मित्रांनो सध्याच्या काळात आपले फुफ्फुसे मजबूत आणि स्वच्छ असणे गरजेचे आहे आणि त्यांनी आपले काम 100% करणे खूप महत्त्वाचे आहे. फुफ्फुसमध्ये इन्फेक्शन होऊ नयेत आणि जर इन्फेक्शन झाले असेल तर ते तात्काळ निघून जावे यासाठी उपाय करणे महत्वाचे आहे. जर आपल्या शरीरात कफ जमा झालेला असेल तर तात्काळ निघून जावा त्यामुळे आपल्याला दवाखान्यामध्ये ऍडमिट होण्याची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आपले फुफ्फुस हे क्लीन स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे आणि हे काम जर आपल्याला करायचे असेल फुफ्फुसमध्ये जी साठलेली घाण, चिकट पदार्थ जर बाहेर काढायचे असेल तर आपल्याला हा साधा उपाय करायचा आहे.
मित्रांनो या उपायामुळे फुप्फुसामध्ये साठलेली घाण, साठलेला कफ पूर्णपणे निघून जाईल. ज्यामुळे तुम्हाला जो खोकला येतो. तो खोकला सुद्धा तुमचा बंद होईल आणि सर्दी खोकल्याचा त्रास आहे तो पूर्णपणे निघून जाईल.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना एक समस्या कायमची सतावत असते ही समस्या म्हणजे अंगाला खाज सुटणे, अंगावर लालसर चट्टे निर्माण होणे, खरूज, खाज, नायटा, गजकरण यासारख्या विविध समस्या आपल्याला उद्भवत असतात. या समस्या प्रामुख्याने ओले कपडे घातल्यामुळे होत असतात.अनेकदा वेळा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण आपले कपडे घालतो. तेव्हा येणारी खाज व लाल चट्टे यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो.
परंतु कालांतराने ही खाज वाढत जाते आणि त्याचे रूपांतर गंभीर आजारांमध्ये सुद्धा होऊ लागते. म्हणूनच जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारची खाज निर्माण झाली असेल तर वेळेवर उपचार करणे गरजेचे आहे.म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महत्त्वाचा मानला गेलेला व घरगुती उपायांमध्ये महत्त्वाचा मानला गेलेला एक उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय साधा सोपा असला तरी तितकाच प्रभावी आहे.
अंगावर खाज आली तर आपण वेगवेगळे उपचार करत असतो. त्यामध्ये अनेकदा रासायनिक क्रीमसुद्धा वापरत असतो. परंतु क्रीम, औषधे यांचा फरक तितक्या पुरताच राहतो आणि औषध संपल्यावर पुन्हा खाज, खरुज सुरू होऊन जाते.
बहुतेक वेळा खाज आपल्या शरीरावर एक ते दोन वर्षे राहते आणि याचा त्रास कमी व्हावा म्हणूनच हा उपाय आपल्याला करायचा आहे. मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पदार्थ वापरायचा आहे तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सांगितलेला आहे. त्या पदार्थाचे नाव आहे कडुलिंबाची पाने.
मित्रांनो कडुलिंबाची पाने आपल्या शरीरासाठी किती फायद्याचे असतात आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये बॅक्टेरियल घटक असतात.तसेच त्वचारोग लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्याला जे काही इन्फेक्शन झालेले आहे किंवा आपल्या फुफुसामध्ये जे काही कफ आहे तो ही निघुन जाईल.
तर मित्रांनो आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे याची माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला उपाय करण्यासाठी सहा ते सात कडुलिंबाची पाने घ्यायचे आहेत. ती मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो एका भांड्यामध्ये साधारणतः एक ते दीड लिटर पाणी आपल्याला घ्यायच आहे.
त्यानंतर हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवायचा आहे आणि हे पाणी उकळण्यासाठी ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला ती कडूलिंबाची स्वच्छ पाने त्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर मित्रांनो हे पाणी आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हे पाणी उकळल्यानंतर हळुवारपणे ते भांडे आपल्याला उतरवून घ्यायच आहे.
मित्रांनो आपल्याला एक जाड कापड घ्यायचे आहे आणि हे कापड संपूर्ण आपल्या अंगावर घेऊन हे जे पाणी उकळलेले आहे यामधून जी वाफ निघते ती वाफ आपल्याला नाकामध्ये, तोंडामध्ये घ्यायची आहे.
या वाफेचे तापमान जास्त असल्याने कुठलाही व्हायरस जिवंत राहत नाही आणि यामध्ये कडुलिंबाचे गुणधर्म असल्यामुळे आणि पाणी गरमही असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा व्हायरल इन्फेक्शन तर तात्काळ निघून जाते.
शिवाय या उपायामुळे सर्दी, खोकल्याचा आणि घशामध्ये खवखव करण्याचा जो त्रास आहे तो तात्काळ निघून जातो. या उपायामुळे छातीमध्ये साचलेला कफ आहे तो पातळ होऊन तुमचा पूर्णपणे निघून जातो. हा उपाय कोणत्याही वेळेला तुम्ही करू शकता.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.