मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये तसेच कोणत्याही प्रकारची संकट येऊ नये, कामांमध्ये यश प्राप्त व्हावे घरामधील वातावरण हे प्रसन्नतेचे राहावे असे वाटतच असते आणि त्यासाठी मग प्रत्येक जण हा आपापल्या देवी देवतांच्या सेवा करीत असतात. व्रत करीत असतात. तसेच मित्रांनो मेहनत देखील ते घेत असतात. जेणेकरून आपल्या कुटुंबांच्या गरजा भागवल्या जाव्यात. परंतु मित्रांनो एवढे कष्ट करून ते तसेच देवधर्म करून देखील आपल्या वाट्याला अनेक प्रकारची दुःख येत असतात. म्हणजेच अनेक प्रकारच्या अडचणी, संकटे आपल्या कामांमध्ये येत असतात किंवा त्या कामांमध्ये भरपूर साऱ्या अडचणी निर्माण होऊन आपल्याला अनेक कामांमध्ये अपयश देखील प्राप्त होते.
तर मित्रांनो त्यावेळेस मग आपणाला असा प्रश्न पडतो की, मी एवढे कष्ट करून तसेच सेवा, व्रत करून देखील आपणाला आपल्या जीवनामध्ये संकटांचा सामना का करावा लागतो? आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकारच्या व्यक्ती असतात की जे खूप मेहनत कमी घेतात तसेच मित्रांनो त्यांचे वागणे देखील इतरांशी चांगले नसते ते कायमच इतरांचा अनादर करत असतील.
परंतु त्यांच्या जीवनात मात्र सुख असते म्हणजे त्यांना कोणतेही प्रकारच्या अडचणी नसतात. त्यावेळेस मग मात्र आपणाला असा प्रश्न पडतो की मी एवढी सेवा करून देखील माझ्या नशिबामध्ये एवढ्या अडचणी का म्हणजे चांगल्या माणसासोबत वाईटच का घडते?
तर मित्रांनो तुम्हाला देखील असा प्रश्न पडलाच असेल तर मित्रांनो या प्रश्नावर स्वामी महाराजांनी नेमके आपणाला उत्तर काय सांगितले आहे याविषयीचीच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो स्वामी समर्थांचे आपल्यापैकी बरेच जण भक्त आहेत. मनोभावे ते श्रद्धा देखील करीत असतात. जेणेकरून आपल्या जीवनामधील सर्व अडचणीतून बाहेर काढतील.
चांगल्या माणसासोबत नेहमी वाईटच का घडते असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर स्वामींनी यावर नेमके उत्तर काय दिले आहे हे आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट मध्ये वास्तव्यास होते. ते त्या ठिकाणी असताना अनेक लोक त्यांची सेवा करण्यासाठी त्यांच्या मठांमध्ये जायचे. तर असेच एक दिवस स्वामींच्या मठांमध्ये बरेच लोक जमलेले होते आणि त्यावेळेस एका व्यक्तीने स्वामींना असा प्रश्न विचारला की चांगल्या माणसांसोबतच नेहमी वाईटच का घडते?
म्हणजेच मी एवढा सगळ्यांशी चांगला वागून, मेहनत घेऊन देखील माझ्यासोबत वाईटच का घडते. म्हणजेच माझ्या जीवनामध्ये अडचणी या कमीच का होत नाहीत. त्यावेळेस स्वामी समर्थ त्या व्यक्तीला म्हणतात की आपल्या कर्मानुसार आपणाला फळ हे प्राप्त होते. स्वामी त्या व्यक्तीला उत्तर सांगत असतानाच एक व्यक्ती मध्येच येऊन स्वामींना म्हणाला माफ करा स्वामी महाराज. मी तुमचे म्हणणे मध्येच थांबवत आहे त्यावेळी स्वामी महाराज म्हणाले की तुझ्या मनातील काय प्रश्न आहे तू विचारू शकतो.
त्यावेळेस तो व्यक्ती म्हणाला की माझे पण पणजोबा खूपच मोठे राजे होते. त्यांच्या हाताखाली नोकर चाकर होते. त्यांना कशाचीच कमतरता नव्हती. सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध होत्या. माझे पंजोबा हे लोकांचा आदर अजिबात करायचे नाहीत. कायम त्यांच्याशी हे उलट सुलट बोलत त्यांचा अनादर करत होते. ते स्त्रियांचा अपमान करत होते तसेच इतरांची संपत्ती लुटून ते आपले राज्य वाढवत होते.
एवढे करून देखील त्यांना कधीही आर्थिक संकटांचा सामना करावा लागला नाही म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये वाईट दिवस देखील आले नाहीत. त्यांचे मरण देखील खूपच सुखाचे गेले. जशी पणजोबांची परिस्थिती होती तशीच माझ्या आजोबांची देखील राहिली म्हणजेच आयुष्यामध्ये त्यांनी देखील इतरांना छळले आणि आपले राज्य वाढवले आणि त्यांना देखील जीवनामध्ये कोणत्याही अडचणी आल्या नाहीत आणि त्यांचे मरण देखील सुखाचे आले आणि आमच्या वडिलांनीही तसेच मग चालू ठेवले.
परंतु माझा जन्म झाला त्यावेळेस मात्र माझे आई-वडील वारले आणि आमची संपत्ती देखील इतरांनी नेली. आता माझ्याजवळ अजिबात काहीही नाही. माझे नातेवाईक नाही किंवा मला राहायला घर नाही. इथेच मी शेजारच्या झोपडी मध्ये राहतो. तसेच माझे शरीर देखील मला साथ देत नाही अनेक आजार मला सतत होत राहतात. हा व्यक्ती ज्या वेळेस स्वामी महाराजांना हे सर्व सांगत होता त्यावेळेस स्वामी महाराज एक काडी घेऊन जमिनीवर काहीतरी रेखाटत बसले.
स्वामी महाराजांनी नंतर त्या व्यक्तीला बोलावून त्या रेखाटलेल्या चित्राला पहावयास सांगितले. मित्रांनो त्या व्यक्तीच्या पणजोबांना किंवा आजोबांना स्वामी महाराज यांनी पाहिले देखील नव्हते परंतु त्यांनी त्यांचे चित्र काढले होते. त्या व्यक्तीला देखील खूपच आश्चर्य वाटले की त्यांच्या पणजोबांचे चित्र स्वामींनी रेखाटलेले होते. या चित्रावरून तर तू काही समजलास का असे स्वामींनी त्या व्यक्तीला विचारताच त्या व्यक्तीने नकारात्मक मान डोलावली.
त्यावेळेस स्वामी त्या व्यक्तीला म्हणाले की तुझ्या पंजोबांचा पुनर्जन्म घेऊन तू आला आहेस. म्हणजेच पंजोबांनी जे काही पाप केलेले आहे ते या जन्मी तुझ्या रूपाने ते जन्म घेऊन त्या पापाची ते परतफेड करत आहेत. जो काही त्रास त्यांनी इतरांना दिला आहे तोच त्रास आता त्यांना सहन करावा लागणार आहे.
तर मित्रांनो स्वामींचा उद्देश हाच आहे की, मित्रांनो तुम्ही मागच्या जन्मी काही ना काही पाप केले असणार किंवा इतरांशी तुम्ही व्यवस्थित वागला नसाल आणि त्याचीच परतफेड आपणाला या जन्मामध्ये करावी लागते. म्हणजेच पापाचा तुम्ही भागीदारी झाला असाल तर तुम्हाला आपल्या या जन्मामध्ये अनेक अडचणी आणि आपल्याबरोबर वाईट घडत राहणार.
म्हणजेच मित्रांनो आपणाला आपल्या सध्याच्या जन्माचा केलेल्या कर्माशी न जोडता तुम्ही गेल्या जन्मी देखील जे काही कर्म केले आहे त्यानुसार आपणाला फळ मिळत असते. मग बरेच जण असे म्हणतील की मी जर एवढे देवदेव करून जर मला गेल्या जन्माच्या पापांची परतफेडस यावेळेस करावी लागणार म्हणजेच अनेक अडचणी मला येत आहेत तर मी देव देव कशाला करू.
तर मित्रांनो तुम्ही जर आता देव-देव केला तर पुढच्या जन्मी तुम्हाला खूपच सुखाचे दिवस येणार हे मात्र नक्कीच. त्यामुळे मित्रांनो अगदी निस्वार्थ भावनेने मनात श्रद्धा ठेवून तुम्ही स्वामींची सेवा आवश्यक करा. मित्रांनो तुम्हाला जरी अडचणी येत असतील तरी देखील तुम्हाला थोड्या दिवसांनी त्यातून मार्ग देखील सापडत जातो.
आपल्याला मार्ग हे स्वामी दाखवतच राहतात. त्यामुळे थोडासा तरी त्रास आपण सहन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो अगदी निस्वार्थ भावनेने, मनोभावे, श्रद्धेने आपले कर्म करत रहा. चांगले कर्म करत रहा. तुम्हाला याचे फळ हे चांगलेच मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.