घरातील देवीदेवतांच्या मुर्त्या शास्त्रशुद्ध पद्धतीने अश्या प्रकारे करा साफ नाहीतर संपूर्ण घराला लागू शकतो वास्तूदोष ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकाच्याच घरामध्ये देवघर हे असतेच. देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे चैतन्यपूर्ण राहते. म्हणजेच आपल्या देवघरामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांच्या मूर्ती असतात आणि या मुर्त्यांची आपण विधिवतपणे पूजा अर्चना दिवागरबत्ती लावून करत असतो. दररोज प्रार्थना करत असतो आरती करत असतो. तसेच गोड पदार्थांचा नैवेद्य देखील आपण दाखवत असतो. म्हणजेच या देवघरांमध्ये अनेक प्रकारचे टाक अनेक प्रकारच्या मुर्त्या फोटो कलश हे असते. परंतु काही वेळेस काय होते की या मुर्त्या काळपट रंगाच्या होत राहतात. म्हणजेच बऱ्याच महिला या पितांबरी वापरतात आणि त्याने घासतात. जास्त प्रमाणात घासल्यामुळे देखील आपल्या या मुर्त्या स्वच्छ होत नाहीत. म्हणजेच त्यामध्ये एक प्रकारची घाण साठलेली असते आणि काळपटपणा त्या मुर्त्यांना येतो.

परंतु मित्रांनो आपण कधीही देवी देवतांना अजिबात घासायचे नसते. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने कशाप्रकारे आपण देवांच्या मुर्त्या साफ कराव्यात याची माहिती आज मी सांगणार आहे. कारण जर तुम्ही घासून जर एखाद्या चोथ्याच्या साह्याने वगैरे घासून जर देवाना स्वच्छ केले तर ते देव आपल्या प्रसन्न होत नाहीत. म्हणजेच आपली पूजा ही सफल होत नाही. म्हणजे त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण देवींच्या मुर्त्यांना कसे साफ करावे चला तर जाणून घेऊयात.

आपल्यापैकी बरेच जण हे देव स्वच्छ करण्यासाठी पितांबरीचा सोड्याचा वापर करीत असतात. परंतु याचा वापर केल्यामुळे देवांचे पावित्र्य राहत नाही. त्यामुळे मित्रांनो तुम्ही सोड्याचा वापर अजिबात करायचा नाही. जर तुम्हाला देवाचे पावित्र्य राखायचे असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही मुर्त्यां साफ केल्या तर नक्कीच यामुळे आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाही.

तर पहिल्यांदा तुम्हाला एका ताम्हणांमध्ये मूर्त्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि नंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडासा मध त्यानंतर दही घ्यायचे आहे. हे दही आंबट असलेले खूपच चांगले असते. कारण खूप दिवसाचे दही आंबट असलेले या मुर्त्यांसाठी फायदेशीर आहे. तर आपणाला दही घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आणि हे तिन्हीही जे पदार्थ आहेत हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.

व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपणाला लिंबूची आवश्यकता आहे. लिंबू कापून घ्यायचा आहे अर्धा लिंबू घेऊन तो त्या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे आणि एक एक मूर्ती अशी आपण त्या लिंबाने स्वच्छ करायचे आहे. म्हणजेच हे मिश्रण घेऊन लिंबांच्या साह्याने आपण मूर्ती साफ करायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही मुर्त्या साफ केल्या तर त्या देवांचे पावित्र्य देखील राहते.

तर प्रत्येक एकेक मूर्ती हातात घेऊन या मिश्रणाने लिंबू त्या मिश्रणामध्ये बुडवून मूर्त्या साफ करायचे आहेत. नंतर साफ केल्यानंतर आपणाला स्वच्छ पाण्याने या मुर्त्या धुऊन घ्यायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या देवघरातील मुर्त्या जर काळ्या पडल्याने खूपच त्रस्त आहात तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या देवघरातील मुर्त्या साफ करायचे आहेत. ज्यामुळे आपल्या देवांचे पावित्र्य देखील राहील आणि आपले मन देखील प्रसन्न होईल आणि देवी देवता देखील आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.