मित्रांनो, आजचे जीवन खूप धावपळीचे आहे. पूर्वी शाळा आणि नोकरीची टाईम ठरलेली होती. सकाळी दहा ते संध्याकाळी सहा. सहा नंतर लोक फ्री होत होते आणि फिरायला जाणे, गप्पा मारणे अशा चांगल्या गोष्टी करत होते. परंतु आज या आय.टी.च्या युगात 10-12 तास काम करून लोक घरी येतात. त्यामुळे त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही एवढे पैसे मिळतात. पण त्यातून स्वतःला वेळ काढू शकत नाही. चांगले पौष्टिक खाऊ शकत नाहीत यामुळेच नको ते आजार कमी वयातच सुरू होतात. म्हणूनच आज आपण वजन कमी करण्यासाठी या उपायाचा फारच चांगला फायदा होतो.
मित्रांनो वजन कमी करण्यासाठीचा हा एक अतिशय सोपा आणि नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही एका महिन्यामध्ये पाच किलोपर्यंत वजन कमी करू शकता.
यासाठी आपल्याला एक आयुर्वेदिक चहा बनवायचा आहे. या चहासाठी आपल्याला दालचिनी आणि मध पदार्थ लागणार आहेत. हा चहा घेत असताना त्या दिवसात आपल्याला सोबत काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ते म्हणजे दिवसभरात जास्त पाणी पिऊन बॉडी डिहायड्रेट करायची आहे. आता आपण हा चहा कसा बनवायचा ते जाणून घेऊयात. प्रथम चहाच्या एका भांड्यामध्ये एक मोठा ग्लास किंवा दोनशे एम एल पाणी उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यात मध्यम आकाराच्या दालचिनीच्या दोन काड्या टाका.
दालचिनीचा अर्क लवकर पाण्यामध्ये उतरावा आणि त्या खूप वेळ तरंगत राहू नयेत. यासाठी चमच्याने पाणी ढवळत रहा. मध्यम आचेवर साधारण दहा मिनिटे आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आहे. हे पाणी उकळून झाल्यानंतर गॅस बंद करून दहा-पंधरा मिनिटं तसंच राहू द्यायची आहे आणि हा चहा एकदा रूम टेंपरेचरला आला कोमट झाला कि गाळून घ्यायचा आहे. नंतर यात एक चमचा मध घाला. चहा चमच्याने ढवळून घ्या
मित्रांनो दालचिनीचा हा काढा किंवा चहा हा वजन कमी करण्यासाठी चा सर्वात प्रसिद्ध आणि पारंपारिक उपायांपैकी एक उपाय आहे. दालचिनीची पावडर देखील वापरू शकता. दालचिनी चे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. ते असे-
पोटाच्या अनेक समस्यांपासून दालचिनीमुळे आराम मिळतो. त्याचप्रमाणे महिलांना मासिक समस्यांपासून आराम देते. मौखिक आरोग्य सुधारते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी दालचिन फायदेशीर ठरते. मधूमेही साठी सुद्धा दालचिन खूप उपयुक्त ठरते. आपल्या शरीरातील इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि ब्लड शुगर लेवल कमी करते या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. दालचिनी मेटाबोलिजम वाढवते. दालचिनीमधे फाफायबर्स असते. ज्यामुळे आपल्याला पोट भरल्याची फिलिंग खूप वेळपर्यंत राहते आणि त्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही.
मित्रांनो रोजच्या वापरासाठी जर तुम्हाला दहा-पंधरा मिनिटे वेळ देता येत नसेल चहा बनवण्यासाठी तर तुम्ही त्याची पावडर करून ठेवली तरी पण चालेल एक तर तुम्ही बाजारातून पावडर विकत आणू शकता किंवा मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पूड करून ठेवू शकता.
मित्रांनो आपल्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी दालचिनीचा चहा उपयुक्त ठरतो. दालचिनच्या चहामध्ये एक चमचा मध मिक्स करून सकाळी उठल्यानंतर हा चहा पिला तर मेटाबोलिजम बुस्ट होऊन आपले वजन कमी होण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.