बऱ्याच वर्षापासून स्वामी सेवा करत आहात परंतु अनुभव येत नाही तर बघा ; तुमच्या हातून ही चूक तर होत नाही ना?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील तसेच आपल्या घरातील व्यक्ती हे व्यसनाधीन झाले असतील, आपल्या घरामध्ये पैशासंबंधीत अनेक वादविवाद भांडणे होत असतील म्हणजेच आपल्या घरामध्ये अशांतीचे वातावरण निर्माण होते त्यावेळेस आपण खूपच टेन्शनमध्ये राहतो की आपण काय करावे हे आपल्याला सुचत नाही. त्यावेळेस आपल्या आजूबाजूचे लोक सांगतात की, स्वामींच्या केंद्रांमध्ये जाऊन तिथे स्वामींची सेवा कर तुमचे सर्व काही संकटे दूर होतील. माझी संकटे दूर झाले आहेत. मग आपण लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण स्वामींची सेवा करण्यासाठी जातो. म्हणजे स्वामींचे अनेक मंत्र जप करतो किंवा स्वामींची सेवा करतो 21 गुरुवारचे व्रत करतो. परंतु 21 दिवस झाल्यानंतर आपणाला काहीच जर प्रचिती अनुभव आले नसतील तर आपण लगेचच म्हणतो की मी 21 गुरुवारचे व्रत केले स्वामींचे तरीदेखील माझ्या जीवनामध्ये काहीच फरक पडलेला नाही. माझी परिस्थिती तशीच आहे काहीच सुधारणा झाली नाही.

परंतु मित्रांनो तुम्ही फक्त दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वामींची सेवा केली आहात म्हणजेच तुमचा आत्मा स्वामी सेवेमध्ये लिन झालेला नव्हता. त्यामुळे तुम्ही कधीही दुसऱ्यांच्या सांगण्यावरून काहीच करायचे नाही. दुसऱ्यांनी सांगितले म्हणून स्वामी सेवा करायची नाही. तर तुमच्या मनाने अगदी निर्मळ अंतकरणाने तुम्ही स्वामी सेवा करणे गरजेचे आहे. एकरूप होऊन स्वामी सेवा करायचे आहे.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगते म्हणजेच तुम्ही जर अगदी मनापासून जर हा उपाय केला तर स्वामी अनुभव तुम्हाला नक्कीच येतील. तसेच तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या स्वामी लगेचच दूर करतील. तर मित्रांनो कोणतीही सेवा करत असताना दुसऱ्याने सांगितले म्हणून न करता अगदी आपल्या मनाने ती करायची आहे. म्हणजे तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की आपण ही स्वामी सेवा करायला हवी.

तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो फोटो किंवा मूर्ती घ्यायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही दत्तगुरु महाराजांची मूर्ती देखील घेऊ शकता. मित्रांनो स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच एक अवतार मानले जातात. त्यामुळे तुम्ही दत्तगुरूंची एखादी मूर्ती घ्यायची आहे. हा उपाय दिवसातून दोन वेळा आपणाला करायचा आहे. हा आपणाला सकाळी नऊच्या अगोदर आणि सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असे दोन वेळा आपणाला ही सेवा करायची आहे.

तर मित्रांनो सकाळी नऊच्या अगोदर ही पूजा आटपून घ्यायची आहे. तर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती, फोटो असेल तर घ्यायचा आहे किंवा तुम्ही दत्तगुरु महाराजांचे मूर्ती घेतला तरीही चालेल. नंतर तुम्ही व्यवस्थित त्यांची पूजा मांडणी वगैरे करायची आहे आणि नंतर एक ग्लास भरून पाणी आपल्याला ठेवायचे आहे आणि त्या ग्लास वरती आपला हात तुम्ही ठेवायचा आहे.

मित्रांनो नंतर थोडावेळ हात ठेवल्यानंतर तुम्ही आपले हात जोडून स्वामींना म्हणायचे आहे की, हे स्वामी तुमचे जे काही नाव असेल ते नाव घेऊन तुमचे गोत्र तुम्हाला माहिती असेल तर ते गोत्र देखील स्वामींना सांगायचे आहे आणि म्हणायचे स्वामींना की, स्वामी मी तुम्हाला शरण आले आहे. तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या. माझ्या सुख दुःखामध्ये तुम्ही सामील व्हा. माझी सर्व दुःख तुम्ही दूर करा आणि माझ्या दुःखात ही नव्हे तर सुखातही तुमचे नामस्मरण माझ्या तोंडातून यावे असे काहीतरी चमत्कार करा.

म्हणजेच सुखदुःखामध्ये तुम्ही सदैव माझ्या पाठीशी राहाल. तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर राहू दे. माझ्या सर्व अडीअडचणीतून मला सुटका हवी आहे. असे सर्व तुम्ही बोलायचे आहे आणि स्वामींना नमस्कार करायचा आहे. नंतर आपला जो उजवा हात आहे तो हात आपणाला त्या पाणी ठेवलेल्या ग्लास वरती परत ठेवायचा आहे आणि स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप तुम्हाला एक वेळेस करायचा आहे.

मित्रांनो तारक मंत्र जप करत असताना अगदी मनोभावे श्रद्धेने तुम्ही हा जप करायचा आहे. हा जप करताना तुम्हाला जास्तीत जास्त दोन मिनिटे लागतील. तर हा तारक मंत्राचा जप तुम्हाला एक वेळेस करायचा आहे.

मित्रांनो हा मंत्रजप करून झाल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासमधील पाणी आहे ते पाणी प्यायचे आहे. तर मित्रांनो अशी ही सेवा तुम्ही सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस दोन वेळेस दिवसातून करायचे आहे. मित्रांनो ही जर सेवा तुम्ही 21 दिवसांपर्यंत केली तर नक्कीच तुमचे जे काही अडचण असेल, तसेच पैशासंबंधी काही अडचणी असतील किंवा तुम्हाला भरपूर आळस येत असेल, काम करू वाटत नसेल, मन लागत नसेल, कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल तर मित्रांनो या सर्व समस्यातून तुमची सुटका नक्कीच होईल.

स्वामी महाराज अशक्य ही शक्य करून दाखवतील. मित्रांनो हा अनुभव तुम्हाला आल्यानंतर तुम्ही कायमस्वरूपी स्वामींची सेवा नक्कीच करा. मित्रांनो तुमचा विश्वास स्वामी सेवेवर नक्कीच बसेल. तर अशी ही सेवा तुम्ही 21 दिवस दिवसातून दोन वेळा करायचे आहे. तर यामुळे स्वामी महाराज तुमच्या पाठीशी कायम राहतील. त्यांचा कृपाशीर्वाद तुम्हाला तसेच तुमच्या कुटुंबीयांना प्राप्त होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. तर असा हा उपाय, सेवा आवश्यक करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.