मित्रांनो कोणतेही फळ ही आरोग्यासाठी, शरीरासाठी खूप महत्त्वाची असतात. त्यातही जर आपण ऋतुनुसार फळे खात असलो तर ते शरीरासाठी अत्यंत चांगल असत. परंतु या फळाच्या बाबतीमध्ये असं घडत नाही. हे थोडंसं वेगळं फळ आहे. जितकं हे फळ गोड आणि फायदेशीर आहे तितकच काही लोकांसाठी त्रासदायक ठरणार फळ आहे. म्हणून जर हे फळ तुम्ही खाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.
या फळाचा आपल्या तब्येतीनुसार, आपल्या प्रकृतीनुसार वापर करावा लागतो. अशी कोणती लोक आहे त्यांना हे फळ खाता येत नाही. त्याशिवाय जर तुमच्या घरामध्ये कुंडीमध्ये झाडे असतील तर या फळाच्या सालीचा यासाठी अत्यंत महत्त्वाचा वापर करता येतो.
अतिशय चमत्कारिक वापर करता येतो. तर तो वापर कसा करायचा आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडीज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता येते. सीताफळाला संस्कृतमध्ये ग्रीष्मजा, हिंदीमध्ये सीताफळ, इंग्रजीमध्ये कस्टर्ड ॲपल तर शास्त्रीय भाषेत आमोना रेटीकूलहा असे म्हणतात.
सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी 1’ व ‘बी 2’ जीवनसत्त्व आढळतात. सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आहे. आणि ज्या महिला प्रेग्नेंट आहे त्यांनी हे फळ अवश्य खाल पाहिजे.
बाळासाठी खूप चांगलं असत. शिवाय ज्या महिला प्रेग्नेंसीसाठी प्रयत्न करत आहेत अशा महिलांना सुद्धा हे फळ खाल्ले पाहिजे. कारण बाळंतपणानंतर तसेच चाळिशीनंतर अनेक स्त्रियांमध्ये रक्ताचे व कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. सीताफळाने ही झीज भरून येते. यासाठी सीताफळ सत्त्व हे औषध उत्तम आहे. इतके जरी चमत्कारिक फायदे असले तरी असे काही लोक आहेत ज्यांना हे फळ मात्र खाऊन चालत नाही. त्यांना त्रासदायक ठरत.
ज्यांना सर्दी-खोकला झाला आहे, अशा व्यक्तींनी सीताफळ खाऊ नये. तसेच ज्यांना मधुमेह आहे अशा व्यक्तींनीही सीताफळ खाऊ नये. अतिप्रमाणात सीताफळ खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे बठेकाम करणाऱ्यांनी तसेच स्थूलता असणाऱ्यांनी सीताफळ कमी प्रमाणातच खावे. कारण या फळामुळे परत एलर्जी वाढण्याची शक्यता असते.
त्याचबरोबर हे जे सीताफळ चवीला जरी गोड असलं तरी सकाळी उपाशी पोटी हे फळ अजिबात खायचं नाही आणि जर सकाळी उपाशीपोटी हे फळ खाल्लं तर हमखास सर्दी होतेच. म्हणून उपाशीपोटी हे फळ खायचं नाही. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तींनी सुद्धा हे फळ अजिबात खाऊ नये.
कारण इतर फळांपेक्षा या फळांमध्ये सल्फेरा ही जास्त असते. यामध्येही सल्फेरा आहे. डायबिटीससाठी अतिशय त्रासदायक ठरते. म्हणून ज्यांना शुगर आहे, मधुमेह आहे अशा लोकांनी हे फळ टाळलेलं बर. जे लोक वजनाने जास्त आहेत किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा व्यक्तींना या फळाचे सेवन करू नये. कारण याने वजनामध्ये झटपट वाढ होऊ शकते.
शिवाय ज्या व्यक्तींना तोंडामध्ये फोड येतात अशा व्यक्तींनी सुद्धा हे फळ खाऊ नये. इतर लोकं याचा वापर करू शकतात. या वनस्पतींची खासियत अशी आहे की, या वनस्पतीच्या सर्वच गोष्टी या आयुर्वेदिक आहेत. त्याची पाने, बिया आयुर्वेदिक आहेत. याचबरोबर या फळाचे साल आहे हे अत्यंत उपयुक्त आहेत. तुमच्या घरामध्ये कुंड्या असतील आणि त्यामध्ये तुम्ही झाडे लावलेली असतील तर त्या झाडांसाठी ही जी साल असते ती अत्यंत महत्त्वाचे असते.
जर तुमच्या कुंड्यामध्ये फुलांची झाडे असतील तर अवश्य या फळांची ही साल आहे ती सुकवून घ्या. बारीक करा व हाताने चुरगळले तरी सहजरीत्या बारीक होतील. आणि ही जी साल आहे झाडांच्या कुंड्यामध्ये टाका. जी कुंड्यामधील झाडे आहेत त्याला भरगच्च फुले या सालीमुळे लागतात. फुल छान येण्यासाठी ही जी साल अत्यंत गुणकारी ठरते. तर या सालीचा वापर करा.
तर या फळाच्या सालीचा अशा पद्धतीने वापर करा. फेकून देऊ नका. अत्यंत गुणकारी आहे ही साल किंवा हे फळ खात असताना हे वरील साल आहे. तर आपल्याला माहित नाही आहे याचा विचार करूनच या फळाचा अवश्य आस्वाद घ्या. ऋतुमानानुसार फळाचा आस्वाद घ्या.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.