मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामींची सेवा आणि पारायण नेहमी करतच असतात आणि त्याचबरोबर दररोज स्वामींची विशेष सेवा ही केली जाते आणि मित्रांनो या स्वामीचे फळ स्वामी आणि प्रत्येक भक्ताला देतच असतात आणि आपण आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे सुद्धा पाहत असतो आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींनी प्रचिती दिली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामींनी त्यांना सुखरूप पणे बाहेर काढलेले आपण अनेक वेळा इतरांकडून ऐकतच असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण एका स्वामीजी ताईंचा अनुभव पाहणार आहोत.
तर मित्रांनो हा अनुभव आहे तो म्हणजे कळवा येथे राहणाऱ्या सुरेखा केंद्रे यांचा तर मित्रांनो सुरेखा ताई यांना आलेला स्वामी अनुभव सांगत असताना ते आपल्याला नेमकं काय सांगतात आणि स्वामींनी यांना कशा पद्धतीने मदत केली आहे याचा अनुभव आता आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया…
तर मित्रांनो त्यांचा हा अनुभव सांगत असताना ताई आपल्याला म्हणतात की, नमस्कार मी सुरेखा केंद्रे बोलते मी कळवा येथे राहते मला खूप मोठे अनुभव आहेत स्वामींचे माझ्या लग्नाला सतरा वर्षे झाली तरीही मला बाळ होत नव्हते खूप हॉस्पिटल केले खूप काही केले शेवटी मग माझी छोटी बहीण पुष्पा केंद्रे तिने मला केंद्रात जायला सांगितले मग कळव्यात माझ्या घराजवळ स्वामींचे केंद्र होते तेथे मी जायला लागले स्वामींची सेवा हळूहळू करायला सुरुवात केली. थोडे दिवसांनी मला बाळ राहिले सहा महिने झाले परंतु त्यानंतर एक मोठा प्रॉब्लेम झाला. माझे बाळ गेले असे चार वेळा बाळ राहिले आणि चार वेळा प्रॉब्लेम झाले दरवेळी प्रमाणे बाळ राहत नव्हते.
आणि शेवटी डॉक्टर बोलले बस कर आता खूप झाले तुझ्या शरीराचे किती हाल करशील पण माझा माझ्या स्वामींवर खूप विश्वास होता स्वामी कृपेने मला बाळ होणार असे मला वाटायचे त्यानंतर पाचव्या वेळेला मी प्रेग्नेंट राहिले मनात भीती होती काय होणार स्वामींच्या पुढे मी रडले स्वामींना बोलले स्वामी तुम्ही मला आज सांगाच आज खूप झाले आता माझी बाळ व्यवस्थित होणार की नाही खूप खूप रडले महाराजांसमोर त्याच दिवशी स्वामी रात्री स्वप्नात आले आणि मला बोलले बाळ तू आता काही काळजी करू नको तुझी बाळ व्यवस्थित होणार आहे तुला काहीच होणार नाही तुझी डिलिव्हरी व्यवस्थित होईल त्यानंतर नऊ महिने पूर्ण भरली मला काही सुद्धा झाले नाही स्वामी कृपेने छान एक मुलगा झाला आता तो दोन वर्षाचा आहे स्वामींचे अनुभव काय सांगू अजून श्री स्वामी समर्थ!
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.