स्वामीं भक्त अक्षता ताईला स्वामींचा आलेला हा एक थरारक सत्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. अगदी मनोभावे व श्रद्धेने ते स्वामींची सेवा पूजा अर्चना करीत असतात. तसेच अनेक मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे सेवा करण्यात मग्न राहतात. मित्रांनो स्वामी हे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात. तसेच मार्ग देखील दाखवत असतात. जो भक्त मनोभावे स्वामींची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. आपल्यापैकी बऱ्याच भक्तांना स्वामींचा अनुभव देखील आलेला आहे. तर असाच एक अनुभव आपण आज पाहणार आहोत. हा अनुभव अक्षता ताई यांचा आहे आणि त्यांना हा आलेला अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये पाहणार आहोत.

मी अक्षता माझ्या आई-वडिलांची परिस्थिती तेवढीच जेमतेम होती म्हणजे आमची परिस्थिती गरीबाची होती. माझे आई वडील हे दुसऱ्यांच्या कामाला जात होते. मला जो स्वामींचा अनुभव आला तो हा अनुभव कधीच विसरणार नाही असा आहे आणि आज तुम्हाला तोच अनुभव मी सांगणार आहे. माझ्या आत्याने घर बांधायला काढलं होतं आणि घर पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वास्तुशांती ठेवली होती. त्यावेळेस त्यांनी नातेवाईकांना सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. फक्त आई-वडिलांना आमंत्रण दिलं नव्हतं. त्यावेळेस आई म्हणाली की आपण गरीब असल्यामुळे आपल्याला आमंत्रण दिलं नाही. मात्र त्यावेळेस मला आईचे हे पूर्ण अजिबात पटलं नाही.

नंतर काही दिवसांनी माझ्या आत्यांनी गुरुचरित्र पारायण ठेवले आणि त्यावेळेस पहिल्यांदा आमंत्रण आम्हाला दिलं. त्यावेळेस आई-वडील कामाला जात असल्यामुळे गुरुचरित्र पारायणला मीच बसले होते. मी कॉलेज करून आले की लगेच गुरुचरित्र वाचायला जात होते. त्यावेळेस अनेक मैत्रिणी माझी खिल्ली उडवायचे. आता एन्जॉय करायचे दिवस आहेत आणि ही आता देवपूजेला लागली आहे.

त्यावेळेस मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते. मी गुरुचरित्र पारायण वाचायला नित्यनेमाने जात होते. शेवटचा दिवस गुरुचरित्र पारायनाचा होता आणि तो गुरुवारचा होता. त्यावेळेस मी आत्याच्या घरी गेले. गुरुचरित्र सोहळा पूर्ण पार पडला. त्यावेळेस रात्री जेवण देखील ठेवलं होतं.

आठ वाजले त्यावेळेस बाहेरच्या आलेल्या लोकांना पहिल्यांदा जेवायला दिले. नंतर मग आम्ही सर्वजण जेवण केले. त्यावेळेस रात्रीचे दहा वाजले होते. त्यावेळेस मला आत्तीने सोडण्यासाठी येऊ का? असे विचारले. त्यावेळेस मी तिला नको म्हणाले आणि आत्तीने आई-वडिलांना स्वामींचा प्रसाद तसेच जे जेवण दिले होते ते का पिशवीत घेतलं आणि मी घराकडे जायला निघाले.

आत्तीच घर हे आमच्या गावाच्या वेशीपाशी म्हणजेच आत्तीचा घरापासून आमचं घर हे १५ मिनिटाच्या अंतरावर होतं. त्यावेळेस खूपच अंधार पडलेला होता आणि त्या रस्त्यावर अजिबात कोणीच नव्हते. रस्ता सूनसान होता. मी पावले टाकत जात असताना एकदम अचानक माझ्या कानावर नाल्यापाशी आल्यावर वेगळाच आवाज ऐकू आला.

माझ्यापुढे एकदमच एक प्राणी पुढे आला तो कुत्र्यापेक्षा देखील भयंकर असा प्राणी होता. तो एकटक माझ्याकडे पाहत होता. मी पावले एक एक मागे टाकयला लागले. कारण तो प्राणी आहे तो प्राणी खूपच खतरनाक असा होता. त्यावेळेस माझ्या आत्तीने स्वामींचा प्रसाद आणि जेवण आई-वडिलांसाठी दिलेले होते.

मग मी पिशवीतील जो स्वामींचा प्रसाद होता तो माझ्या हाती घेतला. मी एक एक पाऊल मागे टाकत होते. त्याच वेळेस पाय मुरगळला मी खाली पडले आणि त्यावेळेस माझ्या हातातील जो प्रसाद होता तो प्रसाद त्या श्वानाच्या म्हणजे त्या प्राण्याच्या दिशेने गेला. तो प्रसाद त्या प्राण्यापाशी जातो न जातो तोपर्यंत तो प्राणी जंगलामध्ये पळून गेला.

नंतर मी माझे तुटलेले सॅंडल हाती घेतले. तो प्रसाद घेतला आणि घरी आले. त्यावेळेस आई म्हणाली की तू खूपच घाबरलेली दिसते. त्यावेळी मी घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. स्वामी जवळ गेले आणि स्वामींना नमस्कार केला त्यावेळेस माझ्या डोळ्यातून फक्त अश्रूच वाहत होते. कारण त्यावेळेस स्वामी माझ्यासाठी धावून आले होते आणि स्वामींनी माझी त्या संकटातून सुटका देखील केलेली होती.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.