तुम’च्या’ही देवघरात ही व’स्तू असेल तर आजच बाहेर काढा नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असतेच. सकाळ संध्याकाळ आपण देवी देवतांची पूजा अगदी मनोभावे श्रद्धेने करीत असतोच. परंतु बऱ्याच वेळा आपण काही देव देव करून देखील आपल्यावर देव प्रसन्न होत नाही अशी शंका आपण सतत म्हणत असतो. परंतु आपल्या हातून अशा देखील काही चुका घडत असतात. ज्यामुळे आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचत नाही किंवा देव आपल्यावर प्रसन्न होत नाहीत म्हणजेच आपण केलेल्या पूजेचा आपल्याला लाभ मिळत नाही. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत राहतात. वादविवाद होत राहतात. घरामध्ये एक प्रकारचे अशांततेचे वातावरण निर्माण होते.

तर मित्रांनो आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे या वस्तू तुमच्या देवघरांमध्ये असतील तर तुमची प्रगती होणार नाही. प्रगतीमध्ये अनेक अडचणी येत राहतील. तसेच घरामध्ये सुख-समृद्धी देखील येणार नाही. तर या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात.

तर मित्रांनो लक्षात ठेवा आपले देवघर हे कायमच स्वच्छ असायला हवे. तसेच आपल्या घरातील देवघरांमध्ये असणाऱ्या मुर्त्यांची संख्या देखील अति प्रमाणात असू नये कारण त्यामुळे देवतांना खूपच अडचण होत राहते. तसेच आपल्या देवघरातील जो दरवाजा आहे हा दरवाजा दक्षिणमुखी अजिबात नसावा. तसेच आपल्या दिव्याची वात आहे ही देखील दक्षिणमुखी होईल अशा पद्धतीने ठेवायची नाही.

कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. मग त्यामुळे आपण पूजा केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. तसेच आपल्या देवघरांमध्ये जर तुम्ही शिवलिंगाची मूर्ती स्थापित करणार असाल किंवा असेल तर ती दोन इंचापेक्षा मोठी नसावी. तसेच देवघरामधील जी गणपतीची मूर्ती आहे ही मूर्ती देखील कधीही उभी असलेली किंवा नृत्य करत असलेली अजिबात नसावी.

जर तुम्हाला महादेवांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा असेल तर त्यामध्ये ते तांडव करत असलेल्या फोटो किंवा मूर्ती अजिबात नसावी. कारण याचा मग अशुभ परिणाम आपणाला होऊ शकतो. तसेच आपले देवघर हे कायमच स्वच्छ सुंदर असावे. तसेच आपण आपल्या देवघरांमध्ये कोणत्याही मृत व्यक्तींचे फोटो अजिबात ठेवायचे नाही. कारण यामुळे मग पितृदोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे देवघरांमध्ये मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नये.

आपल्या घरातील ज्या काही देवी देवतांच्या मूर्ती असतील त्या आपल्या अंगठ्याच्या उंचीपेक्षा जास्त नसाव्यात म्हणजे त्या मूर्ती अंगठ्याच्या उंची एवढ्याच असाव्यात. तसेच आपले जे देवघर आहे हे देवघर कधीही टॉयलेट किंवा बाथरूमच्या शेजारी असता कामा नये. तसेच आपल्या झोपण्याच्या खोलीजवळ देखील आपले देवघर असू नये. कारण मग आपण जी देवपूजा करतो ही देवपूजा देवांपर्यंत पोहोचत नाही आणि आपल्याला शुभ फळ देखील प्राप्त होत नाही.

त्याचप्रमाणे जर आपल्या घरातील देवघर हे जर आपल्या बसण्या उठण्याच्या खोलीमध्ये असेल तर हे देवघर जरा थोडेसे उंचावर असावे. कारण आपल्या सर्वांमध्ये देवघर म्हणजेच देवांना उच्च स्थान दिले जाते. त्यामुळे देवघराचे स्थान हे थोडेसे उंचावर असावे. तसेच देवघरामधील जे काही आपली वाचण्याची पुस्तके असतील देवासंबंधीत जे काही साहित्य असेल ते साहित्य ज्या त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे.

बरेच लोक हे जळालेली वात असेल दिव्याची किंवा जळालेली एखादी काडी असेल म्हणजेच माचीसची काडी असेल किंवा सुकलेली फुले असतील ही देवघरातच ठेवतात. परंतु हे अजिबात आपणाला देवघरांमध्ये ठेवायचे नाही. आपले देवघर कायमच आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहे. जे आपल्या देवघरामधील माचीस असेल हे माचीस अशीच उघड्यावर ठेवायचे नाही. तर ती एखाद्या कागदामध्ये गुंडाळून किंवा एखाद्या कपड्यांमध्ये गुंडाळून आपल्याला देवघरांमध्ये ठेवायची आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपल्या देवघराची विशेष अशी काळजी घ्यायची आहे. म्हणजे ज्या त्या वस्तू योग्य त्या जागी ठेवायचे आहे. जेणेकरून आपण केलेल्या देवपूजेचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेल आणि देवी देवता कायमच आपल्यावर प्रसन्न राहतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.