घरामध्ये पती-पत्नीचे पटत नसेल, सारखे वाद होत असतील चिडचिड करत असाल तर करा हा सोपा उपाय ? श्री स्वामी समर्थ ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य हे कायम आनंदी राहावे असे वाटतच असते. मग त्यासाठी आपण पुरेपूर काळजी देखील घेत असतो. दिवस रात्र काबाडकष्ट करीत असतो. तसेच कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहत असतो. मित्रांनो ज्या ठिकाणी घरामध्ये शांतता असेल त्या ठिकाणी लक्ष्मी प्रवेश करत असते. परंतु आपणाला जाणवते की अनेक घरांमध्ये सतत काही ना काही वादविवाद, भांडणे ही होतच असतात तसेच छोट्या छोट्या कारणांवरून देखील घरामध्ये अशांततेचे वातावरण राहते. परंतु अशा घरांमध्ये लक्ष्मी अजिबात टिकत नाही. म्हणजेच लक्ष्मी तेथे वास करत नाही.

तुम्ही पाहिलेच असेल की बऱ्याच घरांमध्ये पती-पत्नीचे पटत नसते. म्हणजेच अनेक छोट्या छोट्या कारणावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत राहतात. दोघांचे म्हणणे एकमेकांना पटत नसते. त्यामुळे मग भांडणे व्हायला सुरुवात होते. तर मित्रांनो आपण यासाठी मग अनेक ज्योतिषांचा देखील सल्ला घेत असतो.

परंतु अनेक उपाय करून देखील आपल्या घरामध्ये सतत पती-पत्नीमध्ये वाद होत असतील तर आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर यामुळे पती-पत्नीमध्ये कधीच वाद निर्माण होणार नाहीत. त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना वाढीस लागेल आणि घरामध्ये शांततेचे, प्रसन्नतेचे वातावरण कायम राहील. तर हा उपाय नेमका कोणता आहे चला तर जाणून घेऊयात.

बऱ्याच घरांमध्ये देखील अनेक व्यक्तीं एकमेकांशी भांडण करीत असतात. म्हणजेच घरातील एक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तींबरोबर सतत काही ना काही कारणांवरून रागवत असेल, भांडत असेल, वादविवाद करत असेल तर त्यांनी देखील हा उपाय केला तरीही चालतो. म्हणजेच घरातील व्यक्ती चिडचिड करत असेल तर त्यांनी देखील हा उपाय करावा.

तसेच पती-पति मध्ये पटत नसेल त्यांनीही हा उपाय अवश्य करावा. तर हा उपाय करण्यासाठी आपणाला एक ग्लास पाणी घ्यायचे आहे. तुम्हाला एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे.

एक ग्लास पिण्याचे पाणी तुम्हाला देवघरांमध्ये स्वामी समर्थांच्या पुढे ठेवायचे आहे आणि तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. गुगल वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र नक्कीच दिसेल. तर हा तारक मंत्र संध्याकाळी तुम्हाला एक ग्लास पाणी भरून ते स्वामी समर्थांच्या पुढे किंवा देवघरांमध्ये ठेवून हा मंत्र म्हणजेच तारक मंत्र बोलायचा आहे.

मंत्र बोलून झाल्यानंतर ज्या पती-पत्नीचे पटत नाही तसेच घरामधील जी व्यक्ती चिडचिड करते सतत काही ना काही गोष्टीवरून सतत भांडत राहते त्या व्यक्तींना हे पाणी प्यायला द्यायचे आहे. जर पती-पत्नीमध्ये वाद होत असतील तर पती-पत्नी दोघांनीही हे पाणी प्यायचे आहे.

तसेच आपल्या घरामध्ये जो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या विषयावरून सतत वादविवाद करत असेल अशा व्यक्तीला देखील तुम्ही हे ग्लास भरून जे पाणी ठेवलेले आहे ते प्यायला द्यायचे आहे. जर तुम्ही आपल्या घरामध्ये पिण्याचे पाणी जर माठामध्ये भरून ठेवत असाल तर त्या माठामध्ये देखील तुम्ही हे ग्लासभर ठेवलेले पाणी आहे हे मिक्स केले तरीही चालते.

त्यामुळे घरातील सर्वच व्यक्ती हे पाणी पितील आणि त्यामुळे घरातील कोणताच व्यक्ती चिडचिड करणार नाही आणि आपले घर हे एकदम शांततेत राहील. तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदेल. सर्वजण एकोप्याने राहतील आणि पती-पत्नीमध्ये देखील वाद-विवाद अजिबात होणार नाही. तर असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.