11 गुरुवारच्या उपवासाला सुरवात केली आणी पहिल्याच गुरुवारी घात झाला कारण पोटचा पोरगा ….!! प्रत्येकाने वाचा हा चित्तथरारक असा स्वामी अनुभव …..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच जणांना व्रत उपवास पूजा करण्याची खूपच आवड आहे. म्हणजेच अनेक उपवास देखील करीत असतात. अनेक काही अडचणी असतील यातून बाहेर पडण्यासाठी देखील बरेच जण उपवास करीत असतात. प्रत्येक जण हा वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त असतात. कोणी गणेशाचे तर कोणी महादेवांचे तर कोणी स्वामी समर्थांचे. प्रत्येक जण हा आपल्या देवी देवतांचे अगदी विधिवत पूजा देखील करीत असतात. बरेचसे स्वामी समर्थांचे देखील भक्त आहेत. ते अगदी नित्यनियमाने स्वामींची सेवा करण्यात मग्न राहतात. तर मित्रांनो आज आपण असाच एका ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत.

नमस्कार मी कविता मराडी. चिपळूण येथे राहते. मी माझा मुलगा माझी मुलगी आणि मिस्टर असा आमचा परिवार आहे. माझे मिस्टर हे नोकरीनिमित्त सतत बाहेर असायचे आणि माझी जी मुलगी होती ही देखील शिक्षणासाठी होस्टेलवरच होती. त्यामुळे घरात फक्त मी आणि माझा मुलगादोघेच होतो. मी youtube वरती अनेक व्हिडिओ पाहिले आणि त्यामध्ये मी स्वामींचे अनुभव देखील वाचले आणि त्यावेळेस मला देखील स्वामींची सेवा करावी अशी इच्छा झाली.

त्यामुळे मी मग स्वामींची सेवा करण्यासाठी अनेक वाचन केले म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्रांचा जप केला. तसेच तारक मंत्रांचा जप केला. एकदा मी आमच्या गावांमध्ये शेजारीच असणाऱ्या मठात गेले आणि तिथे गेल्यानंतर मला तेथील गुरुजींनी स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रताचे अधिष्ठान करण्यास सांगितले आणि मला देखील त्यावेळेस खूप चांगले वाटले.

मी घरात आल्यानंतर अकरा गुरुवारची अधिष्ठानला सुरुवात करायचे असे मनोमन म्हटले आणि मी गुरुवारच्या पूजेसाठी खूपच उत्सुक होते. त्यासाठी माझी बुधवारपासून तयारी चालू होती. बुधवारी म्हणजेच गुरुवारी पहाटे मला स्वप्न पडले की या स्वप्नांमध्ये मी खूपच रडत आहे. मोठमोठ्याने मी रडत आहे. त्यावेळेस मी एकदमच खूपच घाबरल्याने उठून पाहिले तर पहाटेचे तीन वाजलेले होते. मला काही सुचेना की असे स्वप्न मला कधी पडले नव्हते आणि आज मला असे स्वप्न कसे काय पडले.

नंतर मग मी स्वामींच्या सेवेसाठी तयार झाले. कारण तो पहिलाच माझा गुरुवार होता आणि सगळी पूजेची मांडणी वगैरे केली स्वामींचे सारांमृत वाचले आणि स्वामींच्या मंत्रांचा जप केला. सर्व काही विधिवत पूजा केली. मी त्या गुरुवारी स्वामींची मूर्ती देखील खरेदी करून आणली होती. कारण माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती नव्हती.

नंतर पूजा वगैरे आटोपन झाल्यानंतर एकदमच अचानकपणे माझ्या गावातील काही गावकरी आले आणि मला गडबडीनेच चला चला असे म्हणाले आणि मला घेऊन गेले. कारण माझ्या मुलग्याचा एक्सीडेंट झाला होता आणि मी जात असतानाच रोडवरती माझ्या मुलग्याची गाडी देखील दिस. गाडी इतकी अस्ताव्यस्त झाली होती म्हणजे त्याचा चुरा झाला होता.

सर्व काचा फुटलेल्या होत्या. त्या गाडीची अवस्था खूपच बेकार होती आणि त्या गाडीमध्ये असणारी व्यक्ती जगेल याची काहीच शक्यता नव्हती. हे पाहून तर रोडवरच मी चक्कर मारून पडले म्हणजे बेशुद्ध झाले आणि नंतर ज्यावेळेला मला शुद्ध आली त्यावेळेला मी दवाखान्यात होते आणि मला काही समजेना मी इथे कसे आले.

नंतर मला घरी गावकऱ्यांनी सोडले. घरी आल्यानंतर मला स्वामींचा खूपच राग आला. कारण पहिलाच माझा हा गुरुवार होता आणि पहिल्याच गुरुवारी मला असा अनुभव आला होता की, माझ्या मुलग्यावर संकट ओढवलं होतं. म्हणून मी सगळी पूजा अगदी विस्कटून टाकली. स्वामींची मूर्ती देखील मी फेकून दिली.

असे करत असतानाच एकदम अचानक आई हा शब्द माझ्या कानावर आला. मी पहाते तर माझा मुलगा अगदी सुखरूप होता. त्याला काहीही झालेलं नव्हतं. मला काहीच कळना. कारण गाडीची ती अवस्था बघूनच मी बेशुद्ध पडल्याने नंतर त्या गाडीतील व्यक्ती जिवंत असू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. परंतु माझ्या मुलग्याला काहीच झालेल नव्हते.

माझा मुलगा अगदी सुखरूप होता. हे कसे झाले मला काहीच कळेना. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी खूपच रडायला लागले. त्यावेळेस माझा मुलगा मला म्हणाला की, आई मी गाडी चालवत असताना समोरून एकदम ट्रक आला आणि हा ट्रक माझ्या अंगावरून जाणारच इतक्यात एक म्हातारे गृहस्थ माझ्यासमोर आले आणि ते माझ्या आडवे झाले.

मला काहीच कळलं नाही मी अगदी सुखरूप आहे. त्यावेळेस मात्र मला कळाले की हे फक्त स्वामीच होते आणि मग मी पूजा विस्कटून दिलेली स्वामींची मूर्ती फेकून दिलेली याचा मला खूपच पश्चाताप झाला. मी स्वामींची माफी मागितली आणि त्या स्वप्नामागच मी गुढ देखील कळाले. मी स्वप्नांमध्ये रडलेली पाहिले मला आणि तसेच मला ११ गुरुवारचे अधिष्ठान व्रत करण्यासाठी त्या गुरुजींनी सांगितलेलं होतं.

ही सर्व कथा मला त्यावेळेस समजून आली की हे सर्व काही स्वामींनी घडवून आणलेलं आहे. म्हणजेच माझ्या मुलग्याला स्वामिनी वाचवलेल आहे आणि त्यासाठीच मला अकरा गुरुवारचे व्रत देखील स्वामींनी करण्यास सांगितले आणि त्यावेळेस मला खूप पश्चाताप झाला. स्वामींची माफी मागितली आणि तेव्हापासून मी अकरा गुरुवारच्या व्रताला प्रारंभ केला.

त्यावेळेस पासून मी स्वामींवर कधीच रागावले नाही आणि अगदी मनोभावे, श्रद्धेने मी माझा मुलगा स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि आता पुढेही अशीच सेवा आम्ही चालू ठेवणार आहोत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.