स्वामींच्या 11 अनुष्ठानाला सुरुवात केली आणि घरात मृत्यूची मालिका सुरू झाली, रागाच्या भरात स्वामींची मूर्ती नदीत सोडून दिली पण ……पुढे जे घडले ते वाचून अंगावर काटा येईल …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी भक्त आहेत. आपण स्वामींची अनेक सेवा देखील करीत असतो आणि जणांना स्वामींचे अनुभव देखील आलेली आहेत. तर आज आपण असाच एक अनुभव एका ताईचा त्यांच्या शब्दांमध्ये पाहणार आहोत हा खूपच थरारक असा अनुभव आहे. चला तर मग जाणून घेऊयात. नमस्कार मी कल्पना दांडेकर मी मिरज येथे राहते. माझ्या घरी आजी आजोबा काका काकू आई-बाबा ताई दादा असा आमचा परिवार एकत्र आमचे कुटुंब अगदी आनंदाने राहत होते. माझ्या मैत्रिणी या स्वामी सेवेकरी होत्या आणि त्यामुळे मला देखील स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाली.

 

मैत्रिणींच्या बरोबर मी देखील स्वामींच्या केंद्रामध्ये जात होते मी चार-पाच वर्षे स्वामींच्या सेवेमध्ये होते आणि त्यावेळेस दहा किलोमीटरवर अंतरावरच स्वामींचे केंद्र देखील होते आणि त्यामुळे माझं जाणं स्वामींच्या केंद्रांमध्ये होतं आणि नंतर मला स्वामींच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर मी सेवा केल्यानंतर मला अनेक स्वामींचे अनुभव देखील येत गेले आणि हे पाहून माझी काकू आई ताई सर्वजणी या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आम्ही आमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आणला.

 

स्वामींचे गुरुचरित्र तसेच सारा मृत ग्रंथ आणले. तसेच जपमाळ देखील आणली आणि विधिवतपणे आम्ही स्वामींची दररोज सेवा करीत होतो. त्यावेळेस माझे शिक्षण बीएससी झाले होते आणि मला नोकरी हवी होती आणि त्यावेळेस मला स्वामींच्या केंद्रामध्ये नोकरीसाठी 11गुरुवार अनुष्ठानाची सेवा सांगितली गेली होती. म्हणजेच स्वामींच्या अकरा गुरुवारचे अनुष्ठान मला करण्यास सांगितले होते.

 

त्यावेळेस आमच्या घरांमध्ये दोन व्यक्ती आजारी होत्या. म्हणजेच माझी आजी ही वयामुळे सतत आजारी होती आणि माझे बाबा यांना आजारपणामुळे ते पाच वर्ष झाले बेडवर होते. म्हणजेच आजी आणि बाबा हे बेडवर पडूनच होते आणि त्यांची सेवा माझी काकू आणि माझी आई दोघीजणी करत होत्या.

 

तसं तर मला ११ गुरुवारचे अनुष्ठान हे केंद्रामधून नोकरीसाठी दिलेले होतं आणि मी अकरा गुरुवारचे अनुष्ठानला अगदी मनोभावे सुरुवात केली आणि पहिल्याच गुरुवारी माझी सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी रात्री अकरा वाजता माझी आजी वारली आणि त्यामुळे सर्वजण खूपच दुखी झाले. कारण पहिल्याच गुरुवारी आजी वारल्यामुळे सर्वजण माझ्यावर नाराज झाले. तसेच मी देखील खूपच हतबल झाले होते.

 

कारण हे सर्व पहिल्याच गुरुवारी का घडावं? नंतर माझा दुसरा गुरुवार झाला आणि तिसऱ्या गुरुवारी माझे बाबा वरले आणि त्यावेळेस मात्र मला खूपच वाईट वाटलं आणि माझ्या घरातील आई काकू ताई माझ्यावर सर्वजणी ओरडल्या आणि स्वामींची मूर्ती स्वामींचे ग्रंथ तसेच माळ हे सर्व काही नदीत सोडण्यास मला सांगितलं. परंतु मी अजिबात ते सर्व काही माझ्या घरीच ठेवले. नंतर माझ्या बाबांचे दिवस झाले आणि आमच्या घराजवळच नदी होती आणि त्या नदीमध्ये माझ्या सर्व घरातल्या सर्वांनी स्वामींचे सर्व फोटो तसेच मूर्ती ग्रंथ सोडण्यास सांगितले आणि नाईलाजाने मला देखील ते नदीत सोडावे लागले. कारण मी स्वामींचे अकरा गुरुवारच्या अनुष्ठांन सुरुवात केल्यानंतर पहिल्याच गुरुवारी आजी वारली.

 

तिसऱ्या गुरुवारी लगेच माझे बाबा वारल्यामुळे सर्वजण खूपच निराश झाले होते. नंतर आठ दिवस झाल्यानंतर थोडे दिवस माझे व्यवस्थित गेले आणि त्यानंतर आमच्या गावांमध्ये नंदीबैलाचा खेळ होता. नंदीबैलाचा खेळ झाल्यानंतर आमच्या घरामध्ये एक साधू आले एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती आमच्या घरामध्ये आत आली आणि पाणी मागितले आणि त्यावेळेस माझ्या बाबांच्या फोटोकडे त्यांनी पाहिलं आणि ते म्हणले अरे हे तुझे बाबा ना. वारले आहेत. तू का काळजी करते आहेस. कारण तुझे बाबा स्वामीं पाशी आहेत. ते माझ्याजवळ आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीत का? मला तुम्ही असे का मध्येच सोडून गेला. असे ते व्यक्ती म्हणाले.

 

मला परत आणा आणि ती व्यक्ती बाहेर जाताच आमच्या अंगणामध्ये चाफ्याची फुले पडली आणि त्यावेळेस ती व्यक्ती अदृश्य झाली. त्यावेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला की मला खूप दिवसांपासून स्वप्न येत होते म्हणजेच माझ्या स्वप्नांमध्ये मला माझे बाबा दिसून येत होते आणि बाबांजवळ माझे स्वामीदेखील दिसत होते आणि नंतर त्याच रात्री पहाटे माझ्या आईला स्वप्न पडले की, स्वप्नामध्ये बाबा येऊन म्हणाले की अगं मला पाच वर्षे झाले खूपच त्रास होत आहे आणि मला तो त्रास सहन होत नव्हता.

 

परंतु स्वामींनी मला त्या त्रासातून बाहेर काढले आहे. मी सुखरूप आहे असे माझ्या आईला स्वप्न पडलं आणि नंतर त्या स्वप्नामध्ये स्वामी सांगून गेले की मला तुम्ही अर्ध्यावरच का सोडले. मी तुमची वाट पाहत आहे तुम्ही मला परत आणा. असे म्हटल्यानंतर माझ्या आईने स्वप्न हे सर्वांना घरी सांगितले नंतर आम्हाला सगळ्यांना प्रचिती आली की माझे वडील हे पाच वर्षे झाले बेडवरती आजारी होते आणि त्यांना खूपच त्रास होत होता आणि त्यावेळेस स्वामींनी त्यांना आधार दिला म्हणजेच त्या त्रासातून स्वामींनी मुक्त केले. इतका त्रास त्यांना होता की स्वामींनी त्यातून त्यांना बाहेर काढल. आणि आपल्याजवळ बोलावून घेतलं.

 

हे आम्हाला नंतर समजलं की बाबानी आईच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मला स्वामींनी माझ्या त्रासातून मुक्त केलं. स्वामी आता आपले वाट पाहत आहेत. त्यावेळेस आम्ही सर्वजण घाई गडबडीने नदी तीरावर गेलो. त्यावेळेस स्वामींची मूर्ती हे नदीच्या काठी आहे तशीच होती. म्हणजे जणू काही ती आमची सर्वांची वाटच पाहत होती.

 

नंतर आम्ही ती प्रतिमा वगैरे आणली घरी आणि नंतर स्वामींचे ११ गुरुवारचे अनुष्ठान मी चालू केले. स्वामींची सेवा माझी काकू आई ताई सर्व जण करू लागलो. म्हणजेच माझ्या वडिलांना जो आजारपणात काही त्रास होत होता त्या त्रासातून एक प्रकारची मुक्ती स्वामीनी दिलेली होती. हा अनुभव आम्हाला त्यावेळेस आला. म्हणजेच स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव उभे राहतात. तेव्हापासून आमच्या घरांमध्ये दररोज नित्यनेमाने स्वामींची सेवा केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.