माझ्या नवऱ्याने ११ गुरुवारची पूजा मांडणी मोडून अस्ता व्यस्त केली, स्वामी झाले क्रोधीत काळीज पिळून टाकणारा स्वामी समर्थ मठातील ताईंना आलेला स्वामींचा थरारक असा स्वामी अनुभव …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे व्रत उपवास तसेच सेवा देखील करीत असतात. स्वामी महाराज हे प्रत्येक भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. त्यांची संकटातून सुटका देखील करीत असतात. स्वामींचे अनेक अनुभव देखील काही भक्तांना आलेले आहेत. तर आज आपण असाच एक अनुभव जळगावच्या शीतल पाटील या ताईंना आलला थरारक असा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव आपण आज त्यांच्यात शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो मी शितल पाटील आम्ही जळगाव मध्ये राहतो. मी माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली असा आमचा परिवार आहे.

मी दवाखान्यामध्ये काम करत होते तर माझे मिस्टर हे एका खाजगी कंपनीत काम करत होते. जेमतेम त्यांना 12000 ते 13000 असा पगार मिळत होता. परंतु आमच्या घरी तीन ते साडेतीन हजार रुपये येत होते. कारण माझ्या मिस्टरांना दारूचे व्यसन होते. ते दारू मध्ये सर्व पैसा खर्च करत होते. माझ्या दोन मुली या शिक्षण घेत होत्या. मिस्टर हे खूप दारू पीत असल्यामुळे आम्हा दोघांचे सतत काही ना काही कारणामुळे भांडणे होत होती.

माझी मोठी मुलगी आठवीला होती तर लहान मुलगी ही सहावीला होती. त्यावेळेस आम्ही आमच्या गावातील स्वामींच्या केंद्रामध्ये तिघीही आम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस जात होतो आणि स्वामींना नमस्कार करून येत होतो आणि त्यावेळेसच मला स्वामींचे ११ गुरुवारच्या व्रता विषयी देखील माहिती मिळाली. सततच्या भांडणामुळे मी खूपच वैतागले होते. घरामध्ये काहीही पैसे शिल्लक राहत नव्हते. त्यामुळे भविष्यात मुलींचे कसे व्हायचे याची काळजी मला लागलेली होती.

वरचेवर आमच्या दोघांचे भांडण होत होती व त्यावेळेस मला स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करण्याची इच्छा झाली. मी स्वामींच्या फोटोला नमस्कार करून अकरा गुरुवारच्या व्रताचा संकल्प घेतला आणि माझ्या पतीचे दारूचे व्यसन सुठावे तसेच माझ्या दोन मुलींचे शिक्षण व्यवस्थित व्हावी आणि माझा संसार हा सुखा समाधानाचा व्हावा अशी मागणी स्वामींकडे केली.

नंतर पहिला गुरुवार होता त्याच्या आदली दिवशी म्हणजेच बुधवारी आम्हा दोघांचे भांडण झाले आणि रागाने माझे मिस्टर हे घरातून गेले. कारण ते माझ्याकडून दारूसाठी पैसे मागत होते पण मी नकार दिल्यामुळे ते रागावून घराबाहेर पडले. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता माझा तो स्वामींचा पहिलाच गुरुवार होता. त्या दिवशी मग मी पूजेसाठी स्वामींचा फोटो केळी वगैरे पूजेचे साहित्य आणले आणि पूजेची मांडणी केली.

सारामृत वाचन केले तसेच तारक मंत्राचे पठण स्वामी समर्थ मंत्राचे पठण करत होते. त्यावेळेस एकदम अचानक माझे मिस्टर आले आणि ते मी केलेली पूजा त्यांनी पाहिली आणि मला म्हणाले मी काल तुझ्याकडे पैसे मागत होतो तू नाही म्हणून सांगितलेस आणि या फालतू गरजा भागवण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहेत असे म्हणून त्यांनी सर्व पूजा विस्कटून टाकली आणि स्वामींचा फोटो देखील फेकून दिला.

त्यावेळेस मात्र मग मी खूपच मिस्टरांवर रागावले आणि स्वामींचा कोप होईल तुम्ही पूजा अशी अस्ताव्यस्त का फेकली म्हणून आम्हा दोघांचे खूपच भांडण झाले. मग माझे मिस्टर तिथून निघून गेले. नंतर मी ते सर्व पूजा आवरले आणि परत स्वामी महाराजांकडून माफी मागितली आणि परत स्वामी मंत्राचा पाठ केला. तोपर्यंत मला अचानकच एक फोन आला आणि माझे मिस्टर यांचा एक्सीडेंट झाला आहे असे कळाले.

त्यावेळेस गावातील गावकऱ्यांनी माझे मिस्टरांना दवाखान्यात ऍडमिट केले होते. मिस्टरांची तब्येत खूपच गंभीर बनली होती. डॉक्टर काहीही सांगता येत नाही असे सांगितले होते. मला काही करायचे काहीच सुचत नव्हते. माझ्या दोन्ही मुली खूपच रडू लागल्या. नंतर स्वामींचा दुसरा गुरुवार होता मग मी संकल्प केला होता त्यामुळे गुरुवारचे व्रत करणे गरजेचे होते.

मी मोठ्या मुलीला माझ्या मिस्टरांपाशी बसवून घराकडे गेले आणि स्वामींची पूजा केली. मंत्रजप सर्व केले नंतर मला अचानक दवाखान्यातून फोन आला आणि माझी मोठी मुलगी सांगू लागली की, बाबा तुला बोलवत आहेत. हे ऐकल्यावर मला काय करायचे काही सुचेना. मी स्वामींच्या फोटोंना नमस्कार केला आणि तातडीने दवाखान्यात गेले. तिथे गेल्यानंतर पाहिले तर माझ्या मिस्टरांना शुद्ध आलेली होती आणि ते म्हणाले की, स्वामींचा फोटो कसा आहे? पूजा व्यवस्थित आहे का? हे ऐकल्यानंतर मला काहीच सुचेना.

तर मिस्टर मला म्हणाले की माझा एक्सीडेंट झाला त्यावेळेस स्वामी महाराज माझ्या डोळ्यासमोर उभे होते आणि ते म्हणत होते की माझ्या भक्तांच्या सेवेमध्ये जो कोणी आला त्याला मी सोडत नाही आणि तू म्हणाली होतीस की पूजा तुम्ही विस्कटला आहात आणि स्वामींचा कोप होईल आणि तसेच झाले. मी जेव्हा घरातून पूजा विस्कटून बाहेर गेलो त्यावेळेसच माझा एक्सीडेंट झाला.

खूपच माझे मिस्टर रडू लागले त्यांना पश्चाताप झाला आणि आता यापुढे आपण दोघेही स्वामींची सेवा करू. आता इथून पुढे मी दारू सोडणार. असे मला मिस्टरांनी वचन दिले. नंतर माझ्या मिस्टरांना डिस्चार्ज मिळाला. परंतु त्यांची तब्येत ही अजूनही जास्त सुधारणा नव्हती. चार-पाच महिने त्यांची तब्येत सुधारन्यास झाले. परंतु माझ्या मिस्टरांनी पूर्णपणे दारू सोडली होती आणि आम्ही सर्वजण स्वामींच्या सेवेमध्ये लिण झालो.

11 गुरुवारच्या जो काही संकल्प होता तो माझा पूर्ण झाला आणि जी इच्छा मी स्वामीना सांगितलेली होती ती इच्छा देखील स्वामींनी पूर्ण केली होती. म्हणजेच मी जे अकरा गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली ती त्याचीच पुण्याई म्हणून स्वामींनी माझ्या मिस्टरांना एवढ्या मोठ्या एक्सीडेंट मधून वाचवले होते. म्हणजेच स्वामी महाराज भक्ताला कधीही दुःख देत नाहीत. त्यांना दुखवत नाहीत. तेव्हापासून मात्र आमचे सर्व कुटुंब म्हणजेच मी माझे मिस्टर आणि दोन मुली हे स्वामींच्या सेवेमध्ये आलो.

अगदी मनोभावे श्रद्धेने आम्ही स्वामींची सेवा करतो. मंत्रांचा जप करतो. खरंच असा हा अनुभव त्यावेळेस मला आला आणि हा खूपच शहारे आणणारा असा आहे आणि हा अनुभव मी कधीच विसरणार नाही असा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.