मुलीच्या प्रेमात आयुष्य पूर्णपणे उध्वस्त झालेले आणि स्वामीसेवा भावस्पर्शी सत्य घटना वाचून तुम्हालाही स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. मनोभावे आणि श्रद्धेने ते स्वामींची सेवा करीत असतात. प्रत्येक अडचणीतून स्वामी आपल्याला बाहेर काढतील असा विश्वास प्रत्येक भक्तांना असतो. मित्रांनो स्वामींची अनेक प्रचिती अनुभव बऱ्याच जणांना आलेले आहेत. तर मित्रांनो असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत. हा अनुभव आहे श्रीकांत पाटील यांचा. हा अनुभव आपण श्रीकांत पाटील यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

नमस्कार मी श्रीकांत पाटील मी लातूर मध्ये राहतो. मला कधीही देवसेवेबद्दल आकर्षण नव्हते. माझी आई मात्र स्वामी समर्थांची भक्त होती. ती स्वामींची सेवा देखील करायची आणि त्यावेळेस माझा देवावर विश्वास देखील नव्हता आणि देवपूजा देखील मी करीत नव्हतो. फक्त मी दररोज आई-वडिलांच्या पाया पडत होतो.

त्यावेळेस माझं एका मुलीवर प्रेम होतं अगदी जीव तोडून मी त्या मुलीवर प्रेम करत होतो. माझी आई मला सांगत होती की ती मुलगी तुझ्या लायकीची नाही ती तुला फसवत आहे. परंतु मी याकडे दुर्लक्ष केल. कारण माझं त्या मुलीवर खूप प्रेम होतं माझ्या मित्रांनी देखील मला हे सांगितलं होतं की ती मुलगी तुला फसवत आहे. परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

परंतु मला काही दिवसांनी समजलं की ती मुलगी माझ्यावर प्रेम न करता ती माझ्या पैशांवर प्रेम करते आहे आणि काही दिवसानंतर ती मला सोडून गेली. त्यावेळेस मला खूपच धक्का बसला आणि मी टेन्शनमध्येच राहिलो. कारण मला आई सांगत होती की ती मुलगी तुझ्यावर प्रेम करत नाही परंतु मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याचा मला खूपच पश्चाताप होत होता.

त्यावेळेस मग मला आईने समजावले की तू काळजी करू नकोस. यामुळे तुझ्यात जीवनामध्ये काहीतरी चांगलं होणार असेल. त्यामुळे असे घडल असेल. परंतु काही केलं तरी प्रेम हे विसरता येत नाही आणि प्रेम हे आंधळं असतं. मला सतत त्या मुलीचा विचार यायचा आणि मला खूपच त्रास व्हायला लागला.

मग त्यावेळेस माझ्या आईने मला स्वामी समर्थांना शरण जा असे सांगितले. म्हणून मी आईकडे पाहून आईला वचन दिले की मी नक्की असे करेन. म्हणून मी स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मला खूपच चांगले देखील वाटू लागले आणि अनेक प्रकारचे विचार डोक्यात येत होते ते देखील कमी झाले.

नंतर मी आईबरोबर केंद्रामध्ये देखील जायला लागलो आणि त्यावेळेस माझी एका मुलीशी ओळख झाली. ती मुलगी देखील स्वामींच्या केंद्रामध्ये येत होती. त्या मुलीची आणि माझ्या आईचे अगोदर पासूनच ओळख होती आणि माझ्या आईला पसंती देखील होती. परंतु मी माझं ब्रेकअप झाल्यानंतर मी ठरवले होते की कोणावरही प्रेम करायचे नाही.

नंतर त्या मुलगीची आणि माझी मैत्री वाढली आणि त्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमा मध्ये झाले. मला देखील त्या मुली विषयी आकर्षण वाटत होते. परंतु मी ठरवले होते की कोणाच्याही प्रेमात पडायचे नाही. तर त्या मुलीने एके दिवशी मला सांगितले की माझे तुझ्यावर प्रेम आहे. त्यावेळेस मी काहीच बोललो नाही.

नंतर तिने पाच सहा वेळा मला असं सांगितलं की माझं प्रेम आहे. तरी देखील मी काहीच उत्तर दिले नाही. मग त्यावेळेस त्या मुलीने माझ्या आईला सांगितले मग त्यावेळेस मला आई म्हणाली की बाळा तू विचार करू शकतोस. मुलगी चांगली आहे आणि मला देखील हे माहीत होतं की ती मुलगी निस्वार्थ भावनेने सगळ्यांना मदत करते आहे आणि ती मनाने खूपच चांगली आहे आणि ती माझ्या आईला आवडत होती.

परंतु मी काहीच उत्तर दिले नाही. मला देखील ती मुलगी खूपच आवडायची व त्यावेळेस मग मला आईने खूप समजावले आणि मग मी नंतर त्या मुलगीला हो म्हणून उत्तर दिले. नंतर ज्यावेळेस मुलगीच्या घरच्यांना माझ्या अफेअर बद्दल समजलं म्हणजेच माझा ब्रेकअप झालेला होता त्याबद्दल समजलं. त्यामुळे तिच्या घरच्यांनी विरोध केला आणि लग्न लावून देणार नाही असे सांगितले.

मग त्यावेळेस त्या मुलगीचे आणि माझे बोलणे बंद झाले. ती केंद्रामध्ये देखील येत नव्हती. नंतर मग मी स्वामींना सर्व काही माझ्या मनातील सांगितले म्हणजे माझी आणि त्या मुलीची भेट ही तुमच्याच केंद्रामध्ये झाली आणि तुम्ही माझ्या बाबतीत असे का केले. मी त्या मुलीवर निस्वार्थपणे प्रेम केले आहे आणि तिने देखील माझ्यावर निस्वार्थपणे प्रेम केले आहे. या मुलिशिवय नंतर आता आयुष्यामध्ये कोणाबरोबर हे लग्न करणार नाही. लग्न केले तर त्याच मुलीशी करणार आहे असे मी स्वामींना सांगितले.

नंतर मी स्वामी गुरुचरित्र सारामृत वाचन वाचायला सुरुवात केली. शुक्रवारपासून मी स्वामी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली नंतर सात दिवस झाल्यानंतरच त्या मुलगीच्या आईचा फोन आला आणि माझ्या मुलीचे लग्न हे तुझ्याबरोबरच लावून देईन आणि तू आम्हाला पसंत आहे असे सांगितले.

त्यावेळेस माझा आनंद गगनात मावेना. खूप दिवसांनी मग माझे आणि त्या मुलगीचे बोलणे झाले आणि आम्ही दोघीजणी मग स्वामींच्या केंद्रांमध्ये एकत्रितपणे गेलो आणि स्वामींचे दर्शन घेतले. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की माझी काही माझी अडचण होती ती सर्व स्वामींनी सोडवली आहे आणि माझ्या जीवनामध्ये त्या मुलगीचे येणे तसेच सुख येणे देखील हे सर्व काही स्वामींनीच केले आहे.

तेव्हापासून मात्र माझा स्वामींवर खूपच विश्वास वाढला आणि आम्ही दोघे देखील स्वामींचे सेवा करू लागलो आणि आज माझा संसार सुखाने सुरू आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.