चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइट हेड्स घालवा ते ही फक्त एका दिवसामध्ये या घरगुती उपायाने १००% जबरदस्त घरगुती उपाय एकवेळ अवश्य करून पहा ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरील मृत पेशींखाली तेल साचल्यामुळे त्वचेवर लहान कणके येऊ लागतात आणि हवेच्या संपर्कात आल्याने ऑक्सिडायझेशन होऊन काळी पडते. नाकाजवळ आढळणारे यातील काही ब्लॅकहेड्स मुळापासून त्वचेला चिकटलेले असल्याने ते काढणे फार कठीण असते आणि सहज निघण्याचे नाव घेत नाही. चेहऱ्यावरील मेकअप, घाण आणि बॅक्टेरिया छिद्रांमध्ये अडकल्यावर ब्लॅकहेड्स होतात. हवेच्या संपर्कात आल्यावर ते काळे होतात. ब्लॅकहेड्स चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. हे बहुतेक नाक आणि हनुवटीवर असतात. अनेक लोक ब्लॅकहेड्स काढण्यासाठी केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

चेहऱ्यावर जर मृत त्वचा असेल तर आपला चेहरा खराब दिसतो. यामुळेच चेहऱ्यावरील मृत त्वचा काढणे गरजेचे असते. मृत त्वचेमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स होतात. याशिवाय पार्लरमध्ये जाऊन ब्लॅकहेड्स काढणेही अतिशय अवघड काम आहे.

महागडी उत्पादने आणि पार्लरमध्ये मृत त्वचा काढण्यासाठी जाण्यापेक्षा आपण काही घरगुती उपाय करूनही चेहऱ्यावरील मृत त्वचा काढू शकतो. मित्रांनो अशा परिस्थितीत, ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करून पाहू शकता. त्यामुळे ब्लॅकहेड्स दूर होण्यास मदत होते. तसेच त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

तर मित्रांनो यासंबंधीचा पहिला उपाय करत असताना मित्रांनो आपल्याला थोडासा बेकिंग सोडा घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो या पेस्टने आपल्याला ज्या ठिकाणी ब्लॅकहेड्स किंवा वाईट हेड्स झालेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बोटांच्या सहाय्याने स्क्रब करायचा आहे.

मित्रांनो पाच ते दहा मिनिटे आपल्याला स्क्रब केल्यानंतर एक ते दोन मिनिट ते पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तसेच राहू द्यायचे आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने आपल्याला ती धुवून घ्यायचे आहे. मित्रांनो बेकिंग सोडा हा आपल्या चेहऱ्यावर असणारे सर्व मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतो आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर असणारे ब्लॅकहेड्स आणि वाईट हेड्स लवकरात लवकर दूर करण्यासाठी आपल्याला मदत करतो.

तर मित्रांनो याच समस्येवर आणखीन एक आपण घरगुती उपाय करू शकतो तो म्हणजे कोलगेटचा. मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एका स्वच्छ आणि चांगल्या ब्रशवर थोडेसे पांढऱ्या रंगाचे कोलगेट घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो त्या ब्रशच्या साह्याने आपल्याला आपल्या संपूर्ण नाकावर आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ब्लॅकहेड्स किंवा वाईट हेड्स झालेले आहेत त्या ठिकाणी स्क्रब करायचा आहे.

मित्रांनो थोडा वेळ स्क्रब केल्यानंतर ते कोलगेट आपल्याला तिथेच राहू द्यायचा आहे आणि ते पूर्णपणे वाळल्यानंतर एक छोटेसे कापड घेऊन ते आपल्याला ओल करून घ्यायच आहे आणि त्यानंतर त्या ओल्या कापडाने आपल्याला आपल्या नाकावर आणि ज्याच्या ठिकाणी आपण कोलगेट लावले होते ते स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. मित्रांनो यामुळेही आपल्या वाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्स समस्या लवकर दूर होतात. हा उपाय आपल्याला दोन दिवसातून एकदा करायचा आहे.

त्याचबरोबर पुढचा उपायासाठी आपल्याला साखर लागणार आहे. साखरेचा उपाय आपल्या चेहऱ्यावर करणार आहोत. ते स्क्रब चांगल्या पद्धतीने होण्यासाठी खूप मदत करतो आणि म्हणूनच एक चमचा साखर आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस आपल्याला टाकायचा आहे आणि त्यानंतर याची जी पेस्ट तयार होईल त्या पेस्टने आपल्याला आपल्या नाकावर स्क्रब करून घ्यायचा आहे.

मित्रांनो पाच मिनिटे स्क्रब केल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिटं ते मिश्रण आपल्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने धुऊन घ्यायच आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय जर आपण केला तर आपल्या वाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्स लवकरात लवकर दूर होतील. तर मित्रांनो असे हे तीन घरगुती उपाय जर आपण या आपल्या समस्येवर केले तर यामुळे आपल्या ब्लॅकहेड्स आणि वाईट हेड्स च्या समस्या लवकरात लवकर दुर होतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.