घरात शिवलिंग असेल तर ही एक चुक अजिबात करू नका, नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद !

वास्तु शाश्त्र

.

मित्रांनो शिवलिंग यालाच सोप्प्या भाषेमध्ये महादेवाची पिंड असेसुद्धा म्हणतात. आपल्या घरामध्ये तसेच तुळशी वृंदावन मध्ये या शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात. शिवलिंगाची पूजा घरामध्ये करणे शुभ असते की अशुभ असते त्याचबरोबर महादेवाच्या पिंडाचा कशा पद्धतीने पूजा करायची तसेच धर्मशास्त्रामध्ये शिवलिंगाची पूजा करताना कोणते नियम महत्त्वाचे मानले गेले आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात संबंधित व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप खूप मोठी संकटे आहेत , घरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बाधा आहेत अशा व्यक्तीने शिवलिंगाची पूजा नेहमी करायला हवी. असे केल्याने मोठे मोठे आजार दूर होतात घरामध्ये शांतता निर्माण होते.भाग्य उजळते परंतु शिवलिंगाची पूजा करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी सुद्धा घेणे तेवढेच गरजेचे ठरते अन्यथा महादेवाचा प्रकोप होऊन आपल्या जीवनाचा नाश सुद्धा होऊ शकतो. खरेतर शिवलिंग हे शिवाचे एक रूप आहे आणि त्याचबरोबर शिवपुराणमध्ये असे म्हटले आहे की शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असते म्हणून याच्या थोडासा जरी पूजेमुळे आपल्याला खूप मोठे फळ प्राप्त होते.

परंतु मित्रांनो शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी सुद्धा घ्या. जर तुम्हाला शिवपुजा दररोज करता येणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपल्याला शिवलिंगाची पूजा करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पूजा करणे शक्य होत नसेल तर चुकूनही आपल्या घरामध्ये किंवा घरातील कोणत्याही भागांमध्ये शिवलिंगाची स्थापना करू नका आणि जेव्हा जेव्हा आपण बाजारातून शिवलिंग आपल्या घरी आणतो तेव्हा शिवलिंगाची प्रतिष्ठापना करू नका. आपल्याला फक्त विधिवत पूजा करायची आहे कारण की शिवलिंगाची प्रतिष्ठापना घरांमध्ये केली जात नाही ती फक्त मंदिरांमध्ये केली जाते.

त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही घरामध्ये शिवलिंगावर अभिषेक करू शकतात. नर्मदा नदीच्या पात्रातून चे दगड असतात त्या दगडाच्या पासून बनलेल्या नर्मदेश्वर पिंड जर तुम्ही घरामध्ये आणली तर ती अतिशय उत्तम मानली जाते आणि घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते आपल्या अंगठ्या पेक्षा आकाराने मोठे नसावे, असे म्हणतात हे जर शिवलिंग मोठे असल्यास त्यासाठी आपल्याला खूप सारे नियम पाळावे लागतात आणि हे नियम जर पाळले गेले नाही तर आपल्या घरावर खूप मोठे संकट येत असतात. घरामध्ये अशांती पसरते अशुभ फळे प्राप्त होत असतात.

मित्रांनो आपल्या शिवपुराणानुसार शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा करणे आवश्यक असते. तर आपल्याला शिवलिंगाची पूजा करणे शक्य होणार नसेल तर आपल्या घरांमध्ये शिवलिंग ठेवू नये आणि घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनात आपत्ती निर्माण होते. शिवलिंग हे नेहमी खुल्यास्थानी असावे एखाद्या पेटीमध्ये किंवा बंदिस्त ठिकाणी ठेवणे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगा मधून सातत्याने ऊर्जा बाहेर पडत असते म्हणून असल्या शिवलिंगावर सातत्याने पाण्याची धार पडत राहील याची कटाक्षाने काळजी घ्यायला हवी.

जर तुमच्या घरा मध्ये शिवलिंग असेल तर सातत्याने त्या शिवलिंगावर पाणी पडायला हवे जेणेकरून ती ऊर्जा शांत राहील, ज्यांना हे करणे शक्य होणार नाही अशा व्यक्तीने आपल्या घरामध्ये शिवलिंग स्थापन करू नये कारण की शिवलिंगावर जर पाणी पडत नसेल तर यामुळे आपल्या घरामध्ये ऊर्जा वाढून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि घरामध्ये नेहमी अशांती निर्माण होईल. जर तुमच्याकडे धातूचे शिवलिंग असेल तर ते शिवलिंग नेहमी चांदीचे ,सोन्याचे व तांब्याची या धातूपासून बनलेले असावे आणि त्याच धातूचा एक नाग सुद्धा आपल्याला शिवलिंगाच्या बाजूला असायला हवा.

अनेकदा आपण पाहतो की शिवलिंगावर महादेवांना व अप्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो त्यामुळे अनेकदा आपल्याला त्याचे वाईट फळ मिळण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूंची अर्पण करायला हवे त्याचबरोबर शिवलिंगावर केतकीची फुले ,तुळशीचे पाने, हळद वाहू नये या गोष्टी महादेवांना अप्रिय आहेत त्याचबरोबर असे म्हटले जाते की घरामध्ये शिवलिंग कधीच एकटे ठेवू नये त्याबरोबर महादेवांचे कुटुंब म्हणजेच पार्वतीदेवी, गणेश व कार्तिकेय यांचा फोटो अवश्य ठेवावा.

अनेकदा आपण एक गोष्ट पाहत असतो की अनेक लोक तुळशीवृंदावनवर महादेवाची पिंड ठेवत असतात परंतु हे अतिशय चुकीचे आहे. तुळशी वृंदावन मध्ये जो काळा दगड ठेवणे अपेक्षित आहे तो म्हणजे शालिग्राम दगड. शालिग्राम दगड हा विष्णू स्वरूप असल्यामुळे तो माता तुळशीचे अतिशय प्रिय आहे म्हणून तुळशी वृंदावन मध्ये शिवलिंग तसेच महादेवाची पिंड ठेवू नये.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.