मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहत असतो की जे स्वामींची सेवा दररोज करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचे पारायण स्वामींचा नाम जप इत्यादी अनेक गोष्टी स्वामींच्या सेवेमध्ये केल्या जातात आणि मित्रांनो या स्वामी सेवेचे फळही आपल्यातील बऱ्याच जणांना मिळते आणि आपण अनेक वेळा स्वामींचे अनेक अनुभव व प्रचिती ऐकतच असतो मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामींचे असे अनुभव किंवा प्रचिती ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना तरी स्वामींच्या शक्तीबद्दल आणि स्वामींबद्दल संपूर्ण माहिती मिळत असते आणि स्वामींची सेवा करण्याची प्रेरणा ही मिळते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामींच्या सेवेमुळे आपल्यातील बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडलेला आपण अनेक वेळा ऐकतच असतो आणि मित्रांनो जेव्हा आपण अशा पद्धतीने स्वामींचे चमत्कार आणि स्वामींची प्रचिती अनुभव ऐकत असतो तेव्हा यामुळे आपल्यालाही स्वामी सेवेसाठी प्रेरणा मिळत असते आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये घडलेला बदल बघून आपली ही स्वामी सेवा सुरू होते तर मित्रांनो आज आपण असाच एका टपरी वरील चहा वाल्याची स्वामी भक्ती बद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो या चहा वाल्याच्या जीवनामध्ये स्वामी कसे आले आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे त्याचे जीवन कसे पद्धतीने बदलून गेले यात यात आपण जाणून घेऊया.
तर मित्रांनो एकदा दोन मित्र रस्त्याने गाडीवरून जात होते आणि त्यानंतर त्यांची गाडी अचानकपणे मधी बंद पडली आणि म्हणून ते जवळच असणाऱ्या गॅरेजच्या दुकानांमध्ये गाडी दाखवण्यासाठी गेले तर तेव्हा तिथे असणाऱ्या मेकॅनिक ने गाडी दुरुस्त करायला सुरुवात केली आणि त्याला सांगितले की गाडी दुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागेल आणि म्हणून ते दोघेही तिथून समोरच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले आणि तिथे गेल्यानंतर ते दोघेही चहा पिऊ लागले आणि तेवढ्यात त्यातील एका मित्राला त्या प्रक्रिया मागच्या बाजूला होती तिथे स्वामींचा एक मोठा फोटो दिसला आणि म्हणून त्याने त्या टपरी वरील मालकाला विचारले की तुम्ही मागे भिंतीवर कोणाचा फोटो लावला आहे? आणि तुम्ही यांना ओळखता का? आणि तुम्ही अक्कलकोटला जाता का?
त्यावर त्या टपरीवाल्या मालकांनी उत्तर दिले की नाही, मी अक्कलकोटला कधीच जात नाही तेव्हा ज्याने प्रश्न विचारला होता तो म्हणाला की, तुम्ही अक्कलकोटला जात नाही आणि मग तुम्ही यांना ओळखता तर का त्यावर तो टपरीवाला पुन्हा नाही म्हणाला आणि हे ऐकून त्याला धक्का बसला आणि त्याला वाटले की याच्या अगोदर ज्याचा इथे गाडा होता त्यांनी इथे स्वामींचा फोटो लावला असेल आणि तरीही त्यांने त्या टपरीवाल्याला विचारले की तुम्ही यांना ओळखतही नाही तुम्ही अक्कलकोटलाही जात नाही मग तुम्ही यांचा फोटो मागे का लावला आहे, त्यानंतर तो टपरीवाला म्हणाला फोटो दुसऱ्या कोणी लावला नाही मीच लावला आहे हे ऐकल्यानंतर त्या व्यक्तीला धक्काच बसला आणि त्याने पुन्हा त्याला विचारले.
की, तुम्ही म्हणता की तुम्ही यांना ओळखतही नाही आणि तरीही तुम्ही यांचा फोटो येथे का लावला आहे तर तेव्हा त्या टपरीवाल्याने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रसंग त्या मित्रांना सांगायला सुरुवात केली तुम्हाला जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला आई-वडिलांचा चेहरा बघायला मिळाला नाही मी खूपच लहान होतो तेव्हाच माझे आई-वडील वारले आणि तेव्हापासून मी माझे संपूर्ण आयुष्य फुटपाथावरच काढले थोडासा मोठा झाल्यानंतर मी मिळेल ते खाऊ लागलो आणि अनेक वेळा तरी उपाशीपोटी झोपलो त्यानंतर जेव्हा मी मोठा झालो तेव्हा वाईट संगतीमुळे मी चोरी व्यसन याच्या नादाला लागलो आणि त्यामुळे माझे संपूर्ण जीवन खूपच नकारात्मक झाले.
दररोज मी दिवसातून एक-दोन चोऱ्या करत होतो आणि संध्याकाळी त्याच्या पैशातून काहीतरी खाऊन मी दारू पीत होतो आणि फुटपाथवर रात्री येऊन झोपत होतो अशा पद्धतीने माझे काहीही अर्थ नसलेले आयुष्य सुरू होते आणि एके दिवशी रात्री मी खूप दारू पिली आणि रस्त्याच्या कडेला पडलो आणि सकाळच्या वेळी गाड्यांच्या आवाजामुळे आणि वरदळी मुळे मला जाग आली तेव्हा मी उठलो आणि माझे डोळे चोळत होतो इतक्यात मला समोरच्या झाडाच्या खाली या बाबांची म्हणजेच स्वामींची मूर्ती दिसली आणि ते कोणीतरी तेथे येऊन ठेवून गेले होते आणि मी तिथे गेलो आणि तो फोटो हातात घेतला तर त्यामध्ये असणारे स्वामी माझ्याकडे खूप प्रेमाने बघत होते.
मला लहानपणापासूनच आई-वडिलांचे प्रेम मिळाले नव्हते आणि त्याचबरोबर मला लहानपणापासून कोणतेही व्यक्तीने इतक्या प्रेमाने बघितले नव्हते परंतु त्या फोटोमध्ये असणारे ते बाबा म्हणजेच स्वामी माझ्याकडे खूपच प्रेमाने आणि मग तिने पाहत होते यामुळे मला खूपच बरे वाटले आणि म्हणूनच तो फोटो मी माझ्या छातीला लावून त्या दिवशी खूप रडलो आणि ज्या ठिकाणी मी रात्री येऊन फुटपाथवर झोपत होते तिथे तो लावला आणि त्यानंतर माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले त्यानंतर हळूहळू माझे व्यसन सुटले त्याचबरोबर चोरी करणे मी थांबवले आणि थोडे फार मिळेल ते काम करून मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली.
त्यानंतर थोड्या दिवसांनी माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी स्वतःची टपरी टाकायचे ठरवले आणि स्वामींच्या कृपेमुळे आज माझे चहाची टपरी ही या भागांमध्ये खूप फेमस आहे आणि आता संपूर्ण व्यवस्थितपणे माझे जीवन सुरू आहे आणि आता माझ्या स्वतःचे घर सुद्धा आहे त्या चहावाल्याने सांगितलेला त्याचा हा अनुभव आपल्या ऐकल्यानंतर त्या दोन मित्रांचे डोळे भरून आले.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.