मित्रांनो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच केस आज काल पांढरे होत आहेत पांढरी केस आपली सौंदर्य खालावत असते कारण पांढरी केस असल्यामुळे आपल्याला ते दिसायला कसतरी दिसतो त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची क्रिमे लावत असतो.क्रीम देखील आपण हाय क्वालिटीचे लावत असल्यामुळे आपल्याला डोळ्याच्या समस्या देखील येऊ शकतात कारण वेगवेगळ्या क्रीम या त्याच्यामध्ये केमिकल देखील असतं त्याच्यामुळे आपल्याला अनेक समस्या देखील होऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला मी आज उपाय सांगणार आहे त्या उपायासाठी तुम्हाला जास्त पैसा देखील खर्च करावा लागणार नाही व तुमचा वेळ देखील जास्त जाणार नाही चला तर मग जाणून घेऊया तो उपाय नेमका आहे कोणता.
मित्रांनो तुम्हाला तुमची कितीही केस पांढरी झाली तरी मार्केटमध्ये जे काय मिळतात तसेच वेगळे प्रकारची क्रीम मिळतात किंवा पार्लरमध्ये देखील वेगळे प्रकारचे क्रीम अवेलेबल असतात त्या तुम्हाला कधीच युज करायचा नाहीत कारण त्याच्यामुळे तुमच्या केसांवर तर परिणाम होतोच तर त्याच बरोबर डोळ्यावर देखील त्याचा परिणाम दिसायला लागतो तुम्हाला तुमचे केस काळे करायचे असतील तर फक्त घरगुती उपायानेच करायचा आहे कारण घरगुती उपाय आहे लहानांना व मोठ्यांना कोणतेही बाधा पोचवत नाही व त्यामुळे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट देखील होत नाही.
मित्रांनो यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे तांब्याची कढई तुम्हाला तांब्याची एक कढई घ्यायची आहे. तुम्हाला गॅसवर ठेवून द्यायचे आहे व गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे हळदीची पावडर घालायची आहे आपण जे स्वयंपाक घरांमध्ये वापरतो तीच हळद आपल्याला घ्यायची आहे आणि ते कढईमध्ये थोडंसं कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
जोपर्यंत हळदीचा कलर थोडा ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे एक ते दोन मिनिटच आपल्याला कढईमध्ये ते भाजून घ्यायचा आहे. ज्या लोकांना मेहंदी लावणे आवडत नसेल त्या लोकांनी हा उपाय केला तरी देखील चालू शकतो कारण ह्या उपायाने त्यांचे केस पांढरे होणार नाहीत.
त्याच्यानंतर तुम्हाला दालचिनी लागणार आहे म्हणजेच की दालचिनीची पावडर लागणार आहे ती सहजच आपल्या किचनमध्ये मिळून जाते कारण मसाला मध्ये ते असतेच आपल्याला इथे फक्त अर्धा चमचा लागणार आहे याच्यामुळे आपले केस जे तुटतात गळतात ते तुटायची आणि गळायचे बंद होणार आहेत ते एकदम घट्ट देखील होणार आहेत याच्यानंतर आपल्याला खोबरेल तेल घ्यायच आहे.
जे तुम्ही वापरता ते कोणतेही घेतला तरी देखील चालू शकते तेल त्याच्यामध्ये घातल्यानंतर ते सर्व एकजीव म्हणजेच मिश्रण करून घ्यायचा आहे पाच ते सहा चमचे तुम्हाला तेल त्याच्यामध्ये घालायच आहे तेल घातल्यानंतर ते एकदम एकसारखं होईपर्यंत हलवायचा आहे आणि गॅस वर तसेच एक ते दोन मिनिटं बारीक गॅस करून ते हलवायचा आहे जोपर्यंत त्याचं घट्ट असं थोडं फार मिश्रण होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन तास त्याला तसेच ठेवून द्यायचा आहे.
हे मिश्रण आपला केसांना लावायचा आहे ते मिश्रण आपल्याला कॉटन बॉलच्या मदतीने लावायचा आहे. लावून झाल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं मसाज देखील करायचा आहे आणि लावून झाल्यानंतर न दोन तास आपल्याला परत तसेच ठेवून द्यायचा आहे दोन तासानंतर जो तुम्ही शाम्पू वापरता त्या शाम्पू ने केस धुऊन घ्यायचे आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता दालचिनी मध्ये पोषण तत्व जास्त असल्यामुळे त्याचा कोणताही साईड इफेक्ट होणार नाही हा उपाय तुम्ही महिन्यातून दोन वेळा किंवा चार वेळा करू शकता याचा तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.