फक्त दोन चमचे बेसनचा घरच्या घरी बनवा हा फेसपॅक चेहरा इतका गोरा होईल की चार चौघात उठून दिसाल, वांग, काळे डाग गायब? डॉ स्वागत तोडकर टिप्स …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि अनेक जण आपल्या आरोग्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. या सगळ्या धावपळीमुळे व कोणत्याही आहारामुळे आपल्या चेहऱ्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळतो. अनेकदा काळे डाग, पिंपल्स सध्याच्या दिवसांमध्ये साधारण झालेले आहे. परंतु या सगळ्या समस्या अनेकदा ताणतणाव यामुळे सुद्धा उद्भवत असतात आणि हा उपाय केल्याने चेहऱ्यावर वांग कधीच येणार नाही, कितीही जुने वांग असतील ते तीन दिवसात नष्ट होतील. नाकाजवळ , चेहऱ्यावर, गालावर अनेकदा पिंपलस् झाल्यामुळे आपल्या चेहऱ्याची शोभा निघून जाते.

पिंपल्स फार दिवस चेहऱ्यावर टिकून राहिल्याने काळे डाग पडतात. यालाच आपण वांग असे म्हणतो. चेहऱ्यावर वांग, काळे डाग आल्यामुळे चेहरा खराब दिसतो.आपला चेहरा थकल्यासारखा दिसतो.हे चेहऱ्यावरील वांग कपाळाच्या भागावर, गालावर, नाकावरच्या वरचा थरावर दिसतात. काही उपचाराने हे डाग फीखट होताना दिसतात.

मित्रांनो जर आपल्या चेहऱ्यावर वांग, काळे डाग, सुरकुत्या, खूणा, काळपटपणा असेल तर तुम्ही आमच्या या उपायाने सहजासहजी ते घालवू शकाल. यासाठी काय करावे लागणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या घरी स्वयंपाकघरात बेसन पीठ हमखास असते.

परंतु, तुम्हाला कदाचित यांचे फायदे माहीत नसतील, की बेसन सौन्दर्य प्रसाधनांमध्ये बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. आपल्या चेहऱ्यावर बेसन चमक आणते. पूर्वीच्या काळापासून बेसन व हळद लावून चेहऱ्याची सुंदरता वाढविली जात असे. आज सुद्धा आपण बेसनाचा उपयोग आपल्या त्वचेला तजेलदार बनविण्यासाठी करू शकतो.

तर मित्रांनो यासाठी आपल्याला 2 चमचे बेसन घ्यायचे आहे. बेसनाचा पॅक चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा घट्ट होते व आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या पडतात त्या मूळापासून नाहीशा होतात आणि चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या, काळे डाग पडतात त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे हा-र्मोनल इमबॅलेंस. हार्मोन्सची आपली जी पातळी असते ती असंतुलित झाल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

खास करून चाळीस या वयापासून महिलांच्या बाबतीत सुरकुत्या पडायला सुरुवात होते. पुरुषांमध्ये ही समस्या थोड्या कमी प्रमाणात दिसते. त्याशिवाय आपण खूप जास्त सूर्यप्रकाशात किंवा उन्हात गेलो, तरी चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. म्हातारपण दिसू लागतो. त्याचबरोबर पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळे, उन्हात जास्त वेळ गेल्यामुळे, खूप जास्त महागडे मेकअप प्रोडक्टस वापरुन त्याचा खूप जास्त वापर केल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात.

तर मित्रांनो बेसनाच्या पिठामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्याही कमी होतात. म्हणूनच याचा वापर आज आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो या संबंधित उपाय करताना आपल्याला लागणार आहे ते म्हणजे दही. मित्रांनो दही हे आपल्या घरामध्ये असतंच आणि त्याचबरोबर हेआपल्याला अगदी सहजरित्या दुकानांमध्ये उपलब्ध होतं.

मित्रांनो दह्यामध्ये असणारे अँटिबॅक्टरियल घटक हे चेहऱ्यावर असणारे पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी खूप मदत करतात. तर मित्रांनो दोन चमचे बेसनच्या पिठामध्ये आपल्याला एक ते दोन चमचे दही मिक्स करायचे आहे. त्यानंतर यापासून एक व्यवस्थितपणे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो हे आपले फेस पॅक तयार झालेले आहे तर हे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे आणि 20 ते 25 मिनिटानंतर आपल्याला आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने आठवड्यातून दोन वेळा आपण हा उपाय करायचा आहे. एका महिन्यामध्येच तुम्हाला तुमचा चेहऱ्यावर असणारे काळे डाग आणि पिंपल्स निघून गेलेले नक्की दिसून येईल. तर असा एक छोटासा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.