मित्रांनो, प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावे असे वाटतच असते. बऱ्याच महिलांना आपण चार चौघांमध्ये आकर्षक दिसावे, आपण उठून दिसावे यासाठी त्या खूपच प्रयत्न करीत असतात. म्हणजेच बरेच क्रीम्स लावणे तसेच ब्युटी पार्लरचा सल्ला घेणे याकडे त्यांचा जास्त कल असतो. गालावरच्या पिंपल्समुळे जे खड्डे पडतात ते दिसायला खूप वाईट दिसतात. ते आपल्या संपूर्ण चेह-याचे सौंदर्य बिघडवण्याचे काम करतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक ब्युटी ट्रीटमेंटचा आधार घेतात. मात्र यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो.
कोणत्याही स्त्रीला आपली त्वचा ही सुंदर आणि डागविरहीत राहावी असेच वाटते. कारण शेवटी स्वच्छ आणि सुंदर चेहराच तर स्त्रीचा खरा दागिना असतो. पण शेवटी त्वचा म्हणजे सुद्धा एक अवयवच आहे त्यामुळे इतर अवयवांप्रमाणे त्वचेच्या समस्याही येणारच! आपण कितीही काळजी घेतली तर ज्या समस्या यायच्या त्या येणारच. पिंपल्स, मुरूम, फोडी यांसारख्या समस्या तर त्वचेचे पूर्ण सौंदर्यच घालवून बसतात. काही काही वेळा तर त्वचेवर पडणारे खड्डे आणि काळे डाग अजुनच खराब दिसतात.
बऱ्याच लोकांसाठी पिंपल्स ही एक मोठी समस्या असते. बहुतेक मुरुम ४-५ दिवसात बरे होतात. पण पिंपल्स बरे झाल्यानंतरही, त्याचे काळे डाग किंवा खुणा काढणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत पिंपल्सचे डाग दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत हे घरगुती.
आपल्याला या उपायासाठी कोणकोणत्या पदार्थांची आवश्यकता आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे या विषयी सविस्तर जाणून घेऊया. तर मैत्रिणींनो आपल्याला पहिल्यांदा एक चमचा बेसन पीठ घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे.
नंतर त्यामध्ये थोडसं गुलाब जल घालायचे आहे आणि याची व्यवस्थित आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपणाला आपल्या चेहऱ्यावरती लावायचे आहे. ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनिटे तसेच राहू द्यायचे आहे आणि नंतर आपण आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
मित्रांनो तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केला तर यामुळे तुमचे जे काही चेहऱ्यावरचे पिंपल्स असतील, काळे डाग असतील हे निघून जाण्यास मदत होईल.
तर मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे हळद आणि दूध याचा आहे. यासाठी आपणाला दुधावरची साय लागणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला एक चमचा दुधावरची साय घ्यायची आहे आणि त्या सायमध्ये आपणाला चिमूटभर हळद मिक्स करायची आहे. तर मित्रांनो ही हळद मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही ती हळद आणि मिक्स केलेली जी साय आहे ही साय आपणाला आपल्या चेहऱ्यावर जिथे पिंपल्स उठले आहेत तिथे फक्त लावायचे आहे.
पूर्ण चेहऱ्यावरती अजिबात लावायची नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला पिंपल उठले आहे त्या ठिकाणी लावायचे आहे आणि थोडीफार आपल्याला ती वाळू द्यायची आहे. पूर्णपणे वाळू द्यायची नाही. आपणाला थोडीफार वाळल्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी झोपताना करायचा आहे.
आठवड्यातून तीन ते चार वेळा जर तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे पिंपल्स दूर होतील. म्हणजेच ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले दिसतील किंवा पिंपल्स येणार आहेत याची जाणीव होईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे.
यानंतरचा उपाय म्हणजे गुलाब पाणी. मित्रांनो यासाठी तुम्ही गुलाब पाणी हे कॉटन बॉल वरती घेऊन जिथे तुम्हाला पिंपल्स उठले असतील त्या ठिकाणी या कॉटनच्या साह्याने आपणाला गुलाब पाणी लावायचे आहे. रात्री झोपताना तुम्ही हे गुलाब पाणी लावायचं आहे. म्हणजे रात्रभर हे गुलाब पाणी त्या पिंपल्सवर राहील आणि मित्रांनो सकाळी उठून थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
मित्रांनो हा जर उपाय तुम्ही रोज रात्री नियमितपणे केला तर यामुळे तुमचा चेहरा हा ग्लोइंग होण्यास नक्कीच मदत होईल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मासिक पाळीच्या अगोदर किंवा मासिक पाळी नंतर चेहऱ्यावरती पिंपल्स उठतात आणि हे पिंपल्स खूपच मोठे होतात. ही समस्या प्रत्येक मुलींना प्रत्येक स्त्रियांना असते.
तर मित्रांनो यासाठी एक चमचा मध आणि चिमूटभर हळद घालून मिक्स करून तुम्हाला चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी पिंपल्स उठले आहेत त्या ठिकाणी लावायचा आहे. मित्रांनो जर तुमच्या एका गालावर पिंपल्स उठले असतील तर एकाच गालावर तुम्ही ही पेस्ट लावायची आहे.
पूर्ण चेहऱ्यावरती अजिबात लावायची नाही. जिथे पिंपल्स उठले आहेत त्या ठिकाणी फक्त मध आणि हळद मिक्स केलेली पेस्ट लावायची आहे.
दहा ते पंधरा मिनिटं आपणाला तसेच राहू द्यायचे आहे आणि नंतर दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतर आपणाला थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्ही हा उपाय जर केला तर यामुळे तुमचे जे काही पिंपल्स असतील किंवा काळे डाग असतील हे सर्व दूर होतील.
तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स उठल्यामुळे खूप त्रस्त आहात. तसेच पिंपल्स उठल्यानंतर जे आपल्या चेहऱ्यावरती काळे डाग पडतात हे काळे डाग घालवायचे असतील, पिंपल्स घालवायचे असतील, एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा हा चांगला व्हावा असे जर वाटत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक झालेला जाणवेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.