मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करीत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दररोज न चुकता स्वामींची पूजा सेवा करत असतात आणि त्याचबरोबर महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी स्वामी समर्थांचे पारायण करत असतात आणि त्याचबरोबर दररोजच्या देवपूजा मध्ये स्वामींच्या नावाचा जप देखील करत असतात आणि मित्रांनो अशा पद्धतीने केलेल्या स्वामी सवेचे फळे ही आपल्यातील बऱ्याच जणांना मिळत असते आणि बऱ्याच जणांना स्वामी सेवेमुळे आलेले वेगवेगळे अनुभव देखील आपण ऐकत आणि वाचत असतो.
कारण मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा जी व्यक्ती अगदी मनापासून करत असते त्या व्यक्तीवर स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीवर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामी त्याची सुटका करत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण अनेक स्वामींचे अनुभव आणि प्रचिती ऐकतच असतो तर मित्रांनो आज आपण नागपूरच्या सचिन दादांचा अनुभव पाहणार आहोत तर मित्रांनो स्वामींनी सचिन दादांना कशा पद्धतीने संकटातून बाहेर काढले आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांची मदत केली आणि त्यांना आलेला स्वामी आणि नेमका कोणता आहे हे आता आपण पाहूया.
तर मित्रांनो सचिन दादा आपल्याला आलेला अनुभव सांगत असताना म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी माझी पत्नी खूप दिवसांपासून स्वामी सेवा करत आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने आमचे संपूर्ण घर सुखी आहे तर एके दिवशी आम्ही आमच्या कामानिमित्त मी माझे पत्नी आणि माझा एक मुलगा असे आम्ही सर्वजण नागपूरहून अमरावतीकडे निघालो होतो आणि कोथळी येथून पुढे आल्यानंतर कारंजा गाव होते आणि ते गाव सुरू होण्या अगोदर एका घाटामध्ये आमच्या गाडीचे पुढचे टायर फुटले आणि त्यामुळे चालू गाडीचे अचानकपणे टायर फुटल्यामुळे माझे हे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोखंडे ग्रीलवर जाऊन आदळली.
आणि त्यानंतर माझा मुलगा व माझी पत्नी पुढच्या काचेतून बाहेर जाऊन पडले तर मी गाडीच्या स्टेरिंग मध्ये अडकून बसलो होतो थोड्या वेळानंतर माझी पत्नी आणि माझा मुलगा उठून उभा राहिले आणि मला शोधत होते तर जेव्हा त्यांना मी स्टेरिंग मध्ये आढळलेला दिसलो तेव्हा त्यांनी मला गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात अपयश आलं आणि त्यानंतर त्यांनी रस्त्यावर जाऊन येणाऱ्या गाड्यांना लोकांना मदतीसाठी हाक मारली जवळजवळ तीन ते चार तासानंतर तेथे येणाऱ्या लोकांच्या मदतीने मला बाहेर काढण्यात आले आणि दवाखान्यांमध्ये घेऊन गेले.
दवाखान्यामध्ये गेल्यानंतर माझ्यावर उपचार सुरू झाले आणि त्यानंतर रात्रीच माझ्या पत्नीला स्वप्नामध्ये स्वामींचा दृष्टांत झाला आणि स्वामिनी स्वप्नामध्ये माझ्या पत्नीला सांगितले की, “काही काळजी करू नकोस माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्यावर कधीच कोणते संकट मी येऊ देणार नाही” आणि अशा पद्धतीने स्वामी माझ्या पत्नीच्या स्वप्नामध्ये आल्यानंतर त्याच स्वप्न मध्ये आमचा जो मुलगा होता तो स्वामीं बरोबर खेळत होता आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी माझी तब्येत सुधारली आणि मला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला.
घरी आल्यानंतर थोड्या दिवसांनी मी ज्या ठिकाणी आमचा अपघात झाला होता तिथे गेलो आणि तिथेच आमची गाडी होती त्याची पाहणी करण्यासाठी मी तिथे गेलो होतो तर गाडीमध्ये जी स्वामींची आणि गणपती बाप्पांची मूर्ती होती त्यामधील बाप्पांची मूर्ती व्यवस्थित होती परंतु स्वामींची मूर्तीची होती ती खूपच खराब झालेले होते म्हणजेच तुटलेली होती तर याचा अर्थ असा होता की आमच्यावर आलेले संकट हे स्वामींनी स्वतःवर घेतले आणि माझी संपूर्ण कुटुंबाचे रक्षण स्वामिनी केले, श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.