मुलीची भक्ती आणि स्वामींची शक्ती, हृदय पिळवटून टाकणारा वर्षा ताईंना आलेला हा स्वामी अनुभव वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामींची सेवा आणि त्याचबरोबर स्वामींची भक्ती हे मनापासून करत असतात आणि त्यांच्या सेवेचे फळही स्वामी त्यांना देतात त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटांपासून त्यांची सुटका करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात हे आपण अनेक अनुभवांमध्ये आणि प्रचितीमधून जाणून घेतच असतो तर मित्रांनो एक अशाच प्रकारचा स्वामी अनुभव आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आज स्वामी अनुभव आहे शिरगाव येथील एका ताईंचा आहे आणि त्यांचा हा अनुभव नेमका कसा आहे आणि स्वामिनी कशा पद्धतीने त्यांची मदत केलेली आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ.

तर मित्रांनो आजचा स्वामी अनुभव सांगत असताना ताई आपल्याला म्हणतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वर्षा पंडित आणि मी शिरगाव येथे राहते आणि अगदी लहानपणापासूनच तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि आमच्या घरामध्ये सर्वजण स्वामी सेवेमध्ये आहेत माझे बाबा आणि आई माझा भाऊ असे सर्वजण स्वामी सेवा करत असत आणि त्यांच्यामुळे मीही दहा ते बारा वर्षांची असल्यापासून स्वामीचा नाम जप आणि इतर गोष्टी करायला सुरू केल्या होत्या आणि हुशार होते त्यामुळे बारावी कमी चांगल्या टक्केवारी पास झाले आणि त्यानंतर बाबा मला म्हणाले की माझी अशी इच्छा आहे की तू एक चांगली डॉक्टर व्हावीस.

त्यानंतर मलाही डॉक्टर व्हायची इच्छा होती आणि म्हणून मी बारावी नंतर नीट ची तयारी करायला सुरुवात केली कारण कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट ची परीक्षा चांगल्या मार्काने पास होणे गरजेचे असते आणि म्हणूनच स्वामींचे बरोबरच तयारी करायला सुरुवात केली, तिथून पुढे नीटचा येईपर्यंत मी दररोज स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करतच होते आणि त्यानंतर दिवसभर अभ्यास करत होते अशा पद्धतीने माझी सुरू होते आणि त्यानंतर पेपरची तारीख डिक्लेर झाली आणि त्या दिवशी मी सर्व व्यवस्थित आवरून पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेले आणि पेपर दिला.

कसा पेपर अवघडच गेला आणि सर्व विषयांचा पेपर मी बऱ्यापैकी लिहिला परंतु एका विषयाचा पेपर मला लिहिता आला नाही तो पेपर मला खूपच अवघड गेला आणि त्या पेपरला आता मी नापासच होणार असे मला वाटत होते आणि त्यानंतर घरात आल्यानंतर मला स्वामी बद्दल खूपच राग येऊ लागला आणि स्वामींची सेवा करूनही मला पेपर खूप अवघड गेला आणि स्वामिनी माझी मदत केली नाही मी तर स्वामींची किती सेवा करते परंतु इतकी सेवा करूनही मला पेपर खूपच अवघड गेला असेल म्हणून मी स्वामीं सोबत खूपच भांडू लागले.

मी घरी आल्यानंतर कोणालाच काही बोलले नाही आणि तिथून पुढे स्वामींची सेवा करणे बंद केले त्यानंतर रिझल्टचा दिवस आला आणि त्या दिवशी माझे बाबा मला म्हणाले की जर आपण केंद्रामध्ये जाऊन येऊया आणि स्वामींचे दर्शन घेऊनच आपण तुझा रिझल्ट बघूया तर त्यावर मी बाबांना म्हणाले की नाही मला नाही यायचं स्वामी केंद्रामध्ये तुम्ही जाऊन या मग आपण रिझल्ट बघूया तर यावर बाबा मला समजावं लागले आणि तेव्हा मी बाबांना घडलेल्या सर्व प्रकार सांगितला त्यावर बाबा म्हणाले रिझल्ट काही येऊ दे परंतु पहिला आपण स्वामींचे दर्शन घेऊन या आणि माझ्यासाठी तर तू केंद्रामध्ये चल.

त्यानंतर बाबांबरोबर जाऊन मी स्वामींचे दर्शन घेतले आणि घरी आल्यानंतर रिझल्ट बघितला तर आश्चर्याचा धक्काच बसला कारण जो विषय मला खूप कठीण गेला होता म्हणजेच ज्यामध्ये मी नापास होईल असं मला वाटत होतं त्या विषयात मी पास झाले आणि स्वामींचे कृपेमुळे माझे सर्व विषय सुटले आणि त्याचबरोबर मला माझ्या मार्कांवर एक चार चांगलं सरकारी कॉलेज मिळाले आणि आता तिथे मी डॉक्टरचे शिक्षण हे घेत आहे अशा पद्धतीने स्वामींचे आशीर्वादामुळे आणि सेवेमुळे या विषयात मी नापास होणार होते तो विषय ही सुटला आणि स्वामींचे आशीर्वादाने मी आज चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे हे सर्व स्वामींमुळेच शक्य झाले. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.