दूध डेअरी सारखे दही बनवण्याची योग्य पद्धत, चाकुनेही कापू शकाल इतके घट्ट दही बनवण्याची सोपी पद्धत एकदा नक्की वाचा …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो दुधापासून बनलेला एक पदार्थ जो अनेकदा आपल्या पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जातो तो म्हणजे दही. काही लोकांना दही नुसतं खाण्यासाठी, काहींना पदार्थांची चव वाढविण्यासाठी तर काहींना त्यापासून अनेक पदार्थ बनविण्यासाठी दह्याचा वापर करतात. मात्र त्यासाठी विकतचे दही आणणे अनेकांना परवडत नाही. तर काहींना घरचे विरजणाचे दहीच जास्त आवडते. मात्र कधीकधी घरी विरजणासाठी पुरेसे दही नसल्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी काय करता येईल असा अनेक गृहिणींना प्रश्न पडलेला असतो. खाण्यासाठी नाही मिळाले तरी चालेल पण काही ठराविक पदार्थांसाठी दही असणे फार गरजेचे असते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते. म्हणूनच घरच्या घरी घट्टसर दही कसे बनवावे याची सोप्पी पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो सर्वात आधी आपण दही बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे ही जाणून घेऊया तर मित्रांनो ही दही बनवण्याची खूप जुनी पद्धत आहे. विरजणापासून दही बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध उकळवा आणि थंड करा. एका भांड्यात ज्या भांड्यात दही लावणार आहेत ते भांड दोन चमचे विरजण घेऊन ते चमच्याने थोडं फेटून घ्या. दूध बऱ्यापैकी कोमट झाल्यावर ते भांड्यात घाला आणि चमच्याने सतत ढवळत राहा. ते व्यवस्थित मिक्स झाल्यावर भांड्यावर झाकण ठेऊन अंधार असलेल्या जागी ठेवा. बरेचजण किचनच्या ओट्यावर गॅस शेजारी हे भांड ठेवतात. रात्रभर हे भांड तसचं ठेवा किंवा कमीत कमी पाच ते सात तास तरी त्याला हात लावू नका. एकदा दही तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेऊन २ दिवसांपर्यंत तुम्ही ते वापरू शकता.

आणि तुम्हाला जर या पद्धतीने दही लावायचे असेल तर आधी तुमच्याकडे थोडं दही म्हणजेच विरजण असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही ते बाजारातून विकत ही आणू शकता, तर मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही घरामध्ये दही तयार केले तर यामुळे मित्रांनो अगदी घट्ट आणि त्याचबरोबर बिना पाण्याचे तुमचे दही तयार होईल आणि तुम्ही तुमच्या जवळ असलेले दोन ते तीन चमचे दही वापरून वर सांगितलेल्या पद्धतीने विरजण लावले तर मित्रांनो यामुळे ही जी दहीची रेसिपी आहे हे खूपच उत्तम होईल आणि त्यांचे जे दही आहे ते घट्ट तर होईलच आणि त्याचबरोबर ते आंबटही होणार नाही. तर मित्रांनो तुम्हीही वर सांगितलेल्या पद्धतीने आणि माहितीनुसार तुमच्या घरामध्ये ही दही ची रेसिपी नक्कीच करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.