स्वामी सेवा करताना मांसाहार करावा की नाही ? ९९% लोकांना माहित नसलेली महत्वपूर्ण माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहोत. आपण त्यांचे व्रत, उपवास सेवा या मनोभावे आणि श्रद्धेने करीतच असतो. आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी, संकटे किंवा आर्थिक बाबतीत कोणतीही टंचाई असू नये असे वाटत असते व त्यासाठी आपण अनेक प्रकारचे व्रत देखील करीत असतो. मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. भक्त हे स्वामींची सेवा अगदी मनोभावे करीत असतात. तसेच वेगवेगळ्या पदार्थ आपल्या घरी बनवून स्वामींना नैवेद्य म्हणून ते दाखवतात. तसेच आपल्यापैकी बरेच जण असे आहेत जे केंद्रांमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन देखील घेत असतात. तर मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे मांसाहारी देखील आहेत.

मग अशा व्यक्तींना असा प्रश्न पडतो की मी मांसाहार करतो मग मी स्वामींची सेवा करणे योग्य आहे की अयोग्य? मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना या प्रश्नामुळे खूपच गोंधळ होतो तसेच अनेक प्रकारचे विचार देखील मनात येत असतात. बरेच जण मग असे म्हणतात की मी शाकाहारी होतो आणि मग मी स्वामींची सेवा करतो.

तर मित्रांनो तुम्ही कोणताही विचार आपल्या मनामध्ये आणू नका. तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला सांगणार आहे. कोणत्याही तुम्ही देवी देवतांची जर सेवा व्रत करत असाल तर ते अगदी मनोभावे करणे गरजेचे असते. मित्रांनो आपल्या प्रत्येकाला स्वामींनी घडवलेल आहे. आपल्याला धर्म, जा हे सर्व काही स्वामींनी दिलेल आहे.

मित्रांनो आपण स्वामींची फक्त मनोभावे आणि श्रद्धेने सेवा करायचे आहे. मित्रांनो तुम्हाला मी एक उदाहरण देते. दोन महिला असतील म्हणजेच एक शाकाहारी महिला असेल आणि एक मांसाहारी महिला असेल. मित्रांनो यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणालाही दुखवण्याचा उद्देश माझा नाही. फक्त तुम्हाला मी एक उदाहरण देत आहे.

मित्रांनो दोन महिला असतील एक शाकाहारी आणि मांसाहारी. या दोन्हीही महिला स्वामींची सेवा करत असतील त्या केंद्रांमध्ये ज्यावेळेस स्वामींच्या आरतीसाठी जातील त्यावेळेस मित्रांनो जी शाकाहारी महिला आहे तिच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात.

म्हणजेच माझ्या आजूबाजूला कोण कोण आहे तसेच आजूबाजूची लोक हे कसे आहेत किंवा ते श्रीमंत आहे का गरीब आहे असे अनेक प्रकारचे विचार जर शाकाहारी महिलेच्या डोक्यात येत असतील आणि त्याच ठिकाणी असणाऱ्या मांसाहारी महिलेच्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विचार येत नसेल. फक्त ती एकाग्र मनाने जर स्वामींची सेवा करत असेल म्हणजे तिच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी तिचा कोणताही मतलब नसेल. फक्त ती स्वामी सेवेत मग्न असेल तर मात्र मित्रांनो स्वामी फक्त आपल्या भक्तांचे सेवा बघत असतात.

म्हणजेच मित्रांनो तो व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे त्यांनी मांसाहारी आहे का याबाबतीत काहीही न बघता स्वामी फक्त भक्तांनी मनोभावे केलेली सेवा पाहत असतात. मित्रांनो या उदाहरणांमध्ये माझा उद्देश असा नाही की शाकाहारी महिलेला दुखण्याचा फक्त मी तुम्हाला उदाहरण देत आहे म्हणजेच मित्रांनो कोणताही व्यक्ती असू दे जर तो व्यक्ती मनोभावे श्रद्धेने स्वामींची सेवा करीत असेल तर मित्रांनो स्वामी तिची सेवा नक्कीच स्वीकारतात.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही मांसाहार करत असाल आणि तुमच्या मनात जर आले की मी शाकाहारी झाल्यानंतर स्वामी सेवा करेन किंवा अनेक प्रकारचे जर तुमच्या डोक्यामध्ये विचार येत असतील तर सर्व विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका. कारण स्वामींनीच आपल्याला घडवलेल आहे. स्वामी फक्त आपल्या भक्तांचे भक्ती पाहत असतात. जर आपले कर्म चांगले असेल आपण दुसऱ्याशी आपण कसे वागतो याकडे स्वामींचे लक्ष असते.

म्हणजेच तो व्यक्ती श्रीमंत आहे का गरीब आहे. त्याचे जात कोणती आहे याकडे स्वामी अजिबात लक्ष देत नाहीत. आपल्या वागण्याकडे स्वामींचे लक्ष असते. तसेच भक्तांनी मनोभावे केलेल्या सेवा ते स्वीकारतात.

तर मित्रांनो तुम्ही जर मांसाहार करत असाल आणि त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी मांसाहारी आहे मग मी स्वामींची सेवा करणे योग्य आहे का? तर मित्रांनो मांसाहार करणाऱ्यांनी अगदी मनोभावे आणि श्रद्धेने जर स्वामींची सेवा केली तर ते स्वामी नक्कीच स्वीकारतात.

परंतु मित्रांनो तुम्ही जर मांसाहार करत असाल तर मित्रांनो काही असे नियम देखील तुम्हाला आहेत म्हणजेच ज्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही. म्हणजेच मित्रांनो स्वामींचा वार हा गुरुवार मानला जातो. त्यामुळे तुम्ही गुरुवारी मांसाहार हा अजिबात करायचा नाही.

तसेच मित्रांनो जर तुम्ही अकरा गुरुवारची व्रत करत असाल तसेच गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर त्या काळात देखील तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही. तसेच मित्रांनो आपल्या घरामध्ये तुम्ही गणपतीचे किंवा कुलदेवतेचा एखादी सेवा करताना जर संकल्प करणार असाल तर त्या काळामध्ये देखील तुम्ही मांसाहार अजिबात करायचा नाही.

फक्त मित्रांनो तुम्ही मांसाहार करत असाल तर या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. म्हणजेच या काळामध्ये तुम्ही मांसाहार करायचा नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.