मित्रानो, आपल्यातील अनेक जण हे खाण्याचे शौकीन असतात तर काहीजण खाना बनविण्याचे शौकीन असतात.सीक्रेट टिप्स वापरून तूरडाळीची मस्त अशी रेसिपी कशी बनवायची याची माहिती तीन सिक्रेट टिप्स आपण जाणून घेणार आहोत. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. एवढेच नव्हे तर ज्यांना तूर डाळ आवडत नाही ते देखील खूप आवडीने खायला लागतील. तुम्हाला खात्री देते ही रेसिपी नवशिक्यांसाठी खूप उपयोगी आहे. यात खास अशा टिप्स सांगणार आहे.
मित्रांनो एक छोटी वाटी तूर डाळ घ्यायची आहे. तूर डाळीचे वजनी प्रमाण हे 125 g आहे एवढी वाटी डाळ चार लोकांना पुरते.
पहिली टिप – सगळ्यात आधी डाळ स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे. डाळीला पावडर केमिकल्स लावलेले असतात त्यामुळे डाळ दोन-तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुतल्यामुळे डाळ शिजवताना पाण्याला अजिबात फेस येत नाही तर ही एक महत्त्वाची टीप आहे. डाळ पाण्याने स्वच्छ धुऊन चाळणीमध्ये निथळत ठेवा.
त्यानंतर कुकर गॅसवर तापत ठेवा. ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या पाणी कुकरमध्ये घालायच आहे. तुम्ही सव्वा वाटी पाणी देखील घालू शकता किंवा डाळीच्या वरती अर्धा इंच येईल एवढं पाणी घालायचं आहे. डाळीमध्ये पाणी जास्त झालं की ते मग झाकण लावल्यावर शिट्टीच्या जवळच्या भागातून कडेने बाहेर येतो. त्यामुळे पाणी अगदी मोजून मापून घाला. यामुळे डाळ लवकर शिजते.
त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून आणि दोन हिरव्या मिरच्या मोठे तुकडे डाळीमध्ये घालायचे आहेत. त्यानंतर पाव चमचा हळद आणि एक टीस्पून तेल किंवा तूप घालायचं आहे. यामुळे डाळ चांगली नरम शिजते. टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकल्याने डाळीला खूप छान चव येते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावायचं आहे.
कुकरचे झाकण लावताना शिट्टी काढून घ्यायची आहे. जेणेकरून लगेच वाफ मग तयार होत नाही. व्यवस्थित पॅक झाकण लावून घ्यायचं आहे. त्यानंतर शिट्टी लावायची आहे. मोठ्या आचेवर एक शिट्टी होऊ द्यायची. त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून सात ते आठ मिनिटे डाळ शिजू द्यायची.
चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर त्यानंतर गॅस बंद करा. पूर्ण वाफ जाऊ द्यायचे आहे. त्यानंतर झाकण काढायच आहे. डाळ अगदी मऊ शिजेल. डाळ रवीने देखील घोटायची आवश्यकता नाही.
दुसरी सिक्रेट टीप की डाळीला फोडणी कशी करायची जेणेकरून एकदम चवीची डाळ आपली तयार होईल. त्यासाठी कढईमध्ये अर्धा टेबलस्पून तेल आणि अर्धा टेबलस्पून तूप घाला. तेल तूप चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मंद आचेवर करून त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशेप, कढीपत्त्याची सात ते आठ पानं टाकायची आहेत. फोडणीत एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक टीस्पून आलं-लसूण चांगला ठेचून घाला.
सर्व पदार्थ तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. तसेच यामध्ये पाव टीस्पून हिंग घाला. हिंग घातल्याने डाळीची चव वाढते. त्याचबरोबर डाळ पचायला सोपी जाते. हे सगळं चांगलं परतल गेलं की यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. अर्धा टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून आमचूर पावडर आणि अर्धा टीस्पून धने पावडर घालून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आहे कुठल्याही डाळीची फोडणी जेव्हा चांगली खमंग भाजल्या जाते. तेव्हाच ती डाळ चवीला खूप भारी लागते. आपली फोडणी तयार झाली. आता यामध्ये डाळ घालायची आहे. डाळ घालून झाल्यावर यामध्ये एक ग्लास गरम पाणी घाला.
पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. ही डाळ घट्टसरच चांगले लागते. त्यामुळे मी एक ग्लासभर पाणी घातलेला आहे तर पाणी टाकल्यावर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. डाळ मस्त नरम शिजली होती त्यामुळे रवीने देखील घोटावी लागणार नाही.
त्यानंतर चवीनुसार मीठ घाला. या स्टेजला तुम्ही डाळीमध्ये चमचाभर गूळ देखील घालू शकता. त्यामुळे देखील डाळीची चव अजून वाढते. गुळ आवडत असेल तर घाला. त्यानंतर डाळ मोठ्या आचेवर चांगली खळखळून उकळली की गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि मंद आचेवर चार ते पाच मिनिटे ही डाळ उकळू द्यायची.
आपली तिसरी सिक्रेट टीप आहे की आपल्याला डाळीला तडका घालायचा आहे. त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये एक टीस्पून तेल आणि एक टीस्पून तूप घालायच आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम कमी करा किंवा बंद करायचा आणि त्यानंतर दोन लाल मिरच्या, 1/2 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा आलं लसूण चेचून घाला.
तयार झालेला आहे हा तडका डाळीमध्ये टाकून डाळीवर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटं तसंच ते झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे तडक्याचा मस्त फ्लेवर आपल्या डाळीमध्ये उतरतो.
अशी ही आपली तडका डाळ तयार होते. एकदा छान मिक्स करून घ्यावे आणि यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालायची आहे. आपली मस्त हॉटेल सारखी तडका डाळ तयार होते. ही डाळ सर्व्ह करताना तुम्ही थोडसं साजूक तूप घाला. यामुळेच डाळ चवीला अप्रतिम लागते. तडका डाळ जीरा राईस बरोबर किंवा चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकता. अप्रतिम चवीचा हॉटेल स्टाईल दाल तडका आपला तयार होतो.
तर मित्रानो तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट द्वारे नक्की कळवा. आणि एकदा अवश्य करून बघा. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.