मित्रांनो, आज-काल अनेकांचे दात कीडतात. याचे प्रमाण खूपच वाढत चाललेले आपल्याला दिसून येत आहे. दात किडण्याचे पहिले कारण म्हणजे साखर आणि दुसरे म्हणजे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जसं मैदा. जेव्हा आपण साखरेपासून बनलेला किंवा मैद्यापासून बनलेला एखाद्या पदार्थाचे जास्त सेवन करतो किंवा जास्त प्रमाणात खातो तेव्हा तोंडातील किटाणूंना जास्त चांगलं अन्न मिळतं आणि हे खाऊन किटाणू लॅक्टिक ऍसिड सोडतात. दात कीडल्यानंतर मग आपल्याला खूपच त्रास सहन करावा लागतो. दात कीडल्यानंतर त्याच्या वेदना देखील खूपच आपणाला असह्य होऊ लागतात.
हेच लॅक्टिक एसिड आपल्या दातावरील थर वितळवण्यासाठी कारणीभूत होतं. हे सुरक्षा कवच वितळतं आणि दातात कीड निर्माण करू लागतो. दातावर छोटे छोटे काळे डाग येतात. म्हणून म्हणतात की जास्त गोड खाल्ल्याने दात किडायला सुरुवात होते.
मित्रांनो दात किडू नयेत यासाठी गोड पदार्थ कमी प्रमाणात खावेत. त्याप्रमाणे दाताला चिकटणारे किंवा चिटकून बसणारे पदार्थ कमी खाणं गरजेचं असतं. मैदा साखर इत्यादीमुळे जास्त दाताला कीड लागते. त्याच प्रमाणात निसर्गात अशाही काही गोष्टी किंवा अशाही काही वस्तू आहेत ज्यांचा वापर करून आपण दाताला लागलेली कीड कमी करू शकतो. चला तर जाणून घेऊयात अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करून आपण दातातील कीड कमी करू शकतो.
मित्रांनो, दाताला कीड लागणं याच मुख्य कारण आहे तोंडात असणारे बॅक्टेरिया किंवा छोटे जीवजंतू किंवा किटाणू आपल्या तोंडात लहानपणापासून असतात. जेव्हा आपण दाताची किंवा तोंडाची व्यवस्थित काळजी घेत नाही तेव्हा त्यांची संख्या वाढते आणि ती कीड लागण्यास कारणीभूत होतात. आपण रोज ब्रश करतो तरीही आपल्या दाताला कीड लागते कशी? या गोष्टीचा आपण विचार करतो.
पांढरे, चमकदार, आणि निरोगी दात प्रत्येकाला हवे असतात. जशी शरीराच्या बाकी अवयवांची स्वछता जरूरी असते, त्याचप्रमाणे, दातांची काळजी घेणे खूपच जरूरी असते. आपण जेव्हा हसतो, तेव्हा आपले दात दिसतात. उत्तम प्रकारे सरळ रांगेत असलेले दात हे नेहमीच एखाद्या व्यक्तीच्या आकर्षणात भर घालतात.
तेच दात जर स्वछ असतील, तर ते आपल्या सौंदर्यात अजूनच भर घालतात. अनियमित जीवनशैली आणि चुकीचे खाणे-पिणे यामुळे दातामध्ये कीड निर्माण होते आणि दात वेदना द्यायला सुरू करतात. दातदुखी हे अतिशय त्रासदायक दुखणे आहे. त्यामुळे आपल्याला रोजची कामे करणे पण कठीण होते.
त्याच्या वेदांनांनी आपली मानसिक अस्वस्थता वाढते. यातून सुटका होण्यासाठी काही लोक पेनकिलर घेतात. पण हा झाला तात्पुरता उपाय. यामुळे दातातील कीड मरत नाही. जर यावर वेळीच उपाय केला नाही, तर ही समस्या तुमच्या दातांना आतून कमजोर करून खिळखिळे करून सोडते. दातांची मुळे जर सैल झाली, तर दातदुखी होऊ शकते. यावरचे डॉक्टरचे उपाय महागडे असतात. तर मग आपण थोडे घरगुती उपाय करून बघायला काय हरकत आहे.
तुम्ही सुद्धा ह्या समस्येमुळे बैचैन असाल, तर घाबरू नका. आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही या समस्येवर मात करू शकाल. दिवसातून रोज दोनदा दातांची स्वछता करा आणि तुम्ही हे जाणता का लवंग ही दातांच्या समस्येवर कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. लवंग एक अशी औषधी आहे जे गुणांचे भांडार आहे.
दातातील वेदना किंवा दातांमध्ये अडकलेले कीटाणूचा सामना करण्यासाठी लवंग आपली मदत करते. लवंगेत अॅंटी-बैक्टेरियल गुणधर्म आहेत. लवंगेमुळे तुमच्या दातातील जंतुसंसर्ग नाहीसा होतो, कीड मरते. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे, की लवंगेच्या तेलात कापसाचा बोळा बुडवून तो जिथे दातात कीड लागली आहे, त्यावर ठेवायचा आहे.
तुम्ही अजूनही एक उपाय करू शकता, त्यासाठी तुम्हाला २-३ लवंगा कुठून त्याचे चूर्ण बनवायचे आहे. कीड लागलेल्या दातावर ते ठेवून थोडी लाळ बनू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करा. नियमित जर तुम्ही असे केलेत, तर तुम्हाला नक्कीच आराम पडेल. तसे अनेक उपाय आहेत, पण हा उपाय सगळ्यात उत्तम आहे.
त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक सोपा उपाय आपण आपल्या दात दुखी आणि दात किडणे या समस्येवर करू शकतो तो आहे तुरटी संबंधित. मित्रांनो तुरटी आपल्या दातांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला खूप मदत करते आणि म्हणूनच याचा वापर करून आपण आपल्या दाता संबंधित अनेक समस्या तर यासंबंधीचा उपाय करत असताना आपल्याला अर्धा चमचा तुरटी पाऊडर करून, मोहरीच्या तेल थोडे कोमट करून त्यात तुरटी पाऊडर मिसळा व एक पेस्ट तयार करा.
ती पेस्ट कीड लागलेल्या दाताला लावा. यामुळे सुद्धहा तुमच्या दाताच्या दुखण्याला आराम मिळू शकेल. तुमचे दाताचे दुखणे कमी होईल व सतत हा प्रयोग केला, तर दातातील कीड कायमची नाहीशी होईल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.