मित्रांनो आपल्यातील प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांना मानत असतो. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ते प्रत्येक देवी देवतांची पूजा अर्चना करीत असतात. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत. ते अगदी मनोभावे स्वामींची पूजा अर्चना करीत असतात. मित्रांनो स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच निराश होऊ देत नाहीत. त्यांच्या प्रत्येक अडचणीतून ते सुटका देखील करीत असतात. मित्रांनो अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. तर मित्रांनो असाच एक अनुभव आपण आलेला त्या भक्तांच्या तोंडूनच जानणार आहोत.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला ठाण्यात राहणाऱ्या सौ. वर्षा गायकवाड या ताईंचा मन हेलावणारा हा अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे. मित्रांनो हा अनुभव वाचताना तुम्हाला नक्कीच अंगावर शहारे येतील. डोळ्यात नक्कीच पाणी देखील येईल आणि काय बोलावं हे देखील तुम्हाला सुचणार नाही. तर मित्रांनो हा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
मित्रांनो या स्वामी अनुभवामुळे अनेक दुःख पीडित लोकांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील मिळतो. तसेच अनेक संकटातून देखील बाहेर कसे पडावे हे देखील समजून जाईल आणि लोकांना जगण्याची एक नवीन दिशा देखील मिळते.
मित्रांनो आता आपण जाणून घेऊया स्वामी अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये. तर मित्रांनो वर्षाताईंना आलेला अनुभव हा त्यांच्याच शब्दांमध्ये आपण आता जाणून घेऊया. मी वर्षा खरंच छान वाटते आज मी तुम्हाला माझा हा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. मी ठाण्यात राहते. माझी चुलत बहीण ही भुसावळ येथे राहते आणि तिच्यामुळेच मी स्वामी सेवेमध्ये आले .
त्यामुळेच मला या स्वामी सेवेमुळे प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद मिळाली. माझे सर्व अडचणी दूर झाल्या. खरंतर मला स्वामी म्हणजे काय हेही माहिती नव्हते. खरंच माझी काहीतरी पुण्याई असेल मागच्या जन्मीची म्हणून मी या सेवेमध्ये आले.
मित्रांनो मला स्वामींचे अनेक लहान-मोठे अनुभव हे सतत येत राहतात. परंतु मी मित्रांनो आज तुम्हाला अनुभव सांगणार आहे हा एक दिव्य अनुभव मला आलेला आहे. हा अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्या घरी मी मिस्टर आणि एक माझा मुलगा असे आम्ही राहतो. आम्ही ठाण्यात फ्लॅटवर असतो. तर बाकीची फॅमिली आहे ती सर्व गावी असते.
माझे मिस्टर हे जॉब करत होते. परंतु त्या जॉबमध्ये जे काही पैसे मिळत होते त्यामध्ये आमचे काहीच भागत नव्हते. मुलाचे स्कूल बाहेर जाणं यासाठी भरपूर पैसे लागत होते. मग आम्ही दोघांनी जॉब सोडून काहीतरी आपला व्यवसाय चालू करूया असे म्हटले. मग आम्ही एक फूड कॉर्नर चालू केलं.
परंतु मित्रांनो ते देखील चार महिन्यातच बंद पडले. नंतर आम्ही भाजीपाला तसेच फ्रुट मार्केट देखील घातलं. परंतु मित्रांनो त्यामध्ये देखील आम्हाला काहीच कमाई होईना. नंतर आम्ही साड्या आणि लहान मुलांचे कपडे विकण्यास सुरुवात केली. म्हणजेच एक दुकान टाकलं. परंतु मित्रांनो तेही काही दिवसातच बंद पडलं.
मित्रांनो आम्ही व्यवसाय चालू करताना आमचे सोने गहाण ठेवून व्यवसाय चालू करायला सुरुवात केली होती. परंतु मित्रांनो त्यामध्ये देखील आम्हाला यश प्राप्त होतच नव्हते. थोडे दिवस गेले की तो व्यवसाय आमचा बंदच पडायचा. एकदा तर आम्हाला अशी वेळ आली की आम्ही उपाशी देखील राहिलो. परंतु मित्रांनो आम्ही हिंमत हरलो नाही.
त्या दिवसांमध्ये खरंच आम्ही खूप टेन्शनमध्ये असायचो. दिवसभर फक्त विचार करत बसायचं आणि अशातच माझी मावस बहीण तेव्हा भुसावळ वरून ठाण्यात आली होती. तिच्या मुलाच्या शिक्षणाची ठाण्यात सोय करायची होती आणि त्यासाठी ठाण्यामध्ये आली होती.
त्यानिमित्ताने ती मला भेटली आणि तेव्हाच तिच्या बोलण्यातून मला स्वामी समर्थ बद्दल खूप काही कळालं. तिने मला युट्युब वरचे अनुभवही दाखवले आणि तेव्हा मला स्वामींच्या सेवा माहिती झाल्या. त्यावेळी मी काहीतरी नीट व्हावं सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू व्हावं म्हणून स्वामी सारामृत वाचण्यास सुरुवात केली. आमच्या बाजूलाच स्वामींचा मठ आहे तिथेही मी जात होते.
स्वामींचे मूर्ती मी घरातही आणली आणि अशातच मला तारक मंत्र्यांचे पाणी कसं बनवायचं हेही माहिती झालं. मला माझ्या बहिणीने सर्व माहिती दिली आणि त्याचवेळी मिस्टरांनी कर्ज काढून एक मिठाईचा शॉप अगदी आमचा शेवटचा मार्ग म्हणून एक मिठाईचा शॉप टाकायचं ठरवलं.
ते स्वीट मार्ट टाकायच पूर्ण काही ठरलं आणि ते टाकलेही. ताई म्हणतात मी रोज तिथे तारक मंत्र्यांचे पाणी शिंपडत होते. दिवसभर तारक मंत्र दुकानात लावत असे आणि तारक मंत्र्यांचे पाणी आम्ही दोघेही पिऊ लागलो. खरंच त्यावेळेस स्वामींनी दिव्य चमत्कार दाखवायला सुरुवात केली. जिथे सात व्यवसाय आमचे बंद पडले तिथे या तारकमंत्राच्या पाण्याने आम्हाला व्यवसायामध्ये यश मिळालं.
त्यावेळेस दिवाळीचा सण होता. त्यामुळे अनेक ऑर्डरी आम्हाला मिळू लागल्या. अनेक मोठमोठ्या कंपनीच्या देखील ऑर्डरी येऊ लागल्या आणि त्यावेळेस आमची भरपूर कमाई होऊ लागली. तिथून आम्ही अजून नवीन बिजनेस सुरू केले आणि आता सर्वच बिझनेस मध्ये आम्हाला यश मिळालं.
ताई म्हणतात आमचे दुकान झालं आणि तेही अगदी स्वप्नच वाटतं. पण स्वामी आयुष्यात आले आणि नशिबाची सर्व फासेच बदलून गेली.
तर मित्रांनो खरच किती सुंदर आणि किती मन हेलावणारा हा ताईंचा अनुभव होता. स्वामी आपल्या भक्तांना कधीच रिकामं ठेवत नाही. तसेच मित्रांनो आपल्या भक्तांना स्वामी कधीच एकटे सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक अडचणीमध्ये ते त्यांना मार्ग दाखवत असतात. त्यांना हिम्मत देखील स्वामी देत असतात. तर मित्रांनो याची प्रचिती तुम्हाला या ताईंच्या अनुभवातून नक्कीच कळाली असेल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.