घरामध्ये रोज देवपूजा करताना या 12 चुका अजिबात करू नका, नाहीतर घरात देवी,देवता कधीच पाय नाही ठेवणार ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच. अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या मुर्त्या, फोटोज आपल्याला आपल्या देवघरांमध्ये पाहायला मिळतात. अगदी मनोभावे श्रद्धेने आपण देवपूजा करीत असतो. तसेच आपल्या ज्या काही अडचणी असतील, संकटे असतील ते दूर करण्यासाठी आपण प्रार्थना देखील करत असतो. परंतु आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा सतत काही ना काही अडचणी येत असतात. तसेच आपले घर हे प्रसन्न राहत नाही. तर मित्रांनो यासाठी आपणच काही वेळ जबाबदार असतो. म्हणजेच आपल्या हातून अशा काही चुका देखील घडत असतात. ज्यामुळे आपल्या घरामध्ये मग माता लक्ष्मी स्थिर राहत नाहीत.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या घरामध्ये रोज देवपूजा करताना काही चुका करायच्या नाहीत याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहेत. या चुका नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात. तर मित्रांनो आपण ज्यावेळेस घरामध्ये देवपूजा करतो त्यावेळेस आपण चामड्याच्या वस्तू वापरणे टाळायचे आहे.

म्हणजेच बरेच पुरुष हे चामड्याचे बेल्ट घालून देवपूजा करत असतात. तर हे करणे अशुभ आहे. तसेच बऱ्याच महिला या चामड्याची पर्स खांद्यावर लटकवून देवदर्शनास जातात. तर हे देखील खूपच अशुभ मानले गेलेले आहे. कारण चामड्यांच्या वस्तू वापरणे हे अधर्मीय आहे. त्यामुळे कधीही देवपूजा करत असताना चामड्यांच्या वस्तूंना स्पर्श अजिबात करू नये.

तसेच मित्रांनो अनेकांच्या घरांमध्ये बेडरूम मध्ये देवघर असते. तर हे देखील आपल्या शास्त्रांच्या मते एकदम चुकीचे आहे . जर तुमच्या घरामध्ये जर बेडरूम मध्ये देवघर असेल तर तुम्ही बेडरूमच्या दरवाजाला लाल रंगाचा पडदा लावावा. यामुळे मग आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष निर्माण होणार आहे तो उद्भवत नाही.

तसेच आपल्या देवघरांमध्ये तीन गणेश मुर्त्या अजिबात असू नयेत. जर तुमच्या देवघरांमध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंग हे आपल्या अंगठ्याच्या उंची एवढेच असावे. म्हणजेच अंगठ्यापेक्षा जास्त उंचीचे शिवलिंग आपण आपल्या देवघरांमध्ये ठेवायचे नाही. तसेच आपले पूर्वजांचे फोटो देखील देवघरात ठेवू नयेत किंवा एखादा देवीचा टाक किंवा पूर्वजांचा टाक बरेच जण करून आपल्या देवघरांमध्ये पुजतात तर हे देखील खूपच शुभ मानले गेलेले आहे.

तसेच मित्रांनो अनेक जणांच्या देवघरांमध्ये शंख आपल्याला पाहायला मिळतो. परंतु देवघरांमध्ये एकच शंख असावा. दोन शंख अजिबात ठेवायचे नाहीत. तसेच तुम्ही ज्या वेळेस देवपूजा करीत असताना देवांना फुले अर्पण करता. त्यावेळेस ती फुले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन मगच ती देवांना अर्पण करावेत.

देवघरांमध्ये ज्यावेळेस तुम्ही दिवा प्रज्वलित करता त्यावेळेस तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करता. जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तर तो तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर तेलाचा असेल तो डाव्या बाजूला ठेवायचा आहे.

तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करीत असता त्यावेळेस दिवा प्रज्वलित करता तर तो दिवा तुमची देवपूजा पूर्ण होईपर्यंत विजता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. तसेच आपण देवी देवतांना हळदीकुंकू लावत असताना अनामिका या बोटाने लावायचा आहे. अनामिका म्हणजेच करंगळीच्या साईडचे बोट आणि याच बोटाने तुम्ही देवी देवतांना हळदीकुंकू लावायचे आहे.

तसेच देवपूजा करीत असताना तुम्हाला जर एखादा फोन किंवा कोणी हाक दिली असेल तर तुम्ही ती देवपूजा अर्धवट सोडून अजिबात जायचे नाही. ती पूजा पूर्ण करूनच आपण तिथून उठायचे आहे. तसेच देवपूजा करीत असताना जांभळी किंवा आळस अजिबात देऊ नये. देवपूजा करीत असताना कोणत्याही प्रकारचे वाईट विचार देखील आपणाला आपल्या डोक्यामध्ये आणायचे नाहीत.

वरील सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टींकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन जर आपल्या घरातील देवपूजा ही अगदी मनोभावे व श्रद्धेने केली तर याचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. म्हणजेच आपली जी पूजा आहे ती देवापर्यंत पोहोचते.

देवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपली पूजा ही सफल देखील होते. वरील सांगितल्याप्रमाणे या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची पुरेपूर काळजी आपण घ्यायची आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.