्या ठिकाणाहून निघून जायचे आणि मी माझ्या आईला घेऊन बाहेर पडले आईला सोबत घेऊन जाण्याचं कारण म्हणजे मला कामावर जाण्यासाठी बाहेर जावे लागणार होते आणि माझ्या बाळाला सांभाळण्यासाठी कोण नव्हतं आणि घरातली थोडीफार मदत होईल मी आईला सोबत घेतलं होतं

 

सुरुवातीला छोटी मोठी काम मला मिळत गेली व मी ती करत गेली घराचं भाडं देखील भरायचं होतं घर चालवायचं होतं या सर्व काही गोष्टी मला एकटीलाच करायच्या होत्या त्यामध्ये आईचं थोडं औषध पाणी सगळ्या काही गोष्टी मी स्वतःवर जबाबदारी घेतली होती आणि काम व्यवस्थित चालू होती परंतु काही वेळानंतर न काही कालांतरानंतर आई एकदमच खूप जास्त प्रमाणामध्ये आजारी पडली. आणि त्यानंतर आईकडून कामाची अपेक्षा ठेवन मला योग्य वाटलं नाही आणि तिच्याकडून होणारी नव्हतं आणि तिच्यावर कोणती जबाबदारी टाकणं हे देखील मला पटत नव्हतं

 

म्हणून मी विचार केला की आता घरातूनच काहीतरी व्यवसाय सुरू करावा म्हटलं तर आता मला स्वयंपाक शिवाय दुसरे काय येत नव्हतं आणि स्वयंपाक देखील मला खूपच चांगल्या प्रकारे येत होता आणि माझ्या हाताला ही तशी चव होती आणि मी व्यवसाय सुरू करण्याचा विचार मनामध्ये आणला सुरुवातीला काही गोष्टी आणणं गरजेचं होतं सर्वात महत्त्वाचा आहे ते म्हणजे भांडवल भाजीपाला किराणामाल आपण कितीही छोट्या म्हटले तरी त्याकडे खूप जास्त विचार करेन बघितलं तर त्या सर्वांसाठी पैसे हे खूपच लागतात. जेव्हा मी हा व्यवसाय सुरू करायचा म्हटले तेव्हा फक्त माझ्याकडे तीनशे रुपये होते.

 

ही गोष्ट कुणालाही पटणार नाही परंतु सत्य परिस्थिती हीच होती आणि या जोरावर आपण काहीतरी करू शकते असा मी निर्णय मनामध्ये घेतला होता पण करणार कसं काय हे अजिबात मी विचार केला नव्हता मी ते करायचं म्हणून ठरवलं आणि करायला सुरुवात केली सुरुवातीला फक्त एक दोन डबेच मला मिळाले परंतु कसं बस अगोदरच सामान आणि सर्व गोष्टी सांभाळून घेतल्या आणि या गोष्टीवरून मी व्यवसाय करायला सुरुवात केली पण हळूहळू झालं काय जसं मला अपेक्षा होती तसं काही घडत नव्हते

 

अगदी एक दोन महिने चांगले जायचे त्यानंतर न पुन्हा एकदा दोन-तीन महिने गॅप पडायचा आणि पुन्हा एक महिना चांगला चालायचा असं करता करता मी थकून गेले होते काय करावे मला काहीच कळत नव्हतं आणि कशा पद्धतीने करायचं हे देखील मला समजत नव्हतं आणि एक दिवस मी अगदी खूपच निराश झाले आणि स्वामींच्या मठामध्ये जाऊन बसले स्वामींचे दर्शन घेतलं आणि तेव्हा माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह नव्हता फक्त अगदी शून्यात केलेली आहे आणि स्वामींकडे फक्त एकटक बघत होते काय करावे काय समजत नव्हतं अशातच माझ्या बाजूला एक व्यक्ती येऊन बसली थोडीशी वृद्ध होत

 

परंतु वृद्ध असली तरी तिच्याकडे बघून ती व्यक्ती रुबाबदार वाटत होते ती व्यक्ती माझ्याजवळ येऊन बसली आणि ते आजोबा होते ते मला म्हणाले की काय ग थकलीस का असं ते मला विचारत होते मीही त्यांना ओळख नाही म्हणून मी जास्त काही बोलले नाही फक्त हो म्हणून मान डोलावली आणि ते लगेच मला म्हणाले आता या दरबारामध्ये तू आली आहेस ना मोकळेपणाने त्यांना शरण जा आणि तुला जी काही अडचण आहे ती त्यांना सांग ते तुला अडचणी मधून बाहेर काढणारच ते तुला रिकाम्या हाती कधीही पाठवणार नाहीत त्यानंतर मी ही घरी आले आणि त्या आजोबांचे जे शब्द होते ते माझ्या कानामध्ये भुंगा करत होते आणि एक दिवशी मी असा विचार केला

 

आजोबांनी जे सांगितलं ते नक्कीच चांगलं असणार आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असणार आहे आपण स्वामींच्या मठामध्ये तर जातो पण स्वामींची विशेष सेवा आपण कधीही करत नाही आणि त्यानंतर मी थोडीफार चौकशी केली मोबाईलच्या आधारे मी स्वामींच्या सेवा शोधण्याचा प्रयत्न केला याची माहिती मी जाणून घेतली. अशा पद्धतीने मला एक एक प्रकारच्या सेवा समजत गेल्या आणि मी स्वामींच्या सेवा करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा गुरुवार केले.

 

तारक मंत्राचं तीर्थ देखील बनवायला सुरुवात केली स्वामी क्षेत्र पारायण देखील मी वाचायला सुरू केले जसं मला वेळ मिळेल तसे मी करतच असते माझ्याकडे तेव्हा वेळ नव्हता पण जसे मला वेळ मिळेल तसे मी थोड्या थोड्या सेवा करायला सुरुवात केल्या आणि खरंच सांगायचं म्हटलं तर दोन महिन निघून गेले आणि त्यानंतर ना माझ्या जीवनामध्ये बदल घडवू लागले आणि त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही असे दिवस माझ्या आयुष्यात आले मला मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळू लागल्या माझे जे काम आहे ते हळू वाढू देखील लागला आणि त्यानंतर मला आज सांगायला आनंद होत आहे की माझी जी कमाई आहे

 

 

ती लाखोंच्या वर आहे माझा जो बिझनेस आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये आमचा आता बिजनेस पसरला आहे आणि माझ्या हाताखाली देखील आता भरपूर जण कामाला आहेत परंतु आज मी तो दिवस विसरले नाही फक्त तीनशे रुपये मध्ये मी माझा व्यवसाय सुरू केला होता काहीही मागचा पुढचा विचार न करता मी फक्त व्यवसाय करायचा निश्चय केला होता आणि हे जे काही आजपर्यंत शक्य झाला आहे ते फक्त स्वामी मुळे असे देखील म्हटले जातात की जे शक्य नाही ते स्वामी शक्य करून दाखवतात स्वामीं जवळ काही सुद्धा अशक्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.