मित्रांनो आपल्या देव घरामध्ये आपण आपल्या आराध्याची म्हणजेच आपण ज्या देवांवर भक्ती करत असतो त्या देवांची पूजा करत असतो. या देवांमध्ये पुजल्या जाणाऱ्या देवांच्या मुर्त्या या काही काळानंतर खराब होतात किंवा फोटो असतो तो देखील खराब होतो. या मुर्त्या तशाच पुजाव्या का? किंवा त्या मुर्त्या किंवा फोटोचे काय करावे? याबद्दलची सर्व पूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
आपल्या देवघरातील ज्या खराब झालेल्या मूर्ती किंवा खराब झालेले फोटो हे पाण्यात सोडावे की मंदिरामध्ये ठेवावे. तर हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो की खराब झालेले फोटो किंवा मुर्ती चे नेमकं करायचं काय ? आपल्या देवघरातील ज्या मुर्त्या असतात त्या मुर्त्या जर भंग झाल्या किंवा फोटो असतील ते खराब झाले असतील व त्याची आपण नित्यनेमाने जर पूजा करीत राहिलो तर आपल्याला देव बाधेचा फटका बसतो.
आपले नुकसान होते. त्यामुळे मूर्तीभंग झाली असेल किंवा विद्रूप झाली तर ती मूर्ती पाण्यात विसर्जित करावी. देवाच्या फ्रेम, देवाचे फोटो हे चकचकित असावे. फ्रेमला वाळवी लागली, फ्रेम खराब झाली तर त्या पाण्यात विसर्जित कराव्या. परंतु देवाच्या मुर्ती, देवाच्या फोटो फ्रेम विसर्जित करण्याचे काही नियम आहेत. ते नियम म्हणजे मूर्ती व फ्रेम सूर्यास्ताच्या पूर्वी पाण्यात विसर्जित कराव्या.
त्यांची व्यवस्थित पूजा करावी. त्या देवांचे क्षमायाचना करावी व त्या पाण्यामध्ये विसर्जित कराव्यात. आपण काही ठिकाणी असे पाहिलेले आहेत की, नको असलेल्या खराब झालेल्या मुर्त्या किंवा प्रतिमा ते मंदिरामध्ये सोडतात. त्या मंदिरामध्ये अगदी बेवारसपणे ते सोडून निघून जातात. सोडलेल्या प्रतिमा मंदिराच्या आवारात केविलवाण्या अवस्थेत पडलेल्या आपल्याला अनेकदा दिसतात.
त्या स्थितीतील प्रतिमा बघून आपल्याला आनंद वाटेल की आपलं मन विषण्ण होईल? ते एकदा तुम्ही तपासून पहा. अशा प्रकारे बेवारस सोडणारे जे काही महाभाग आहेत ते एक तर बिनडोक असतील. याच्यात मात्र कुठलीही मात्र शंका नाही. खरं तर समस्त हिंदूंनी देवदेवतांची विटंबना होणार नाही यासाठी आपण स्वतः जागरूक राहायला हवं.
देवाची विटंबना रोखण ही सुद्धा देवांची उपसानाच आहे.हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा.त्यामुळे कृपया करून आपल्या घरातील ज्या काही अशा मुर्त्या असतील, फोटो असतील त्यांची विधीवत चांगल्या पाण्यामध्ये त्यांच विसर्जन करावे व त्यांची क्षमायाचना करावी.
अशाप्रकारे आपल्या देव घरामध्ये असलेले फोटो किंवा मूर्ती खराब झाले असतील तर त्या आपला देव घरामध्ये पूजनात ठेवू नये. त्यांची विधी पूर्वक क्षमा याचना करून पाण्यामध्ये विसर्जन करावे.