महिलांनी शुक्रवारी चुकूनही करू नका ही सहा कामे नाहीतर ; संपूर्ण घर होऊन जाईल कंगाल …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना करणे आणि लक्ष्मी स्तोत्रांचे पठण केल्यास घरात धन, वैभव आणि सुख समृद्धी राहते. असे म्हटले जाते की, शुक्रवारी चांगले काम केले पाहिजे. दान दिले पाहिजे. या सर्व गोष्टी पाहून, लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याला नेहमी आनंदी राहण्याचे तसेच आशीर्वाद देते. शुक्रवारी चांगले काम करण्याव्यतिरिक्त इतरही काही गोष्टी असतात ज्या करायच्या नसतात. ती कामे करणे अशुभ मानले जाते आणि देवी लक्ष्मीला राग येतो.

तर मित्रांनो आज आपण शुक्रवारच्या दिवशी कोणकोणती कार्य करू नयेत आणि त्याचबरोबर कोणकोणती कार्य या दिवशी केल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि त्याचबरोबर कोणकोणती कामे आपण शुक्रवारच्या दिवशी करावे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता पण जाणून घेऊया.

तर मित्रांनो आपल्या सर्वांनाही माहीतच आहे की, शुक्रवारचा दिवस हा लक्ष्मी मातेसाठी अत्यंत प्रिय असतो आणि त्याचबरोबर मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपल्यातील बऱ्याच विवाहित महिला शुक्रवारचे उरत सुद्धा करत असतात. यामध्ये लक्ष्मी मातेची पूजा आरती मंत्र जप आणि त्याचबरोबर दिवसभर उपवास अशा पद्धतीने ही लक्ष्मी मातेची सेवा केली जाते.

मित्रांनो ज्या स्त्रिया हे शुक्रवारचे व्रत करत नाहीत त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि म्हणूनच जर तुम्हाला या दिवशी उपवास धरणे किंवा त्याचबरोबर लक्ष्मी मातेची सेवा करणे शक्य नसेल तर मित्रांनो तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सकाळी देवपूजा करत असताना लक्ष्मी मातेची पूजा आणि एखादा नाम जप नक्कीच केला पाहिजे.

कारण मित्रांनो आपले शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शुक्रवारच्या दिवशी जर आपण लक्ष्मी मातेची विशेष सेवा केली आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचे व्रत जर आपण या दिवशी केले तर यामुळे आपल्या पैशासंबंधी सर्व अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद ही आपल्यावर कायम राहतो.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असेही सांगितलेल आहे की लक्ष्मी मातेला पक्षी हे खूप प्रिय आहे आणि म्हणूनच मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपण जर पक्षांना गहू, तांदूळ किंवा इतर कडधान्य खाण्यासाठी दिली किंवा ते ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना जर ही अन्नधान्य खाण्यासाठी दिले तर यामुळे आपल्या पैशांमध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या दूर होतात.

त्याचबरोबर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही शुक्रवारी लक्ष्मी मातेची सेवा करत असाल किंवा देवपूजा करत असाल तर अशावेळी जर तुम्हाला पाल दिसून आली किंवा तुमच्या देवपूजा करत असलेल्या ठिकाणी जर अचानकपणे पाल आले तर मित्रांनो याचाही असा अर्थ होतो की लक्ष्मी माता तुमच्यावर आता खूप प्रसन्न आहे आणि त्याचबरोबर तिचा आशीर्वाद तुमच्यावर आता कायम राहणार आहे.

तुम्ही जी लक्ष्मी मातेची सेवा किंवा पूजा करत आहात ती आता लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणूनच मित्रांनो जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही लक्ष्मी मातेची सेवा करत असताना किंवा देवपूजा करत असताना जर तुम्हाला पाल दिसून आली तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या सर्व अडचणी दूर होणार आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेल आहे की शुक्रवारच्या दिवशी आपण कोणालाही साखर द्यायची नाही म्हणजेच जर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा शेजारी असणाऱ्या व्यक्तींना जर साखर दिली तर मित्रांनो यामुळे तुम्हाला पैशांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

त्याचबरोबर लक्ष्मी माता यामुळे तुमच्यावर खूप नाराज होते. म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला साखर देणे आपल्याला टाळायचे आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेल आहे की शुक्रवारच्या दिवशी जर आपण कोणाला पैसे उधार दिले किंवा शुक्रवारच्या दिवशी आपण कोणाकडून उधार पैसे घेतले तर यामुळे सुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर आणि आपल्या घरावर नाराज होते. म्हणूनच शुक्रवारच्या दिवशी आपण कोणालाही पैसे उधार देऊ नये किंवा कोणाकडूनही घेऊ नये.

त्याचबरोबर मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी आपल्याला देवपूजेच्या आधी आपले संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर घरासमोर सडा मारायचा आहे. मित्रांनो जर शुक्रवारच्या दिवशी आपण आपले घर स्वच्छ ठेवले किंवा आपल्या घरामध्ये स्वच्छता केली तर यामुळेही मित्रांनो लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते.

मित्रांनो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेला आहे की, या दिवशी आपण आंबट पदार्थ खाणे सुद्धा टाळायचा आहे. कारण मित्रांनो आपल्यातील बरेच जण या शुक्रवारच्या दिवशी संतोषी मातेचे व्रत ठेवतात आणि त्यामुळेच या दिवशी आंबट पदार्थ खाणे वज्र मानले गेले आहे.

त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असेही सांगितलेला आहे की, आपण शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत आणि त्याचबरोबर या दिवशी आपण शक्य होईल. तितक्या पांढऱ्या वस्तू गरिबांना दान करायचे आहेत. म्हणजेच जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची जुनी कपडे असतील तर ती तुम्ही गरिबांना दान करायचे आहे.

त्याचबरोबर जे पांढरे पदार्थ आहेत तेही तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना खाण्यासाठी देऊ शकता. मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो.

अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सकाळच्या वेळी जेव्हा सूर्य देवीची किरणे येत असतात त्यावेळी आपल्या घरामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या दारामध्ये झाडू मारायचा आहे.

त्याचबरोबर मित्रांना शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी सुद्धा आपल्याला झाडू घरामध्ये मारायचा नाही. यामुळे ही लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते आणि जर काही कारणामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी झाडू मारावेच लागले तर अशावेळी तुम्ही झाडू मारल्यानंतर जो कचरा गोळा होतो आपल्याला बाहेर फेकून द्यायचा नाही.

म्हणजेच तो आपल्याला आपल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला तो कचरा आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे. तर मित्रांनो अशा काही गोष्टींचे पालन जर आपण शुक्रवारच्या दिवशी केले तर लक्ष्मी माता आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.