तारक मंत्राचा चमत्कार बघा.. स्वामीं समर्थ तारक मंत्रामुळे वाचलं कुटुंब एक भयाण स्वामीं अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपण प्रत्येक जण हे स्वामींचे सेवेकर आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या करत असतो स्वामींची पूजा प्रार्थना देखील आपण अत्यंत मनोभावी श्रद्धेने करत असतो स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण कोणताही मार्ग सोडत नाही कारण आपल्याला कितीही अडचणी आल्या तरी आपल्याला त्याच्यामधून स्वामी बाहेर काढतच असतात स्वामी नेहमी म्हणत असतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कितीही मोठ्या प्रकारच्या अडचणी आला तरी त्याला धाडसाने सामोरे जायचे आहे मित्रांनो स्वामींचे अनुभव प्रत्येकाला येत नाहीत तर मित्रांनो असाच आज एक अनुभव आपण जाणून घेणार आहोत तो अनुभव आला आहे ताईंना त्या ताईंचे नाव आहे श्रद्धा आता आपण त्यांच्या शब्दांमध्ये वाचूया.

 

आम्ही गुजरात मध्ये राहायला आहे आमचे जे कुटुंब आहे ते मूळचे लातूरचे आहे संपूर्ण कुटुंब आमचे तिकडेच राहते तर आता नुकताच उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि सुट्टी साठी आम्ही गावाकडे गेलो होतो गावाकडे गेल्यानंतर आम्हाला देवदर्शन करायचे होते म्हणून आम्ही देवदर्शनाला गेलो होतो अक्कलकोटला आम्ही गेलो होतो आणि आमचं कुलदेवत लाहोर होतो आम्ही तिकडेही गेलो होतो आमचं चांगल्या प्रकारे देवदर्शन झालं आणि आम्ही लगेच गुजरातला यायला निघालो गुजरातला येताना आमच्या सोबत जो प्रसंग घडला तो अतिशय भयानक असा घडला आजही तो प्रसंग आम्हाला आठवला तर अंगावर शहारे येतात व डोळ्यातून पाणी देखील येत.

 

औरंगाबाद बीड हायवे वर आमची गाडी चालवत असताना अचानकच आमच्या कारच्या पाठीमागे बाईकवाले आमच्या गाडीचा पाठलाग करत होते तीन बाईक होत्या आणि त्या तीन बाईक वर पाच लोक होते आणि ती सगळी जण आमचा पाठलाग करत होते. ते का पाठलाग करत होते ते आमच्या थोडेही लक्षात आले नाही. परंतु पाटलाग करत असताना ते आमच्या गाडीवरती दगड फेकत होते. अचानकच ते आमच्या सोबत घडत होतं म्हणून आम्ही खूप घाबरून गेलो होतो थोडीशी गाडी आम्ही स्पीडने केली माझ्या मिस्टरांना सांगितलं गाडीची स्पीड जरा वाढवा आणि आपण लवकर पुढे जाऊया हे सगळं औरंगाबाद बीड हायवे वर घडत होतं

 

अचानक तो माणूस आमच्या कारच्या एकदम स्पीडने आला आणि एकदम कारच्या समोरून गाडी थांबवली आम्हाला नाईलाजाने गाडी थांबवावी लागली तेव्हा तो शिवीगाळ करत होता उत्तर बाहेर तू माझा गाडीला डॅमेज केला म्हणून लागला पण प्रत्यक्षात असं काही घडलं नव्हतं. आणि तू मला पैसे दे अशी पैशाची मागणी देखील तो माणूस करू लागला तो माणूस काय म्हणत आहे हे आमच्या अजिबातच लक्षात येत नव्हतं परंतु मिस्टर मला म्हणाले हे चोर आहेत आणि आपल्याकडून ते पैसे उकलण्याचे काम करत आहेत .

 

असं बोलता बोलता थोडं गाडीचा स्पीड वाढवला आणि पुढे आम्ही आलो आणि आमच्या कारच्या पेक्षा जास्त स्पीडने ती माणसे येऊन आणि आमच्या गाडीच्या समोर उभी राहिली आणि आमच्या गाडीवर जोरजोरामध्ये दगडफेक चालूच होती शिवीगाळही करते ते आता त्या ठिकाणी कुणाची मदत मागावी ही देखील आम्हाला सुचत नव्हतं हायवे होता

 

दुपारचे दोन-तीन वाजले असतील पण तरीही हायवेवर कोणत्याही प्रकारची रहदारी नव्हती गाड्यां दिसत नव्हत्या मोजक्याच गाड्या येत होत्या आणि भरकन निघून देखील जात होत्या ती बाईकवाले होते ते आमच्या गाडीचा पाठलागच करत होते त्यात आम्ही दोघे नवरा बायको आणि आमच्या सोबत आमची दोन लहान मुले होते एक चौदा वर्षाचा आणि एक नऊ वर्षाचा अशी दोन मुलं होती मुले देखील खूप घाबरली होती रडायला लागली होती मलाही काय करावे हे सुचेनासे झाले होते मिस्टरांचाही हात पाय थर काप उडत होते.

 

हे जे आमच्या सोबत घडत होतं ते अर्धा एक तासाचं नव्हतं तर ते पूर्ण 60-70 किलोमीटर आम्ही अंतर पार करून आलो होतो तरी देखील ते आमच्या सोबत चालूच होतं त्या लोकांनी आमचा पटलाग करण काही सोडल नव्हता आमचा पाठलाग ते करतच होते आता काय करावे काहीही समजत नव्हतं. मिस्टर न मी सांगत होतो की आपल्याला काही होणार नाही म्हणजे मी त्यांना दिलासा देत होते आपल्या गाडीवर जो दगडफेक होत आहे तो आता बंद होणार आहे स्वामी जवळ मी प्रार्थना करते.

 

स्वामी आपल्याला काहीही होऊ देणार नाहीत माझा विश्वास आहे स्वामींवर आपल्याला काहीही होणार नाही असं म्हणत मी स्वामींना म्हणाले की स्वामी आता तुम्हीच वाचवू शकता आणि तारक मंत्र गाडीमध्ये लावला होता व नामस्मरणाचा जप आम्ही सर्वजण करत होतो आणि तो चालू होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप आम्ही मी मिस्टर आणि आमचे दोन मुले देखील करू लागलो आणि अशातच काय झालं माहित नाही पण माझ्या मिस्टरांचा कधीही ६०-७० स्पीड वर गेला नाही.

 

अचानकच त्यांनी गाडी 110 – 120 च्या स्पीडने चालवायला चालू केली हे काय होत होतं त्यांच्याही लक्षामध्ये येत नव्हतं परंतु गाडी अगदी वेगाने जात होती इतक्या वेगाने गाडी गेली की खूप अंतर कापल्यानंतर मागे वळून बघितलं तर आमच्या पाठीमागे कोणीही नव्हतं आणि आम्हाला एक अंदाज आला की लोक जे होते ते आता आपला पाठलाग करणार नाहीत त्यानंतर पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी आम्ही थांबलो होतो.

 

आणि उतरल्यानंतर एवढी सगळी दगडफेक झाली असताना आम्ही उतरल्यानंतर पहिला गाडी चेक केली पण या ठिकाणी कुणालाही विश्वास बसणार नाही असं होतं आमची गाडी जेव्हा चेक केली आमच्या गाडीला तेव्हा एकही पद्धतीचा खरचडलेलं नव्हतं किंवा क्रॅक गेलेलं नव्हतं स्क्रॅचेस देखील पडलेले नव्हते. आम्ही गाडी जशी घेतली होती तशीच ती गाडी दिसत होती परंतु गाडीला इतक्या मोठ्या प्रमाणात दगडफेक होऊन गाडीला काहीही झालं नव्हतं. माझे मिस्टर हे जास्त देवांना मानत नाहीत.

 

म्हणजेच कि कोणत्याही प्रकारची पूजा प्रार्थना करत नाहीत स्वामींची देखील पूजा प्रार्थना करत नाहीत पण मी जे करते त्याला मला कधीच त्यांनी अडवलं नाही पण त्यावेळेस काय झालं माहित नाही पण माझे मिस्टर म्हणाले श्रद्धा आज तुझ्या स्वामींनीच आपल्याला वाचवलं आणि हे वाक्य जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले आणि खरंच स्वामी मुळे आज आम्ही वाचलो हे मी मनापासून सांगत होतो. तारक मंत्र मधून देखील आपल्याला खूप काही प्राप्त होतो आपल्या ज्या काही अडचणी आहेत.

 

त्या अडचणी दूर होतात तारक मंत्रामध्येच त्याचा अर्थ देखील लपलेला आहे. कोणत्याही संकटातून तारून येणार हा मंत्र आहे त्यावेळेस खरच त्या मंत्राने त्याची जादू दाखवली होती आणि आम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं होतं माझी मुले ही खूप घाबरले होते. कदाचित आम्ही त्यावेळेस घाबरून जर गाडी थांबवली असती तर त्यावेळेस आमचा जीव देखील गेला असता किंवा आणखी काही दुखापत झाली असती आमच्या जवळ जे काही आहे ते सर्वच त्यांनी काढून देखील घेतला असता मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कधीही घाबरून जायचे नाही स्वामींचा जप करायचा आहे स्वामी तुम्हाला नेहमी या अडचणी मधून बाहेर काढणारच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.