स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज वाचा गुरुचरित्राचा हा एक अध्याय… स्वामी तुम्हांला नशिबात नसेल तेही देतील १००% प्रभावी उपाय ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, स्वामी महाराज हे असे आहेत की ते आपल्या भक्ताच्या कायम पाठीशी उभे असतात. आपल्या भक्ताला ते कधीही ऐकते सोडत नाही. कोणत्याही संकटात जर आपला भक्त ओडवला असेल तर त्याला त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग ते देत असतात. त्याचबरोबर ते आपल्या भक्तावर कायम आपली कृपा ठेवत असतात. प्रत्येक संकटात पाठीशी असतात. ते आपल्या भक्ताला प्रत्येक कामांमध्ये यश देत असतात.

 

त्याला जे काही हवे आहेत ते तो मागण्या आधीच त्याला ते देत असतात. परंतु यासाठी आपल्यावर स्वामी महाराजांचे कृपा असणे खूप गरजेचे असते. स्वामी महाराजांची कृपा होण्यासाठी नित्यनेमाने व मनोभावाने स्वामींचे आराधना करायला हवी. त्यांची पूजा करायला आहे. त्यांची सेवा करायला हवी. स्वामींची सेवा केलेले चे पुण्य हे खूप मोठे असते. ते जर आपण वाईट मार्ग सोडून सत्कर्म करू लागून स्वामींची सेवा केली तर आपले सर्व पापे नष्ट होऊन जातात.

 

येत्या दहा एप्रिल तारखेला स्वामींचा प्रकट दिन आहे. या तारखेला प्रत्येक स्वामीभक्त हे स्वामींची विशेष अशी सेवा करत असतात. त्यांची पूजा करतात. त्याच बरोबर विविध प्रकारचे पारायण करत असतात. कारण या दिवशी केलेली कोणतीही सेवा ही थेट स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते असे म्हटले जाते. या पारायनात गुरुचरित्राचे पारायण देखील अनेक लोक करत असतात. गुरुचरित्राचे पारायण हे सर्वांनाच करणे शक्य नसते.

 

कारण त्यामागचे काही कठीण नियम आहेत. हे नियम सर्वांना पाळणे शक्य होत नाहीत. इच्छा तर सर्वांचीच असते परंतु ते आपल्या काही कारणांमुळे त्यांना करता येत नाहीत. की ज्यामध्ये ते वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असतात व इतर कारणे असतात. गुरुचरित्राचे पारायण केलामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण तर होताच व आपल्याला खूप मोठे पुण्य हे मिळत असते. त्याचबरोबर स्वामी महाराजांची कृपा देखील आपल्यावर होते.

 

गुरुचरित्राचे पारायण केलेले व्यक्ती ही भाग्यवान असते. कोणत्याही बाबतीत कशाचेही कमतरता भासत नाही. जर आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे खूपच इच्छा असेल व ते आपल्याला करता येत नसेल तर आपल्याला या स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्रातील एक अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. जेणेकरून आपल्याला गुरुचरित्राचे पारायण केलेलेचे पुण्य मिळणार आहे. ज्या लोकांना हे गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी त्या लेखांमध्ये एक श्लोक सांगितला जाईल तो श्लोक पठण रोज केले तरी त्यांनी पारायण केलेल्याच पुण्य त्याला मिळेल.

 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुचरित्रामधला कुठला अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे. तर येत्या 21 तारखेपासून म्हणजेच 21 मार्चपासून ते 10 एप्रिल पर्यंत स्वामींच्या प्रकटदीनापर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील नववा अध्याय हा रोज वाचायचा आहे. आपण हा अध्याय दिवसातून कधीही वाचू शकतो. परंतु फक्त बारा ते साडेबाराच्या दरम्यान हा आपल्याला पठण करायचा नाही. कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते.

 

म्हणून यावेळी कोणत्याही प्रकारचे पारायण याचे पठण करू नये. ही वेळ सोडून आपण दिवसभरात कधीही हा अध्याय वाचू शकतो. जर आपण या दिवसापासून पठण करण्यास सुरुवात केली तर त्या दिवसापासून आपल्याला मांसाहार हा वर्ज करायचा आहे. त्याचबरोबर जर या दिवसांमध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर त्यावेळी देखील आपल्याला हे पारायणचे पठण करायचे नाही. यावेळी तुम्ही जर पठाण न करता श्रवण केले तर चालू शकते.

 

जर या गुरुचरित्रातील अध्यायाचे पठण करणे तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक श्लोक आहे तो तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत रोज म्हणू शकता. तो श्लोक म्हणजे

“दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपीठापूरी त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती करंजग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिलुवाडिचिये संगमा । तेथूनि मठ गणगापुरी वसे वारी दीनांचे श्रमा ।।”

 

असे या श्लोकाचे आपल्याला रोज अकरा वेळेस वाचन करायचे आहे. जेणेकरून आपल्याला गुरुचरित्राचे पारायण केलेल्याची पुण्य आपल्याला मिळेल.

 

अशाप्रकारे ही सेवा तुम्ही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत करा. नक्कीच तुमच्या असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील व गुरुचरित्राचे पारायण केलेल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल आणि स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर त्यांची कृपा देखील तुमच्यावर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published.