मनुष्य मृत्युनंतर कुठे जातो, माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासोबत काय होतं? नक्की जाणून अशाच ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो माणूस जन्माला आला की त्याचा मृत्यू हा अटळ असतोच. पृथ्वीवरील जन्म घेतलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा येतोच. त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन हे आनंदाने जगावे. कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करत अजिबात राहू नये. माणसाचे कर्म हे त्याला स्वर्गात जागा मिळणार की नरकात हे निश्चित करीत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपण चांगली कामे कशी करू याकडे लक्ष द्यायचे आहे. मित्रांनो माणसाचा मृत्यू झाल्यानंतर आपण अनेक विधी देखील करतो. जेव्हा माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याला स्मशानभूमीत नेतात त्यावेळेस एक माठ खांद्यावर घेऊन त्याला होल पाडून प्रदक्षिणा घालतात आणि नंतर तो माठ फोडतात. तसेच डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आणि आमचा संबंध आता संपलेला आहे तुम्ही येथून जा.

त्यानंतर त्या प्रेताला जाळले जाते. त्याचा आत्मा हे सर्व पाहत असतो. नंतर तो आत्मा आपल्या प्रेतावर काही वेळ तसाच बसलेला असतो. सर्व माणसे अग्नी देऊन घरात येतात आणि घरात दिवा देखील लावतात आणि आपल्या घरामधील पिठले भात खातात. मेलेल्या व्यक्तीला पुढचा मार्ग दिसावा यासाठी दिवा देखील घरामध्ये लावला जातो.

10 दिवसानंतर त्या जाळलेल्या प्रेताची राख घेऊन नदीमध्ये सोडली जाते तसेच अग्नी देणाऱ्या व्यक्तीचे दाढी केस कापले जातात. हे सर्व काही तो आत्मा पाहतच असतो. नंतर आपण सर्व विधी करून घेतो.

मृत्यूनंतर 13 दिवसतर आत्म पृथ्वीवरच असतो. आपण मेलो आहेत हे समजून घेण्यासाठीच माणसाला खूप वेळ लागतो. मृत माणसाचा आत्मा 13 दिवस त्यांच्या जवळच्या लोकांच्या आसपास असतो.

गरुड पुराणानुसार, जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात. यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते. यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला 24 तास तिथे ठेवतात आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या-वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात.

यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचं आयुष्य गेले. 13 दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहतो. ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यात फार त्रास होत नाही. परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहेत, त्याला आपले प्राण सोडताना खूप वेदना होतात. अशी मान्यता आहे.

13 दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते. यमलोकला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात. स्वर्ग लोक, पितृ लोक आणि नरक लोक. व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते. पहिला मार्ग अर्चि म्हणजेच देवलोकचा प्रवासाचा मार्ग मानला जातो.

दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे. पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते.

तर वरील प्रमाणे माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याच्यासोबत या सर्व घटना घडत असतात. त्यामुळे मित्रांनो जे देवाने आपल्याला सुंदर जीवन दिले आहे ते अगदी आनंदाने जगा. इतरांशी प्रेमाने वागा. कोणाबद्दलही वाईट विचार डोक्यामध्ये आणू नका.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.