41 वर्षे स्वामींची मूर्ती कपाटात होती, घरातल्या विरोधाने मी कपाटात पूजा करत होती तिथेच मी सेवा करीत होती ; पण त्या दिवशी जे झाले ते वाचून अंगावर काटा येईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यातील बरेच जण हे स्वामींचे अगदी भक्तिभावाने, मनोभावे पूजा करीत असतात आणि केंद्रांमध्ये मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात. स्वामी हे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात असा विश्वास देखील प्रत्येक भक्ताला हा असतोच. स्वामींचे अनेक अनुभव देखील बऱ्याच भक्तांना आलेले आहेत. तर असाच एक अनुभव आपण आज पाहणार आहोत. हा अनुभव नाशिक येथील संध्या पाटील यांचा आहे. त्यांचा हा अनुभव अगदी डोळ्यात पाणी आणण्यासारखा असा चित्तथरारक असा आहे. असा हा स्वामींचा अनुभव आपण त्यांच्यात शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

नमस्कार मी संध्या पाटील. मी माझा स्वामी अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे. आमच्या घरामध्ये सासू-सासरे, मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा असा परिवार आहे. माझ्या सासरी स्वामींची कोणतीच सेवा केली जात नव्हती. परंतु मला स्वामींची सेवा करणे आवडत होते. त्यामुळे मी स्वामी सेवा करत होते. परंतु आमच्या सासरच्या लोकांना हे काहीच पटत नव्हते. त्यामुळे मी एकदा स्वामींची मूर्ती खरेदी करून घरात आणली तर सर्वजण माझ्यावर रागावले.

मग नंतर मी ती मूर्ती माझ्या बेडरूम मध्ये नेली आणि तिथे मी स्वामींची सेवा करण्यास चालू ठेवली. परंतु बरेच जण म्हणतात की बेडरूम मध्ये स्वामींची सेवा करू नये वगैरे परंतु पर्याय काहीच नसल्यामुळे मी बेडरूम मध्ये स्वामींची मूर्ती ठेवली. परंतु ज्या वेळेस माझे मिस्टर बेडरूम मध्ये आल्यानंतर ती मूर्ती पाहिली की ते लगेचच ओरडत असतं. त्यामुळे मी स्वामींची मूर्ती ही कपाटात ठेवली आणि कपाटातूनच मी माझ्या स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली.

मी जवळजवळ 41 वर्षे म्हणजे जी काही स्वामींची सेवा असेल, पूजा असेल ती मूर्ती स्वामींची कपाटात ठेवूनच सेवा मी करत होते. सासरच्या मंडळींना काहीच पूजा पाठ विषयी माहिती नसल्याकारणाने म्हणजेच त्यांचा कोणताच विश्वास स्वामींवर नव्हता. आमच्या घराण्यातील पिढ्यांमध्ये मुलगा हा कोणालाच नव्हता. म्हणजे ज्यांना मुलगा झाला तर तो काही ना काही कारणाने मरण पाववायचा.

परंतु आमच्या घराण्यामध्ये मला पहिल्यांदा मुलगा झाला आणि तो देखील व्यवस्थित होता. त्यावेळेस माझ्या मुलग्याचे शिक्षण हे इंजीनियरिंग पर्यंत झालेले होते. माझा मुलगा अगदी व्यवस्थित ठणठणीत होता. परंतु मध्यंतरीच्या काळात एक आम्हाला मोठे वादळ आले. या वादळामुळे आम्ही सर्वच जण हादरून गेलो. म्हणजेच माझ्या मुलग्याला कॅन्सर झाला हे आम्हाला कळाले.

त्यावेळेस आम्ही सर्वच जण खूपच दुःखी होतो काय करावे हे काहीच सुचत नव्हते. मग मी स्वामींची सेवा मात्र सोडली नाही. मी स्वामींची अनेक पारायणी चालू केली. तसेच स्वामींचे सारामृत स्वामी मंत्राचा जप करत राहिले. तेही माझ्या बेडरूम मध्ये असणाऱ्या कपाटात स्वामींची मूर्ती ठेवूनच सर्व काही चालू ठेवले होते.

डॉक्टरांनी आम्हाला थोड्याच दिवसांमध्ये सांगितले की याची ही तिसरी स्टेप चालू आहे. त्यावेळेस मात्र मला खूपच दुःख झाले आणि मी स्वामींना म्हणाले की, स्वामी महाराज मी एवढी तुमची सेवा केली पूजा केली परंतु तुम्ही माझ्या जीवनामध्ये असे का घडवून आणले? तुम्ही माझ्या मुलाला यातून बाहेर काढा अशी विनवणी केली.

मी स्वामींच्या पारायणाला सुरुवात केलीच होती. त्यावेळेस एके दिवशी गुरुवार होता आणि मुलग्याची तिसरी स्टेप असल्यामुळे माझे मिस्टर हे त्याच्या ऑपरेशन साठी बाहेरगावी चौकशी करण्यासाठी गेलेले होते आणि त्यावेळी संध्याकाळी मी आणि माझा मुलगा माझ्या बेडरूम मध्ये झोपलो होतो. सासू-सासरे हे हॉलमध्ये त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलेले असतानाच पहाटे तीनच्या दरम्यान मला कपाटातून टकटक आवाज आला.

मला कशाचा आवाज येतो आहे हे काही समजेना. नंतर मी कपाटातील दरवाजा उघडला आणि एकदमच माझ्या अंगावर एक दिव्य प्रकाश पडला आणि स्वामीना जे मी पूजेमध्ये चाफ्याचे फुल अर्पण केले होते ते पांढरे चाफ्याचे फुल माझ्या अंगावर पडले आणि मला थोडा वेळ काहीच कळाले नाही. एक दिव्यशक्ती अशी माझ्या अंगावर आली आहे असा मला अनुभव मला त्यावेळेस मिळाला.

नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मुलग्याच्या ऑपरेशनची तयारी सुरू झाली. दोन दिवसातच ऑपरेशन होते आणि डॉक्टरांनी काहीही सांगता येत नाही असे आम्हाला सांगूनच ठेवलेले होते. त्यावेळेस मग मी ते स्वामींचे जे पांढरे चाफ्याचे फुल होते ते एका कपड्यांमध्ये गुंडाळून तो कपडा मुलग्याच्या कमरेला बांधलेला होता म्हणजे तो ज्या ठिकाणी जाईल त्याच्याबरोबर स्वामी असतील असा माझा विश्वास होता.

नंतर ऑपरेशन झाल्यानंतर आम्हाला समजले की हे ऑपरेशन व्यवस्थित झालेल आहे माझा मुलगा व्यवस्थित आहे. नंतर आठ दहा दिवसांनी परत डॉक्टरांनी त्याचे रिपोर्ट्स काढायला सांगितले. त्यावेळेस सर्व रिपोर्ट्स हे नॉर्मल आलेले होते. त्यावेळेस आम्हाला सर्वांनाच एकदम आश्चर्याचा धक्का बसला. कारण हे सर्व काही कसे झाले हे कोणालाच कळेना.

परंतु मला खात्री होती की हे सर्व काही स्वामींमुळेच घडलेले आहे. स्वामिनीच माझ्या मुलग्याला संकटातून बाहेर काढलेल आहे. आज माझा मुलगा माझ्याजवळ आहे याचे कारण म्हणजे स्वामीच आहेत. तेव्हापासून मात्र माझ्या घरचे लोक हे स्वामींच्या सेवेमध्ये आले आणि स्वामींची मूर्ती आम्ही आता हॉलमध्ये प्रतिष्ठापना करून स्वामींची नित्यनेमाने पूजा सेवा करतो. अनेक स्वामींचे पारायण करतो. तसेच अकरा गुरुवारचे व्रत देखील आम्ही चालू ठेवले आहे.

तर मित्रांनो स्वामी हे आपल्या भक्तांना कधीच दुखवत नसतात आणि त्यांची मोठ्यात मोठ्या संकटातून सुटका देखील ते करीत असतात. याचा हा चित्तथरारक अनुभव मला त्यावेळेस आला. त्यामुळेच मी स्वामींच्या सेवा करण्यात कधीच कमी पडत नाही. मी स्वामींची सेवा ही मनोभावे आणि श्रद्धेने करीत आहे आणि यापुढेही करत राहणार आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.