देवघरात एक तांब्या पाणी भरून ठेवल्याने काय घडते? आणि त्या पाण्याचे काय करावे, एकदा नक्की वाचाच महत्वपूर्ण माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघरात जल असणे आवश्यक आहे. आपण जेव्हा देवपुजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेला त्यामध्ये जल ठेवणे आवश्यक आहे. तर काहींच्या घरात देवघरात सुद्धा जल नसते. कारण देवघरात जल असेल तर त्या घरात शांती, समाधान नादते. कारण माणसाला सुद्धा तहान लागते. तसे आपण देवघरात प्रत्येक व्यक्तीने देवघरात एक पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे. कारण म्हणजे पाणी हे खूप महत्त्वाचे आहे. नेहमी तुम्ही कलश मध्ये किंवा एक छोटासा चंबू मध्ये तुम्ही हे जल भरून ठेवायचे आहे.

मित्रांनो काहींना असा प्रश्न पडत असतो की, देवी देवता का तडपडत असते. कारण ज्यांच्या देवघरात जल हे नसते. त्यामुळे त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात. कोणत्याच कामांमध्ये यश येत नसते.

तुम्हाला अस जर घडायला नको असेल तर तुम्ही अवश्य चांदीच्या किंवा तांब्याच्या या कलश यामध्ये तुम्ही नक्कीच पाणी भरून तुमच्या देवघरात त्याचे पूजन करा व तुमच्या देवी देवता सुद्धा तुमच्यावर मन भरून प्रसन्न होतील व त्यांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला व तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्तीला मिळत राहील.

दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असता . तेव्हा ते रात्री ठेवलेले पाणी हे तुम्ही झाडांमध्ये ओतायचे आहे. व त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे.

तुमच्या आसपास जवळ नदी, तलाव किंवा विहीर असेल तर तुम्ही त्यामध्ये ते पाणी समर्पित करू शकता. दुसरे पाणी त्या कलशामध्ये तुम्ही भरायचे आहे. म्हणजे तुमच्या घरात समाधान शांती व भरपूर यश प्राप्ती येत राहील.
त्याचबरोबर आपल्यातील काही लोक असे असतात की, आपण जेव्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपण देवांच्या समोर जो दिवा लावतो.

तो दिवा लावल्यानंतर कधीच फुंकर मारून विजवायचा नाही. जो आपण सकाळी दीवा लावलेला असतो तो स्वतःच्या मनाने विजतो. पण त्याला कधीच फुंकर मारू नये.

कारण जर तुम्ही ही फुंकर मारला तर अग्नीदेवतेचा अपमान होऊ शकतो. तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहील. हा अग्नीदेवतेचा अपमान होतो किंवा मानला जातो. यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खंडित होते. अशी चूक तुम्ही कधीच करू नका.

आपण रोज सकाळी, संध्याकाळी अगरबत्ती लावत असतो. ती अगरबत्ती लावताना त्याला कधीच फुंकर मारून कधीच विजवायची नाही. ती कधी विजते त्याची आपण काळजी घ्यायची. तर मित्रांनो, काहींच्या घरावर मुख्य दरवाजाला दोन्हीही चौकटीला शुभ लाभ किंवा स्वस्तिक चिन्ह काढून हे मुख्य दरवाज्याच्या दोन्ही कोपऱ्यात असणे आवश्यक आहे.

तर बाहेरच्या मुख्य दरवाजाला जर तुम्ही शुभ लाभ किंवा स्वस्तिक चे चिन्ह काढल्यावर तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व काही अडचणी दूर होऊन जाते. सर्व कामे किंवा कार्य हे मंगलदायी होऊन जाते.

मित्रांनो, बाहेर कोणतीही व्यक्ती जर घरात प्रवेश करत असेल तर त्या स्वस्तिक वर किंवा शुभ लाभ लिहलेल्या त्याच्याकडे जर बघून ती व्यक्ती जर घरात प्रवेश करत असेल तर त्या घरात समाधान शांती हे सर्व काही आपोआपच एक जात राहील. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. व घर सुद्धा प्रसन्नदायी व आनंदमय होऊ लागेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.