घरातील सर्व लहान मोठ्यांनी वर्षातून एकदा करा हा घरगुती उपाय पोटातील सर्व जंत एका रात्रीत बाहेर, पोटाचे ‘हे’ १० आजार कधीच होणार नाहीत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आज आपण पोटामध्ये जंतू झाले असतील तर ते पूर्णपणे कसे काढून टाकणार आहोत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. हा अतिशय सुंदर आणि नॅचरल उपाय आहे. हा उपाय तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहेत आणि जर आपल्या पोटामध्ये कृमी असेल त्यानेच आपल्या पोटाला जखमा होतात आणि आपले पोट दुखते आणि पोटात जंतू असतील तर वारंवार पोट दुखतात व डोळे लाल होतात, जीभ पांढरी होते किंवा जीभ जड देखील होते किंवा तोंडातून दुर्गंधी देखील येते. लहान मुलाला जर हा त्रास असेल तर लहान मुलांना अशक्तपणा येऊ शकतो आणि पांढरे डाग सुद्धा शरीरावर येतात. यासाठी तुम्हाला पाणी भरपूर प्यायचे आहे. याबरोबरच खाण्यापिण्यावर ही लक्ष द्यायला हवे.

त्याचबरोबर मित्रांनो सध्याच्या काळामध्ये लहान मुले खूप बाहेरच्या पदार्थांचे सेवन करत असतात आणि त्यामुळे लहान मुलांना सतावणाऱ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे पोटात किडे होणे होय. ही समस्या फारशी गंभीर नसली तरी गंभीर स्वरूप धारण करू शकते. यामुळे होणारा त्रास आणि पोटदुखी खूप जास्त असते.

अशावेळी योग्य उपचाराच्या शोधात पालक असतात. बहुधा प्राथमिक उपचार म्हणून लहान मुलांवर घरगुती उपचारच करून पाहिले जातात. अनेक वेळा बाहेरचे उपचार घेऊन सुद्धा आणि महागडी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा आपली ही समस्या दूर होत नाही आणि अशावेळी आपल्याला पोटदुखी, अपचन यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

मित्रांनो आज आपण आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला असा एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी असा उपाय पाहणार आहोत. हा उपाय मित्रांनो जर आपण आपल्या घरामध्ये फक्त वर्षातून एकदा किंवा दोन वेळा केला तर यामुळे आपल्या पोटामध्ये जितकेही जंत झालेले आहेत किंवा जितकीही कीड आपल्या पोटामध्ये आहे तीही घाण आपल्या पोटामध्ये साचून राहिलेले आहे ती सर्व बाहेर निघेल.

त्याचबरोबर मित्रांनो आपले पोटही दररोज साफ होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आपल्याला पोटात संबंधित किंवा आपल्या पचन क्रियेबद्दल ज्या काही अडचणी व समस्या असतील त्याही लवकरात लवकर दूर होतील. तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची माहिती आता पण जाणून घेऊया.

तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला कोणकोणते पदार्थ लागणार आहेत याबद्दलची माहिती आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया. तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला ओवा, काळीमिरी आणि काळ मीठ म्हणजेच सेंधव मीठ. लागणार आहे. तर मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये आपल्याला सहज उपलब्ध होतात. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला हे तिन्ही पदार्थ नक्की मिळून जातात आणि यांचाच वापर करून आजचा हा आपल्याला आयुर्वेदिक उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना सर्वात आधी आपल्याला एका खलबत्त्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक छोटा तुकडा सेंधव मिठाचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तीन ते चार काळीमिरी सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत.

हे तिन्ही पदार्थ घेतल्यानंतर आपल्याला खलबत्त्यामध्ये ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजेच कुटून घ्यायचे आहे आणि त्याची एक पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे. मित्रांनो ही जी पावडर आता आपण तयार केलेली आहे याचाच वापर आपल्याला करायचा आहे. मित्रांनो मोठ्या माणसांसाठी ही आपण पावडर तयार केलेले आहे ती एक चमचा कोमट पाण्यामध्ये घ्यायची आहे.

याचे सेवन आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे आणि मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांच्या पोटामध्ये वारंवार जंत होत असतील किंवा त्यांचे पोट साफ होत नसेल तर अशावेळी मित्रांनो या पावडरीचा अर्धा चमचा तुम्हाला कोमट पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि ते पाणी व्यवस्थितपणे मिक्स करून त्यांना रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी प्यायला द्यायचा आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला सलग तीन दिवस दररोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे म्हणजेच आपण पावडर तयार केलेले आहे ही पावडर एक चमचा आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर याचे सेवन आपल्याला करायचे आहे तर मित्रांनो हा उपाय करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हा उपाय जेव्हा आपण करणार आहोत त्या दिवसांमध्ये म्हणजेच या तीन दिवसांमध्ये आपल्याला मिठाई सारखे अत्यंत गोड असे पदार्थ खाणं टाळायच आहे.

यामुळे याचा उपयोग होत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरावर काम करावं असं वाटत असेल तर या काळामध्ये आपण मिठाई सारखे गोड पदार्थ खाणे टाळायच आहे. मित्रांनो असा हा आयुर्वेदिक उपाय तुम्ही वर्षातून फक्त एकदा नक्की करून पहा. यामुळे तुमच्या पोटांमध्ये असणारे सर्व जंत निघून जातील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.