जेव्हा मी स्वामींना विचारलं स्वामी तुम्ही फक्त माझ्या सोबत आहात की नाही सांगा ? प्रणिता ताईंना स्वामिनी दिलेला एक जबरदस्त असा स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य भक्तांच्या कायम मनात रुजलेले आहे. म्हणजेच स्वामी आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा विश्वास प्रत्येक भक्ताला हा असतोच. याचे अनेक अनुभव देखील अनेक भक्तांना आलेले आहेत. स्वामी हे आपल्या भक्तांच्या केलेल्या मनोभावे सेवेकडे लक्ष देत असतात. म्हणजेच तो श्रीमंत असो वा गरीब असो परंतु त्याची सेवा ही खूपच महत्त्वाची असते. तर आज आपण एक असाच स्वामींचा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव प्रणिता रवी पोटे या लातूरच्या ताईंचा अनुभव त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात हा जबरदस्त असा स्वामी अनुभव…

नमस्कार मी प्रणिता पोटे. लॉकडाऊन काळात माझ्या मिस्टरांची नोकरी गेली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण गावाकडे राहायला आलेलो होतो. माहेरी माझी परिस्थिती खूपच उत्तम होती. माझे वडील टीचर होते त्यामुळे माझे सर्व हट्ट पूर्ण व्हायचे. म्हणजेच मी काहीही मागण्या अगोदर मला ते मिळायचे. परंतु सासरी मातीचे घर असल्यामुळे मला तेथे ऍडजेस्ट करून घेणे खूपच कठीण झाले होते.

मी असेच व्हिडिओ पाहत असताना स्वामींचे व्हिडिओ पाहिले आणि आपण देखील स्वामी सेवा करावी असे माझ्या मनात आले. मग आम्ही सात दिवसांचे पारायण ला सुरुवात केली. नंतर 11 दिवस पारायणे केली नंतर मी गुरुचरित्राचे पठण देखील केले. सारामृत वाचन तसेच स्वामी समर्थांचा 108 वेळा मंत्र जप, तारक मंत्र एका कागदावर मी लिहून काढला आणि त्याचे वाचन देखील मी दररोज मनोभावे आणि श्रद्धेने करत होते.

हे एवढे करून देखील मला स्वामींचे अनुभव काहीच आले नव्हते. मग मी एका गुरुवारी स्वामींना म्हणाले की स्वामी महाराज तुम्ही माझी ही सेवा करताना पाहता का? तुमचे माझ्याकडे लक्ष आहे का? मी जो प्रसाद बनवला आहे हा प्रसाद तुम्ही नक्की ग्रहण करा. परंतु त्यावेळेस काय चमत्कार झाला जो मी प्रसाद ठेवला होता त्या जागी प्रसाद काहीच नव्हता. मी सर्व कुटुंबीयांना तसे सांगितले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देखील बसला.

त्याच दिवशी उंबराच्या झाडाखाली माझ्या सासूबाईंना सुवर्णच्या पादुका सापडल्या आणि त्यांनी त्या घरी आणल्या. पादुका जेव्हा आमच्या सासऱ्यांना दाखवल्या त्यावेळेस त्यांनी सांगितले की साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या घरी आलेले आहेत. त्यानंतर संध्याकाळी मला स्वप्न पडले. त्यात स्वामींचे दर्शन झाले आणि स्वामींनी मला सांगितले की मी स्वतः तुझ्या घरी आलो आहे आणि आम्ही कुटुंबातील सर्वजण आरती करत आहोत असे मला त्या स्वप्नांमध्ये जाणवले.

असा हा खूपच चमत्कारिक असा अनुभव मला त्यादिवशी आला म्हणजे आपल्या अडीअडचणी संकटात स्वामी नक्कीच आपल्याजवळ धावून येतात म्हणजेच आपले जे संकटे आहे ते स्वामींची होऊन जातात. हे मला त्या अनुभवातून मिळाले. स्वामी समर्थ हे पैसा संपत्ती धण यापेक्षा देखील समाधानी कसे राहावे आणि समाधान राहणे हेच महत्त्वाचे सुख आहे आणि हेच स्वामिनी मला पटवून दिले.

म्हणजेच मित्रांनो तुम्ही देखील स्वामींची सेवा करत असाल तर पैसा नाही म्हणून तुम्ही हतबल होऊ नका. तर समाधानी रहा आणि मनोभावे श्रद्धेने स्वामींची सेवा करीत रहा. यातच आपले सुख असते आणि स्वामी देखील आपल्या या सुखात दुःखात सामील देखील होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.