आयुष्यात या पाच लोकांना श्री स्वामी समर्थ महाराज कधीच पावत नाहीत? हे १००% सत्य आहे ; श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा अर्चना करीत असतात. आपल्यापैकी बरेच जण अनेक केंद्रांमध्ये, मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करीत असतात. स्वामी आपल्यावर प्रसन्न व्हावेत आणि ते आपल्या पाठीशी उभे राहावेत असे प्रत्येक भक्तांची इच्छा असतेच. परंतु स्वामी महाराज हे काही भक्तांच्या पाठीशी कायम उभे राहतात. तर काही भक्तांना त्यांचा आशीर्वाद देखील देत नाहीत.

म्हणजेच तो भक्त त्यांनी जरी नाक रगडले तरीही स्वामी त्याच्यावर प्रसन्न होत नाहीत. तर आज मी तुम्हाला अशाच काही लोकांविषयी सांगणार आहे या लोकांवर स्वामी महाराज कधीच आपला कृपा आशीर्वाद ठेवत नाहीत. ते त्यांच्या पाठीशी कधीच राहत नाहीत आणि ते कधीच त्यांना पावत नाहीत. तर असे हे पाच लोक नेमके कोणते आहेत चला तर जाणून घेऊया.

तर यातील जे पहिले लोक आहे ते म्हणजेच दुसऱ्यांचे वाईट विचार करणारे म्हणजेच आपल्यापैकी बरेच जण हे फक्त स्वतःचा विचार करीत असतात. ते दुसऱ्यांचा विचार फक्त वाईटच करत असतात. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी वाईट भावना असते. अशा लोकांवर कधीही स्वामी महाराज प्रसन्न होत नाहीत. त्यांना कधीही पावत नाहीत.

जे लोक दुसऱ्यांच्या हिताचा विचार करतात तसेच गोरगरिबांचा सतत त्यांच्या मनामध्ये विचार येत असतो अशाच भक्तांवर स्वामी महाराज आपला कृपा आशीर्वाद देत असतात. त्यामुळेच दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्या लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत.

दुसरे लोक म्हणजेच जे आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात. आई-वडिलांचा छळ करतात अशा लोकांवर देखील देव कधीच प्रसन्न होत नाहीत. मित्रांनो आई वडील म्हणजेच एक प्रकारचे परमेश्वरच आपले असतात. ज्यांनी आपल्याला मोठे केले, चालायला शिकवले, उभे राहायला शिकवले आणि त्याच आई-वडिलांचा जे लोक अपमान करीत असतात त्यांना वाईट साईट बोलत असतात.

अशा अपमानास्पद वागणूक देणाऱ्या लोकांवर स्वामी महाराज कधीच प्रसन्न होत नाहीत. जे लोक आपल्या आई-वडिलांचा अपमान करीत असतात त्यांच्या घरामधील पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने खर्च होत राहतो. म्हणजे त्यांच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि त्यांना गरिबी येण्यास सुरुवात होते.

यानंतर तिसरे जे लोक आहेत ते म्हणजेच जे लोक स्त्रियांचा मान राखत नाहीत. मित्रांनो स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानले गेलेले आहे. बऱ्याच घरांमध्ये स्त्रियांचा अपमान केला जातो म्हणजे स्त्रीला योग्य तो मान दिला जात नाही. त्यांना कायम अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांना काहीही वाईट बोलले जाते.

मग ती आपल्या घरातील बहीण असू दे, आई असू दे किंवा मुलगी असू दे किंवा पत्नी असू दे तर या सर्व स्त्रिया म्हणजेच लक्ष्मी स्वरूप असतात. त्यामुळे मित्रांनो ज्या घरांमध्ये स्त्रियांचा अपमान होतो त्या घरातील लोकांवर कधीही स्वामी महाराज प्रसन्न होत नाहीत. त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही.
जर घरामध्ये आपण स्त्रियांचा अपमान केला तर लक्ष्मी त्या घरातून निघून जाते.

पुढचे लोक म्हणजे जे अन्न देवतेचा अपमान करतात म्हणजे मित्रांनो अन्न हे पूर्णब्रह्म आपल्या धर्मांमध्ये मांनलेले आहे. अन्न हे योग्य प्रमाणात शिजवून ते खाताना आपल्या ताटामध्ये जेवढे हवे आहे तेवढेच आपण घ्यावे. म्हणजेच ते शिल्लक राहणार नाही याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.

जे लोक अन्नदेवतेचा अपमान करतात म्हणजेच आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात आणि ते वाया घालवतात आणि टाकून देतात म्हणजेच हा एक प्रकारचा अन्नदेवतेचा अपमान होतो आणि जे लोक अन्नदेवतेचा अपमान करतात अशा लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत. ते आपल्या कृपा आशीर्वाद अशा लोकांवर कधीच ठेवत नाहीत.

पाचवे लोक म्हणजेच इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून जर अन्यायाला साथ देत असतील तर अशा लोकांवर देखील स्वामी महाराज कधीही प्रसन्न होत नाहीत. म्हणजेच न्यायाचा मार्ग सोडून ते अन्यायाच्या मार्गाने चालत असतील म्हणजेच गोरगरिबांवर अत्याचार करत असतील एखादी जर गरजू व्यक्ती असेल आणि त्याची गरज न भागवता जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल किंवा एखादा अपंग व्यक्ती असेल आणि त्या अपंग व्यक्तीची जर तुम्ही खिल्ली उडवत असाल तर हे खूपच निंदनीय प्रकारचे कृत्य असते आणि असे जे लोक करतात अशा लोकांना स्वामी महाराज कधीच पावत नाहीत.

दुसऱ्यांची निंदा करणे, खिल्ली उडवणे तसेच अन्यायांच्या मार्गाने जाऊन अनेकांवर अत्याचार करणे हे भोर पाप आहे आणि याची शिक्षा एक ना एक दिवस कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या व्यक्तीला भोगावेच लागते. त्यामुळे असे जे लोक वागतात अशा लोकांवर देव कधीच प्रसन्न होत नाहीत.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे असे जे लोक आहेत अशा लोकांवरती स्वामी महाराज कधीही प्रसन्न होत नाहीत. त्यांनी कितीही देव देव केले तरी स्वामी महाराज पावत नाहीत. तर मित्रांनो तुम्ही देखील वरील सांगितल्याप्रमाणे या कोणत्याही प्रकारची चूक अजिबात करू नका. ज्यामुळे मग स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होईल. स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.