कुटे भेटलेच तर घेऊन या हे फळ पुृथ्वीवरील जनू अमृतच हे फळ फायदे इतके की या फळापुढे संजीवनी बुटी सुद्धा फेल होईल असे जबरदस्त फायदे ……..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, भगवान शंकराच्या पुजेसाठी आपण बेलाचे पान वाहतो. दरवर्षी श्रावणात व महाशिवरात्रीला महादेवाच्या पुजेसाठी बेलाची पाने भाविकांकडून वाहिली जातात. त्यामुळे बेलाचे झाड आपल्याला परिचयाचे आहे. परंतु, त्याची पाने आणि फळात विविध औषधी गुणधर्म आहेत. हे फारच कमी लोकांना माहीत आहे. दुर्देवाने बेलाचे झाड दुर्मिळ होत चालल्याचे चित्र सध्यातरी सर्वत्र पहायला मिळते. सध्या पर्यावरण संवर्धन करण्यात आपण सर्वच बाजूंनी जागृत झालो आहोत. दरवर्षी वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

परंतु मित्रांनो आत्ताच्या काळामध्ये अत्यंत उपयोगी असणारे आणि अगदी पोटदुखीपासून ते मधुमेहापर्यंतच्या सर्व समस्यांवर गुणकारी असणारे बेलासारखी झाडे आपणाकडून दुर्लक्षित झाली आहेत. मित्रांनो आयुर्वेदात बेलाच्या झाडाचे अत्यंत उपयुक्त वर्णन केले आहे. बेल हे देवांचे फळ मानले जाते. त्यामुळेच भगवान शंकराच्या मंदिराभोवती ही झाडे आढळतात. छोटा बेल हा जंगली असतो, तर मोठ्या बेलाचे झाड कोठेही उगवते. दोन्ही झाडांचे गुण सारखेच असतात. मात्र, औषधी वापरासाठी जंगली बेल उपयुक्त आहे असे सांगितले जाते. मित्रांनो बेलफळ हे छोट्या नारळाप्रमाणे असते. कीड, रोगराई यापासून बचाव करण्यासाठी बेलाच्या झाडावर कसलेही औषध फवारावे लागत नाही.

या झाडाचे आयुष्य मोठे असते. बेलफळ नियमित खाल्याने आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. मित्रांनो त्यात मेंदूचे विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यास त्याची मदत होते. तसचे पोट साफ राहणे, पचनशक्ती सुधारण्याबरोबर मुळव्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो.

मित्रांनो पचनक्रिया बिघडल्यास तोंडाचा वास वा मुखदुर्गंधी, अपचनापासून ते पोटदुखी, बद्धकोष्ठता, उन्हाळ्यात डोळे, हातापायांची जळजळ वा रक्ताची कमी असल्यास बेलाचे फळ खूपच गुणकारी आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर कमी करण्यासाठी उपयोगी पडते.

त्याचबरोबर मित्रांनो सर्दी, खोकला, ताप यावर बेलाच्या पानाचा रस मधातून घेतल्याने चांगला फरक पडतो, पोटदुखी, पोटात गॅस होणे, अपचन, अजीर्ण पोट होत असेल, यासाठी बेलाच्या पानाचा 10 ग्राम रस, 1 ग्राम काळीमिरी, आणि 1 ग्राम सेण्डव मीठ एकत्र करून सकाळ दुपार संध्याकाळी घेतल्याने हा त्रास कमी होतो आणि सारखे तोंड येत असेल, तोंडात फोड येत असतील तर बेलाची 2 ते 3 पाने चांगली चावून खावी. याने आराम मिळेल. शारीरिक दूरबळता कमजोरी, थकावट होत असेल तर अशा वेळी बेलाच्या पानाचा चहा करून त्यामध्ये थोडी जिरपावडर आणि दूध मिक्स करून पिल्याने शारीरिक कमजोरी निघून जाते.

मित्रांनो जर तुम्हाला खूप गॅस होत असेल, बद्धकोष्ठतेची समस्या असेल, पोटात जडपणा असेल तर तुम्ही बेलाच्या ज्यूसचे नक्कीच करायला हवे. बेल पोटाची उष्णता शांत करते आणि या समस्यांपासून आराम देते. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय उष्माघात होण्याची भीती असते. अशा वेळी बेलाचा ज्यूस प्यायल्याने खूप आराम मिळतो आणि तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असले तरी, बेल सिरप तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बेलामध्ये भरपूर फायबर असते. हे प्यायल्यानंतर तुम्हाला खूप आराम मिळतो आणि तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही.

हाय बीपी किंवा कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या लोकांसाठी बेल सिरप देखील खूप फायदेशीर आहे. त्यात लिपिड प्रोफाइल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रित करण्याची क्षमता आहे. यामुळे बीपी असलेल्यांनी आपल्या आहारामध्ये बेलाच्या ज्यूसचा समावेश करायला हवा. विशेष म्हणजे जर आपण हा ज्यूस नाश्त्यामध्ये घेतला तर ते अधिक फायदेशीर ठरेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बेलाचे फळ आणि बेलाचे पान यांचा उपयोग करून त्या संबंधित जर उपाय आपल्या घरामध्ये केले तर आपल्या अनेक समस्या दूर होऊ शकतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.