बघा स्वामी कसे आपल्या भक्ताला झिरोचा हिरो करून टाकतात, सर्व मार्ग बंद झाल्यावर कोणीतरी सांगतले नाशिक मटात जा आणि पुढे जे झाले ते वाचाच …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनोभावे करीत असतो. स्वामींच्या मठामध्ये तसेच स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन ते सेवा करीत असतात.स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या पाठीशी कायम राहतात. त्यांना संकटातून ते बाहेर देखील काढतात आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवतात. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य सतत भक्तांच्या ओठी असते. मित्रांनो अनेक भक्तांना स्वामींचा अनुभव देखील आलेला आहे. तर मित्रांनो असाच एका ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये

नमस्कार मी साक्षी लुनीया. मी आज तुम्हाला माझा आलेला अनुभव सांगणार आहे. तसे तर मला स्वामी समर्थांचे अनुभव हे खूप सारे आले आहेत. त्यामध्ये काही सुखाचे तर काही दुःखाचे असे दोन्ही अनुभव आलेले आहेत. परंतु आज मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव डोळ्यात पाणी आणण्यासारखा आहे.

तर माझी परिस्थिती पहिलीपासूनच खूपच गरीबीची होती. माझी आई ही लग्नामध्ये जेवण बनवण्याचे काम करत होते आम्हाला चार चार दिवस उपाशी देखील राहावे लागायचे. त्यावेळेस माझे बाबा खूपच दारू प्यायचे. त्यामुळे आमची परिस्थिती खूपच गरिबीची होती. त्यावेळेस मला कोणीतरी सांगितलं की जर तू सोमवारचे व्रत केलेस तर तुम्हाला चांगला नवरा मिळेल.

त्यामुळे मग मी तेरा वर्षाची असल्यापासून सोमवारचे व्रत करीत होते. नंतर काही दिवसांनी म्हणजेच मी दहावीला होते त्यावेळेस मला एक स्थळ आलं. परंतु हे जे स्थळ होतं त्या मुलाचे लग्न दोन दिवसावर होते आणि त्याच्या दोन दिवस आधीच ती नवरी मुलगी पळून गेलेली होती. त्यामुळे त्यांच्या घरातील सगळे टेन्शनमध्ये होते आणि त्या लग्नातील जेवण करण्याचे काम माझी आई करत होती.

मग त्यावेळेस कोणत्यातरी एका महिलेने त्या मुलाच्या आईला माझं स्थळ सुचवलं. मुलाच्या आईने माझ्या आईशी बोलणं केलं मग माझी आई तयार झाली. जे स्थळ होतं ते जैनाचे होते आणि आम्ही मराठ्यांचे होतो. त्यामुळे खूपच राहणीमानात फरक होता. परंतु त्यांची परिस्थिती खूपच श्रीमंत होती. त्यामुळे माझी आई लग्नासाठी तयार झाली. मला त्यावेळेस काहीही समजत नव्हते. कारण मी त्यावेळेस फक्त सोळा वर्षाची होते.

दोन दिवसांवर लग्न होतं परंतु माझ्या डोक्यामध्ये खूप सारे वादळ निर्माण झालेले होते. परंतु एका दृष्टीने विचार केला तर माझे स्थळ होते ते श्रीमंताचे होते. त्यामुळे आता गरिबीचे दिवस संपणार असे माझ्या मनाला वाटले. परंतु ज्या वेळेस लग्न करून मी सासरी गेले. त्यावेळेस तेथील राहणीमान, खाणे पिणे हे खूपच वेगळं होतं. ते शिकण्यासाठी वेळ हवा होता. पण सासरच्या लोकाचे म्हणणे असे होते की मी खूपच लवकर शिकून घ्यावे. परंतु ते सारखे सारखे मला काही येत नाही म्हणून त्रास द्यायचे.

एकदा तर माझे मिस्टर देखील मला म्हणाले की तुला काही येत नसेल तर तू घर सोडून जा. मी या सगळ्यांकडेच दुर्लक्ष केले परंतु डोक्यात वेगवेगळे विचार येत होते. नंतर मी सात महिन्यांची प्रेग्नेंट झाले. मला त्यावेळेस काहीच कळत नव्हते सगळ्यांचा विचार डोक्यात येत होता. टोमणे सतत डोक्यात येत होते त्यामुळे मग मी सारखे आजारी पडू लागले.

त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी माझ्या आईला बोलावून घेतले आणि त्या खूप माझ्या आईला बोलल्या. माझ्या आईचा अपमान केला त्यावेळेस माझी आई त्यांना म्हणाली माझं लेकरू मला जड नाही असे म्हणून माझी आई इथून मला घेऊन गेली. त्यावेळेस आश्चर्याचा मला धक्का बसला तो म्हणजे माझे मिस्टर देखील माझ्याबरोबर आले व त्यावेळेस आम्ही माझ्या आईकडेच राहिलो व माझी डिलिव्हरी झाली. मला बाळ झालं ते बाळ घेणं, त्याची कशी काळजी घ्यायची हे देखील कळत नव्हते .कारण म्हणजे खूपच लहान होते.

नंतर माझ्या सासरची मंडळी न्यायला आले व नंतर आईने समजावून सांगितल्यानंतर आमच्या सासरी गेलो परंतु आम्ही दोघांनी ठरवले होते की कोणत्याही आपण अपमान सहन करायचा नाही. परंतु सतत सासूबाई काही ना काही मला बोलत राहायचे. नंतर आम्ही दोघेही परत माझ्या आईकडे आलो मग त्यावेळेस मिस्टर त्या परिस्थितीमध्ये आमच्या सोबत राहिले नंतर माझ्या मिस्टराना एका कंपनीमध्ये जॉब लागला.

परंतु त्या नोकरीमध्ये त्यांना खूपच त्रास होत होता आणि मिळेल ते पैसे देखील खूपच कमी होते. नंतर आम्ही एक भाड्याने घर घेतले. परंतु त्याचे भाडे देखील १००० होते आणि ती देखील आम्हाला खूप जास्त होते. परंतु किती दिवस आईच्या घरी राहणार असा विचार करून आम्ही नंतर भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट झालो. तर नोकरीमध्ये मिस्टरांना खूपच त्रास सहन करावा लागत असे. त्यांचे हात सुजू लागले.

मग नंतर आमच्या शेजारीच राहणाऱ्या एका मावशीने मला स्वामी समर्थांच्या केंद्रांमध्ये चल अशा म्हणाल्या. परंतु मी याकडे दुर्लक्ष केले नंतर मिस्टरणि तो जॉब सोडला आणि ते घरीच असायचे व त्यावेळेस त्या मावशी मला म्हणाल्या की तू भाजी विकायला माझ्याबरोबर चल. परंतु मला कोणत्याही प्रकारचे ज्ञान नसल्यामुळे कोणतीच समज नसल्यामुळे भाजी विकण्यांमध्ये मला भाजी कशी विकायची काहीच माहिती नव्हते. तरीही मी माझ्या लहान बाळाकडे तसेच मिस्टरांकडे पाहून भाजी विकण्यास तयार झाले.

सकाळी मिस्टरांबरोबर जाऊन भाजी खरेदी करून आणायची आणि चार वाजता विकत बसायचे. काही वेळेस माझी ती भाजी पूर्णतः परत यायची. तर काही वेळेस थोडीफार विकायची भाजी विकायला बसल्यानंतर काही माणसे ही वाईट नजरेने देखील बघत असायची. परंतु मी त्यावेळेस कोणाचाही विचार केलाच नाही आणि माझे काम करत राहिले.

एके दिवशी मी मावशीला म्हणाले की मी कुणाचीही वाईट केले नाही तरीही माझ्या बाबतीत असे का होत आहे? तर त्या मावशी म्हणाल्या की या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या केंद्रांमध्ये मिळतील. मग त्यावेळेस मी स्वामींच्या केंद्रामध्ये जायला तयार झाले आणि एका कागदावर माझे प्रश्न आहेत ते प्रश्न लिहून घेऊन गेले. त्यावेळेस मी तिथे सेवा केली. तिथे मला सांगीतले नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागमली पूजा करून या असे सांगितले व त्यावेळेस मला जाण्यासाठी पैसे देखील नव्हते.

तेथे जाऊन पूजा देखील केली नंतर तेथील जे पुजारी होते त्यांनी स्वामी समर्थांच्या आरतीला आम्हाला यायला सांगितले त्यावेळेस आम्ही समर्थांच्या आरतीला गेलो आणि तिथे मला गुरुचरित्र ग्रंथ दिसला आणि मग मी तो नकळपणे गुरुचरित्र ग्रंथ घरी घेऊन आले. काही दिवसांवरच दिवाळी होती त्यावेळेस माझ्या मिस्टरांनी खूप फटाके खरेदी करून ते विकण्याचा व्यवसाय करूया असे म्हणाले.

परंतु लगेचच दुसऱ्या दिवशी पाऊस मोठा पडल्यामुळे जे काही फटाके होते ते सर्व फटाके पावसामध्ये भिजून खराब झाले. मग त्यावेळेस रडायला आले. कारण आता आमच्याकडे काहीच पैसे देखील नव्हते. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला होता. मग नंतर मी शुक्रवारपासून गुरुचरित्र पारायण करायचे ठरवले.

शुक्रवारी सकाळी लवकर म्हणजेच पहाटे तीन वाजता उठून गुरुचरित्र वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळेस मी स्वामी समर्थांना नमस्कार करून माझ्या मिस्टरांना नोकरी मिळू दे असे प्रार्थना त्यांना केली. शनिवारी माझे मिस्टर हे स्वामी समर्थांना नमस्कार करून नोकरी शोधण्यासाठी बाहेर पडले.

तर त्या दिवशी त्यांना एका मोबाईल शॉपिंग मध्ये नोकरी लागली. बऱ्याच लोकांनी मिस्टरांना सांगितले की तो मालक खूपच खडूस आहे तिथे एकही कामगार टिकत नाही. परंतु मिस्टरांनी मला सांगितले की त्या दुकानांमध्ये फोटो समर्थांचा फोटो होता. त्यावेळेस कळाले की स्वामी समर्थांनीच ही नोकरी लावलेली आहे.

नंतर चार वर्षे त्याच दुकानात माझ्या मिस्टरांनी नोकरी केली आणि काही दिवसांनी माझे गुरुचरित्र पारायण देखील संपले त्यानंतर मी सत्यनारायण पूजा घरामध्ये ठेवलेली होती आणि त्यावेळी मिस्टरांचे मालक आणि त्यांची बायको त्या पूजेला आलेल्या होत्या. त्यावेळेस मालकांनी मिस्टरांना सांगितले की ते एक मोठे शोरूम काढणार आहेत आणि जे काही हे मोबाईलचे दुकान आहे ते तू सांभाळ.

असे सांगितल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला की सर्व स्वामींची कृपा आहे. कारण खूप साऱ्या अडचणी येत होते परंतु स्वामींचे सर्व अडचणी आता दूर व्हायला सुरुवात केली होती. आमचे वाईट दिवस बदलणार होते. मित्रांनो तुम्हाला पटणार नाही आत्ता बरेच लोक म्हणतात तुझी अगोदरची परिस्थिती काय होती आणि आत्ताची कशी आहे. खूपच चांगले दिवस आम्हाला स्वामीमुळे मिळाले. आता आमचे सोने चांदीचे खूप मोठे दुकान आहे. परंतु हे सर्व शक्य झाले ते म्हणजे स्वामींच्या कृपेने. मला खूप सारे छोटे-मोठे स्वामींचे अनुभव आलेले आहेत पण हा अनुभव न विसरणारा आहे.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.