महाशिवरात्रीला जरूर पाळा हे नियम, चुकूनही करू नका ही कामे तरच व्रत होईल पूर्ण महाशिवरात्री व्रताचे नियम …!!

वास्तु शाश्त्र

या वर्षी 2023 मध्ये महाशिवरात्री 18 फेब्रुवारीला शनिवारी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते, असे मानले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम जाणून घेऊया.

तर मित्रांनो महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये आणि महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा आणि महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी.

आणि त्याच बरोबर महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता आणि महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो जर या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर भगवान शंकरांच्या शिवलिंगाला आपल्याला अभिषेक देखील या दिवशी करायचा आहे, मित्रांनो जर तुमच्या घराजवळ एखाद्या शिवमंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अभिषेक करू शकता किंवा जर नसेल अशावेळी घरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर तुम्ही अभिषेक या दिवशी करायचा आहे.

मित्रांनो अभिषेक हा पाण्याचा किंवा दुधाचा, मधाचा आणि पंचअमृत यांचा अभिषेक तुम्ही भगवान शंकरांना करू शकता. तर अशा पद्धतीने सर्वात आधी अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्या शिवलिंगाची पूजा करून घ्यायचे आहेत म्हणजेच यामध्ये तुम्हाला शिवलिंगावर चंदन किंवा भस्म लावायचे आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला हळद कुंकू याचा वापर करायचा नाही. मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रात सांगितले ल्या माहितीनुसार भगवान शंकरांच्या पूजेमध्ये हळद कुंकू वापर करणे अत्यंत अशुभ मानले गेलेले आहेत, त्यानंतर आपल्याला त्या शिवलिंगावर बेलाचे पाने अर्पण करायचे आहे.

आणि त्यानंतर अशा पद्धतीने त्या शिवलिंगाची आपल्याला पूजा करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जो काही नैवेद्य आपण या दिवशी केलेला असेल तो भगवान शंकरांना म्हणजेच त्या शिवलिंगाला दाखवायचा आहे, आणि त्यानंतर अशा पद्धतीने पुजा करून घेतल्यानंतर आपल्याला भगवान शंकरांच्या कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो जितके वेळी तुम्हाला शक्य होईल तितके आणि तुम्ही या मंत्राचा करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दिवसभरही या मंत्राचा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या दिवशी भगवान शंकरांचे व्रत करायचे आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.