स्वामीं खरंच भक्तांसाठी धावून येतात देवयानी ताईंना आलेला हा स्वामी अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …..!!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये, संकटे येऊ नयेत असे वाटतच असते. म्हणजेच आपले जीवन हे अगदी आनंदाने तसेच कोणत्याही संकटांमध्ये राहू नये असे वाटत असते आणि त्यासाठी प्रत्येक जण हा मेहनत घेत असतो. कष्ट करत असतो. तसेच आपण अनेक देवीदेवतांचे व्रत उपवास देखील करीत असतो. जेणेकरून आपल्या या अडीअडचणी, संकटातून देवी देवता आपणाला बाहेर काढतील. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत आणि केंद्रांमध्ये, स्वामींच्या मठांमध्ये जाऊन ते स्वामींची सेवा पूजा अर्चना करीत असतात.

स्वामी हे आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा प्रत्येक भक्ताला विश्वास असतो. त्यामुळे मनात कोणतेही विचार न आणता मनोभावे आणि श्रद्धेने ते स्वामींची सेवा करण्यात मग्न राहतात. तर आज मी तुम्हाला असाच एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव देवयानी ताई यांना आलेला आहे आणि हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत.

नमस्कार मी देवयानी पुणे येथे मी राहते. आमची आर्थिक स्थिती खूपच चांगली होती सर्व काही व्यवस्थित चालू असताना दिवाळीनंतर आमच्या कुटुंबामध्ये खूपच आर्थिक टंचाई भासू लागली. म्हणजे जे काही आमचे व्यवसाय होते ते पूर्णपणे डबघाईला आले आणि आम्हाला प्रत्येक दिवस हा खूपच टेन्शनमध्ये घालवावा लागत होता. घरामध्ये आर्थिक टंचाई असल्यामुळे प्रत्येक जण हा एकमेकांवर चिडचिड करत होता.

अनेक वाद भांडणे सतत आमच्या घरामध्ये होत राहिले. मी माझ्या माहेरी होते म्हणजेच ज्या वेळेस माझे अजून लग्न झाले नव्हते त्यावेळेस माहेरी माझी आई स्वामी सेवा करत होती आणि माझ्या आईबरोबर मी देखील स्वामी सेवा करत होते. परंतु लग्नानंतर ज्यावेळेस मी सासरी आली त्यावेळी पासून माझी स्वामी सेवा काहीच झाले नव्हते. असेच एकदा स्वामींच्या केंद्रामधून माझी एका ताईंशी ओळख झाली आणि त्या ताईंची ओळख इतकी झाली की आम्ही सर्व काही एकमेकींना शेअर करत होतो.

घरची परिस्थिती आमची खूपच बिकट होती आणि ही सर्व माहिती मी त्या ओळख झालेल्या ताईला सर्व सांगितले. त्यावेळेस तिने मला सांगितले की तू स्वामी सेवा कर म्हणजेच दीनदुबळ्यांची शक्य होईल तेवढी त्यांना मदत कर. तेव्हापासून मग मी जेव्हा काही जेवण घरामधील बनवेल त्यावेळेस एका माणसाचे जेवण जास्त करू लागले आणि ते जेवण मी जो कोणी भिकारी किंवा जो काही भुकेलेला माणूस असेल त्याला देऊ लागले.

हे माझे सतत चालूच राहिले. मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस मला खूपच ऍसिडिटी देखील झाली होती आणि मला दूध प्यायची इच्छा झाली. त्यावेळेस माझ्या मिस्टरांकडे दुधाची पिशवी आणणे इतके देखील पैसे नव्हते त्यामुळे मिस्टरांची खूपच चिडचिड झाली. मला त्यावेळेस मात्र माझे दुःख सहनच झाले नाही मी स्वामींच्या फोटो समोर जाऊन खूपच रडले. मी नंतर स्वामींचे सारामृत वाचण्यास सुरुवात केली. तसेच गुरुचरित्राचे पठण देखील करण्यास सुरुवात केली.

एक दिवस असेच गुरुचरित्राचे पठण करीत असताना माझ्या मिस्टरांना अचानक फोन आला आणि त्यांचे सरचिटणीस पदी निवड झाल्याचे कळाले. त्यावेळेस मी एकटक स्वामींच्या फोटोकडेच पाहत राहिले. कारण हे सर्व काही स्वामीमुळेच घडले होते. अशाच एका गुरुवारी आम्हाला चमत्कारच पाहायला मिळाला. कारण ज्या दोन कंपन्या आमचे वीस लाख रुपये द्यायच्या होत्या त्या कंपनीने कायम आम्हाला उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यावेळेस माझे मिस्टर म्हणाले होते की हे आपले पैसे बुडाले असे समजा.

परंतु एका गुरुवारी अचानक फोन आला आणि वीस लाख रुपये माझ्या मिस्टरांच्या खात्यावर जमा झाले. हे सर्व पाहून तर आम्हाला सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्यावेळेस गुरुचरित्र पारायण याचा शेवटचा माझा दिवस होता आणि हा सर्व काही चमत्कार स्वामींनीच घडवून आणला हे सर्वांच्या लक्षात आले आणि तेव्हापासून मी मात्र स्वामींची सेवा करणे अजिबात सोडली नाही.

तेव्हापासून आमचा व्यवसाय व्यवस्थित सुरू झाला. सर्व काही अडचणी दूर झाल्या. परंतु मी दोन दुबळ्यांचे सेवा करण्याचे सोडले नाही. तर आमच्या घरातील सर्वच जण हे स्वामींची सेवा करायला लागले. तसेच भुकेल्यांना मदत देखील करू लागले. म्हणजेच आपण जर अगदी मनोभावे, श्रद्धेने, एकाग्र मनाने स्वामींची जर कोणतीही सेवा केली तर स्वामी नक्कीच आपणाला आपल्या प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. याचा अनुभव मला त्यावेळेस आला आणि हा अनुभव मी कधीच विसरणार नाही असा हा अनुभव होता.

तर मित्रांनो तुम्ही देखील जर स्वामींची सेवा करत असाल तर कोणतेही विचार मनात न आणता अगदी एकाग्रमनाने स्वामींच्या सेवेमध्ये लिहीन व्हा. स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.