नेहमी चांगल्या माणसासोबत देव वाईट का वागतो? श्री स्वामी समर्थांनी दिले हे खूपच चांगले उत्तर वाचा सविस्तर …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, तुम्ही नेहमी विचार करत असाल की मी कोणाचं वाईट केलं नाही कुणाशी वाईट वागलो नाही कुणाचं वाईट केलं नाही तरीही माझ्या सोबत देव वाईट का वागतो असे विचार बऱ्याच लोकांच्या मनात येत असतात. याचे उत्तर श्री स्वामी समर्थांनी आपल्याला एक महाभारतातली गोष्ट सांगून केले आहे. मित्रांनो या संबंधितची कथा अशी आहे की, एकदा अर्जुन श्रीकृष्ण ला विचारतात की हे वासुदेवा नेहमी खरे आणि चांगले वागणाऱ्या माणसांसोबतच वाईट का होते ? या प्रश्नावरून श्रीकृष्णांनी अर्जुनाला एक गोष्ट सांगितली ज्यामध्ये जीवनातील प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे.

 

मित्रांनो एका गावात दोन व्यक्ती राहत असतात एक व्यापारी असतो तो नेहमी खरं बोलत असतो आणि चांगलं वागत असतो. नेहमी देवाची भक्ती करायचा हा चिंतन करायचा नेहमी मंदिरात जायचा. देवाची सेवा करायचा. सर्व चुकीच्या कामांपासून दूर राहायचा आणि दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता. चुकीची काम करायचा नेहमी खोटे बोलायचा. तो नेहमी अधर्मी काम करायचा. मंदिरात येणाऱ्या लोकांचे चप्पल चोरायचा त्यांचे पैसे चोरायचा. वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता. एके दिवशी तो वाईट माणूस एका मंदिरात होता त्यावेळी खूप मुसळधार पाऊस पडत होता या गोष्टीचा फायदा घेऊन वाईट माणसाने त्या मंदिरातील पैसे चोरले.

 

आणि त्याचवेळी तो चांगला माणूस होता तो मंदिरात देव दर्शनासाठी आला होता आणि अर्जुना त्या माणसाचे दुर्दैव असे की त्या चांगल्या माणसावरच पैसे चोरल्याचा आळ सर्व लोकांनी घेतला त्याला सगळे वाईट साईट बोलू लागले. चोर म्हणू लागले त्याचा खूप अपमान करू लागली.म्हणून तो चांगला माणूस कसाबसा त्या मंदिरातून बाहेर आला मंदिरातून बाहेर रस्त्यावर आला तर एका बैलाने त्याला ठोकर दिली. तू गंभीर जखमी झाला. त्याच वेळी तो वाईट मनुष्य मंदिरातले चोरलेले पैसे घेऊन निघाला असता त्याला एक पैशाने भरलेली पोती सापडले तो म्हणाला आजचा दिवस किती चांगला आहे मंदिरात पैसे मिळाले आणि तिथून बाहेर पडल्यावर लगेच रस्त्यावर आपल्यालाही पैसे मिळाले हे सर्व त्या चांगल्या माणसाने ऐकले.

 

तो चांगला मनुष्य घरी आला त्यांनी घरातील सर्व देवी-देवतांचे मूर्ती आणि फोटो काढून टाकले तेव्हा बर रुष्ट होऊन तो जगू लागला. खूप दिवसांनी त्या चांगल्या माणसाचा आणि वाईट माणसाचा मृत्यू झाला.मृत्यू नंतर ते यमराजाच्या समोर गेले. तेव्हा चांगल्या माणसाने त्यांना प्रश्न विचारला मी तर नेहमी चांगले कर्म केले चांगलं वागलो नेहमी खरं बोललो तरी माझ्या वाट्याला दुःखंच का ? मला सारखा अपमान का मिळाला ? या प्रश्नावर यमराजांनी त्या चांगल्या व्यक्तीला उत्तर दिले की, जेव्हा बैलाने तुला ठोकर दिली तेव्हा तुझा मृत्यूचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू एका साध्या जखमेत रूपांतर झाला आणि तुझा मृत्यू टळला आणि त्या दुर्घटनेत तू वाचलास.

 

दुसरा वाईट व्यक्ती मनुष्य आहे त्याला राजयोग प्राप्त होणार होता. पण त्याच्या चुकीच्या कर्मामुळे तो एका पोतभर पैशाच्या चोरीत परावर्तित झाला आणि भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देईल हे सांगणे कठीण आहे. तुम्ही चांगलं कर्म करत राहायला देवी खरोखरच राहिला नेहमी चांगल्याची साथ दिली तर भगवंत तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देत असतो पण आपल्याला ते समजत नाही वाईट कर्माची फळे वाईटच मिळत असतात अशा लोकांना आयुष्यात कधी शांतता लाभत नाही समाजात मानसन्मान मिळत नाही.

 

काही वेळा तुम्ही चांगले कर्म करून चांगले वागूनही तुमच्या वाटेला काही वाईट गोष्टी येतात दुःख येतात पण भगवंत कमीत कमी त्रास असणाऱ्या वाईट गोष्टी आणि दुःख तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्मामुळे देत असतात त्यामुळे भगवंतांना कधीही दोष देऊ नका ते तुमच्यासाठी चांगल्यातली चांगली गोष्ट तुम्हाला मिळावी याचे नियोजन भगवंताने आधीच केलेली असते. आणि तुमच्यावर मोठे संकट येणार असते पण ते छोटे करून देव तुमच्या जीवनात देतो. तुम्ही जेवा माझ्यासोबतच वाईट का होती असा विचार करत असता,

 

तेव्हा मित्रानो तुमच्या आयुष्यात जी वाईट गोष्ट झाली आहे त्याच्या पेक्षा वाईट गोष्ट घडणार होती पण तुमच्या चांगल्या कर्मामुळे कमी वाईट गोष्ट तुमच्या वाट्याला आली हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो देणे चांगले कर्म करा नेहमी खरं बोला नेहमी चांगल्या गोष्टी करा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा याचा हिशेब देवाकडे असतो आणि याचं चांगलं फळ आपल्याला वेळोवेळी मिळत असतं.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.