घरात या ठिकाणी ठेवा मीठ, गरिबी कायमची होईल नष्ट, घरगुती भांडणे, वाद, कटकट, कायमचा बंद होईल? उपयुक्त अशी माहिती ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपले जीवन हे सुखा समाधानाचे असावे असे वाटत असते. परंतु कोणत्या ना कोणत्या अडीअडचणी या येतच राहतात. म्हणजेच आपण कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत घेत असतोच. परंतु हा कमावलेला पैसा अपुरा पडत असतो. म्हणजेच घरामध्ये एक प्रकारची गरीबी असते आणि या गरीबीमुळे किंवा अनेक छोट्या मोठ्या कारणांमुळे देखील आपल्या घरामध्ये सतत भांडणे होत असतात. तसेच आपल्या घरामध्ये साडेसातीचा देखील प्रभाव असतो. तर या सर्व त्रासातून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर मी तुम्हाला जो आज उपाय सांगणार आहे या उपायामुळे हे सर्व त्रास नक्कीच दूर होतील.

मित्रांनो मिठामुळे अन्नाला चव येते. मीठ हे आपल्या जीवनामध्ये संतुलन राखण्याचे काम करत असते. म्हणजेच मिठाचे योग्य प्रमाण खूपच फायदेशीर ठरते. मिठाचा अति वापर आणि मिठाचा कमी वापरही आपल्या आहारामध्ये चालत नाही. मिठ हे जीवनाचं अमृत मानले गेले आहे. ज्योतिषशास्त्रांमध्ये मिठाला अनन्य साधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आहे.

तर मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे असे अनेक उपाय देखील सांगितलेले आहेत. हे उपाय आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर करू शकतात. म्हणजेच आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती बाहेर घालवण्याचे ताकद या मिठांमध्ये असते. मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर मिठाचे काही उपाय केले तरी यामुळे तुमच्या घरामध्ये गरिबी अजिबात राहणार नाही.

तसेच तुमच्या घरामध्ये जर साडेसाती असेल तर त्या साडेसातीचा शेवट देखील होईल. घरामध्ये कोणत्याही प्रकारची भांडणे होणार नाहीत. तर मिठाचे हे उपाय नेमके कोणते आहेत चला तर मग जाणून घेऊया.

तर मित्रांनो तुम्ही आपल्या घरामध्ये म्हणजेच घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये एका वाटीमध्ये खाडे मीठ जर ठेवले तसेच तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने जर फरशी पुसली तर तुमच्या घरांमध्ये वाद-विवाद तसेच भांडणे अजिबात होणार नाहीत. तसेच तुमच्या घरामधील बाथरूममध्ये काही वास्तुदोष असेल आणि या वास्तुदोष चा त्रास तुम्हाला होत असेल.

यामुळे मग आपल्या कुटुंबातील व्यक्ती सतत आजारी पडत असतात. त्यामुळे मग आपला खूप पैसा खर्च होत राहतो म्हणजेच आर्थिक चणचण आपल्याला भासत राहते. तर अशावेळी मित्रांनो तुम्ही बाथरूम मध्ये एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवायचे आहे आणि दर आठवड्याला हे मीठ बदलत राहायचे आहे.

यामुळे मित्रांनो तुमचे आर्थिक बाबतीतील समस्या सर्व दूर होतील. आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार खूपच महत्त्वाचे असते. या प्रवेशद्वारातूनच आपल्या घरामध्ये अनेक नकारात्मक शक्ती प्रवेश करत असतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही एका लाल कपड्यांमध्ये खाडे मीठ जर बांधून दरवाजावरती लटकवले तर यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती येणार नाहीत आणि आपल्या घरामध्ये भांडण, वाद अजिबात होणार नाही.

तसेच आपल्या घरातील महिला या आपल्या बाळांची दृष्ट काढण्यामध्ये मिठाचा वापर करीत असतात. जर आपल्या बाळाला दृष्ट लागली असेल तर बाळाला आंघोळ घालत असताना त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालावे आणि या पाण्याने आपल्या घरातील लहान मुलांना अंघोळ करण्यास सांगावे यामुळे जी काही वाईट नजर आहे यामुळे आपल्या मुलांचे संरक्षण होते.

तसेच जर तुम्हाला राहुकेतूचा काही त्रास असेल किंवा संध्याकाळी वाईट स्वप्न पडत असतील तर अशा वेळेस तुम्ही मिठाच्या पाण्याने जर हात धुतले तर यामुळे वाइट शक्तींचा प्रभाव तुमच्यावर अजिबात होणार नाही.

याशिवाय पती-पत्नीमध्ये देखील सतत भांडणे होत असतील तर त्यांनी आपल्या रूममध्ये सेंधव मीठ एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये सेंधव मीठ घालून ते पाणी त्यांनी त्यांच्या रूममध्ये ठेवावे. यामुळे पती-पत्नी मध्ये सतत भांडणे होत असतील ते कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्हीही मिठाचे उपाय जर केले तर तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल. जे काही भांडणे असतील, वाद असतील ते सर्व दूर होतील. तुमच्या घरातील गरिबी निघून जाईल आणि तुमचे कुटुंब हे आनंदीत राहील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.