ज्या व्यक्तीच्या जेवणात केस येतो त्यामागे काय संकेत असतो? केस आलेले जेवण करावे की नाही.. बघा याबद्दल शास्त्र काय सांगते…!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण पाहतच असाल की अनेकदा आपल्या जीवनामध्ये केस येतो. ते केस आलेले जेवण आपण केस बाजूला काढतो आणि खातो. परंतु वास्तुशास्त्रामध्ये तसेच ज्योतिष शास्त्र मध्ये ताटामध्ये केस येण्यामागचे काही कारणे सांगितलेले आहेत. की ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे ते काही संकेत देत असतात. हे संकेत कोणते व जेवणात ताटात केस आला तर आपण काय करावे? याबद्दलचे सर्व माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

आपण समाधानाचे चार घास पोटात पडावेत यासाठी मेहनत करून अन्न ग्रहण करतो. पण कधी कधी आपण जेवायला बसलो की ताटात केस येतो. मग आपण तो केस काढून टाकतो. बाजूला करून जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो नंतर जेवण करतो. आपण म्हणतो ते घरात केस विंचरल्याने ताटात केस आला. परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटात केस येतो, इतरांच्या ताटात नाही येत.

 

याचा हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे. त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. काही वेळेस आपण जेवण करीत असलो आणि आपल्या ताटाला चुकून कोणाचा पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे भोजन कधीही ग्रहण करू नये. पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते. तसेच जर आपण जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर असे भोजन कधीही पक्षांना टाकावे.

 

कारण हे भोजन भोजन मानले जात नाही. यामुळे आपले मनही अशुद्ध बनते. पती व पत्नी जर का एकाच ताटात जेवण करीत असतील तर अशुभ असते. पती-पत्नीने एका ताटात जेवणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि जर जेवण करता करता केसांचा गुच्छ जर जेवणाच्या ताटात आला तर समजावे की त्या व्यक्तीवर आता खूप मोठे संकट येणार आहे.

 

हे खूप मोठ्या संकटात जाण्याची धो-क्याची घंटा आहे. मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने आणि वडिलांनी सोबत ताटात जेवण करावे. यामुळे पित्याचा कधीही अकाली मृत्यू होत नाही. मृत्यू पासून संरक्षण होते. म्हणून जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या पित्याने एकत्र बसूनच जेवण करावे. कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाऊ नये.

 

त्यांच्या त्यांच्या वाट्याचे अन्न त्यांनी खावे. कारण त्यांच्या वाट्याचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्य येते. जसे सुदामाने भगवान श्रीकृष्णांच्या हिश्श्याचे चणे गुपचूपपणे खाऊन घेतले होते. तर त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता. आपल्या भोजनातील पशुपक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा. मग आपण ग्रहण करावे. त्यांचे वाट्याचे अन्न कधीही खाऊ नये. सर्वांना वाटून मिळून-मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्याचे पुण्य मिळते व देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.

 

वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताटा मध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते. यामुळे आपल्या दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते. त्यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य प्रवेश करते. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये. तसेच सात्विक अन्नाचे सेवन करावे. जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते. म्हणून ताटात अन्न कधीही सोडू नये.

 

लागते तेवढेच अन्न घ्यावे, तसेच आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये. असे केल्यास आपले पितर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो. जेवण झाले की ताटात हात धुणे हे ही शास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे. योनीतील जीवांचे रक्षण होत नाही. म्हणून जेवण झाले कि त्यात थोडेसे पाणी टाकून द्यावे आणि हात दुसरीकडे धुवायला जावे. ताटात हात धुणे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे. म्हणून ही चूक कधीही करू नये.

 

जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ‘ओम शांती शांती शांती’ या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यास सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व सर्वजण प्रसन्न होतात. सर्व देवी-देवतांची आज्ञा घेऊन मग जेवणाला सुरुवात करावी. आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे ध्यान करावे. सांगावे की भगवंता या जेवायला आणि मग जेवणाला सुरुवात करावी.

 

यामुळे ही आपल्यावर भगवंताची कृपा होते आणि आपल्याला सुख समृद्धीचे प्राप्ती होऊन अन्नधान्यात बरकत येते. जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी भगवंतांना नैवेद्य अर्पण करावा. म्हणजे ते अन्न न राहता प्रसाद बनते आणि प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.

 

भगवंतांना न चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या घरात अन्नधान्याचे बरकत होते. घरात कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही. बिछान्यावर बसून कधीही जेवण करू नये. यामुळे व्यक्तीला कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो. नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवण करावे. जेवण करताना कधीही कोणालाही हटकू नये. जीवनात दुर्भाग्य येते.

 

अशाप्रकारे आपण जेवण करतानाचे काही हे नियम आहेत. तसेच जेवणात ताटात केस आल्यावर आपण काय करावे याबद्दलची देखील आपण या लेखांमध्ये माहिती पाहिली आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील करा.

Leave a Reply

Your email address will not be published.