मी चालत्या ट्रेन मधून खाली पडले जिवंत राहील असं वाटलंच नाही पण पुढे जे घडलं ते वाचून तुमच्या पण काळजाचा ठोका चुकेल असा थरारक स्वामी अनुभव ऐकून थक्क व्हाल !

वास्तु शाश्त्र

मित्रांनो तसे तर प्रत्येकांचाच स्वामी समर्थांवर विश्वास आहे स्वामी महाराज प्रत्येक अडचणीतून आपल्याला बाहेर काढतील आणि मार्ग देखील दाखवतात असे प्रत्येक भक्ताला विश्वास असतो. मित्रांनो बऱ्याच भक्तांना स्वामींचे अनुभव, प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो असाच एक थक्क करणारा अनुभव आपणास सांगणार आहोत. हा अनुभव नाशिक येथील सुप्रिया मोरे यांचा आहे आणि हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

नमस्कार मी सुप्रिया मोरे मी नाशिक मध्ये राहते. माझ्या घरातील सर्वच जण हे स्वामींची सेवा करतात. सर्वजण हे स्वामींचे भक्त आहेत. तसे तर मला स्वामींचे लहान मोठे असे अनुभव आलेले आहेत. परंतु हा अनुभव मी सांगणार आहे हा अनुभव न विसरणारा असा आहे.

या अनुभवाने आमचा स्वामींवरचा विश्वास आणखीनच वाढला. तसं तर आमचा स्वामींवर विश्वास आहेच. परंतु या अनुभवामुळे आणखीनच विश्वास वाढला. आमचे जे नातेवाईक आहेत ते जास्तीत जास्त करून नातेवाईक हे आमचे मुंबईला राहतात आणि त्यावेळेस आम्हाला संध्याकाळी फोन आला की आमचे मुंबईचे एक जवळचे नातेवाईक वारलेले आहेत.

मग त्यावेळेस आम्हाला त्यांच्या मातीसाठी जावं लागणार होतं आणि मग आम्हाला त्यावेळेस पहाटेच निघावं लागणार होतं. कारण आम्ही ट्रेनने प्रवास करणार होतो. त्यामुळे मग पहाटेच निघणं सोयीस्कर होतं. आम्ही सर्व आवरावर केली आणि सकाळी पहाटे आम्ही जाण्यासाठी तयार झालो. नंतर आम्ही रेल्वेमध्ये बसलो.

परंतु सकाळची वेळ असल्यामुळे रेल्वेमध्ये देखील खूपच गर्दी होती. दादर पर्यंत गेल्यानंतर ही गर्दी खूपच वाढली आणि एकदम काय झालं मला काहीच कळालं नाही की मला असा भास झाला की ट्रेन थांबलेली आहे. परंतु ती ट्रेन थांबलेली नव्हती. मला असा भास झाला आणि बाकीचे काही लोक हे उतरत होते आणि मला काय झालं काही कळालं नाहीय आणि मी देखील उतरायला गेले.

त्यावेळेस माझा पाय हा प्लॅटफॉर्म आणि ट्रेन यांच्यामध्ये जो गॅप असतो त्या गॅपमध्ये माझा पाय अडकला मी त्या गॅप मध्ये अडकले. आणि त्यावेळेस मला काहीच समजेना. म्हणजेच बाहेर काढा बाहेर काढा एवढे शब्द मला ऐकायला येत होते. परंतु माझे डोके असे सुन्न झालेलं होतं आणि एकदमच अचानक मला कोणीतरी माझा हात धरून वरती खेचलं.

माझं डोकं खूपच सुन्न झालेलं होतं आणि माझ्या डोळ्याला खूपच अंधारी देखील आलेली होती. मला वाटलं की माझ्या मिस्टरांनीच मला खेचलेलं आहे परंतु ज्या वेळेस माझ्या डोळ्यावरची जी अंधारी कमी व्हायला लागली. त्यावेळेस मला जाणवले की माझे मिस्टर हे समोरून येत आहेत माझी चौकशी करायला.

त्यावेळेस मला नेमकं कोणी बाहेर काढलं हे काहीच कळायला मार्ग नव्हता. ज्याने बाहेर काढलं तो माझी चौकशी करण्यासाठी थोडा वेळ तरी थांबला असता. परंतु तो व्यक्ती तिथे नव्हता. मला काही समजत नव्हते. मला मिस्टरांनी देखील विचारलं की तू त्यांचा चेहरा पाहिला आहेस का?

तर माझ्या डोळ्यावरती अंधारी असल्यामुळे मला त्यावेळेस काहीच आठवेनास झालं व त्यावेळेस मात्र मला मिस्टर म्हणाले की स्वामींनीच तुला या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल आहे.

स्वामींचा महिमा आघात आहे. हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे परंतु माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. हा अनुभव मी कधीही न विसरणारे आहे. या अनुभवामुळे माझं मन देखील सुन्न झालेल आहे. स्वामींनी मला मृत्यूच्या दाढेतूनच बाहेर काढलं होतं. स्वामींनी मला त्यांची प्रचिती दिली होती. त्यामुळे मी आज हा अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.